संपादने
Marathi

एकाच वेळी १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण यशस्वी; इस्रोच्या कामगिरीने देशाच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा!

15th Feb 2017
Add to
Shares
5
Comments
Share This
Add to
Shares
5
Comments
Share

नव्वदीच्या दशकात ज्या भारतीय अंतराळ विज्ञान संस्था इस्त्रोला क्रायोजेनिक तंत्रज्ञान देण्यास जगातील सर्व विकसित देशांनी नकार दिला होता त्या संस्थेने केवळ तीस बत्तीस वर्षात इतिहास घडविला आहे. त्यावेळी या देशाच्या अंतराळ संशोधनाच्या कार्याचे आता काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र डॉ अब्दुल कलाम यांच्यासारखे देशभक्त मिसाईल मॅन शास्त्रज्ञ त्यावेळी या संस्थेत काम करत होते. त्यांनी अथक प्रयत्न करत आज देशाच्या आंतराळ क्षेत्रातील कामगिरीचा मानाचा तुरा खोवला आहे. भारताने स्वत:च्या तीन उपग्रहांसह १०४ उपग्रह अंतराळात एकाचवेळी सोडण्याचा विक्रम करून विकसीत देशांना मागे टाकले आहे. याचा सा-या भारतीयांना सार्थ अभिमान वाटला पाहिजे.


image


आजपर्यंत एकाच वेळी जास्तीत जास्त म्हणजे ३७ सॅटेलाईट लाँच करण्याचा विक्रम रशियाने २०१४ मध्ये केला होता. आता इस्रोने एकाचवेळी १०४ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. देशात निवडणुकांचे वारे वाहत असताना इस्रोचे शास्त्रज्ञ मात्र अहोरात्र देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याच्या तयारीत होते. कुणाला माहित नसेल पण इस्रोने १५ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटामधून अवकाशात १०४ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. या मध्ये भारताचे स्वतःचे ३ सॅटेलाईट आहेत तर बाकीचे १०१ बाहेरच्या देशातील आहेत. यामध्ये अमेरिकेचे ८८, तर बाकीचे जर्मनी, इस्राईल, कझाकिस्तान, युनायटेड अरब अमिरात(UAE), नेदरलँड, स्विझरलँड या देशांचे आहेत.


image


भारताच्या तीन उपग्रहांचे एकूण वजन ७६८ किलो आहे तर राहिलेल्या १०१ सॅटेलाईटचे एकूण वजन सहाशे किलो आहे. महत्वाचे म्हणजे आपले उपग्रह लाँच करण्यासाठी लागणारा निम्मा खर्च इस्रोने बाकी देशांकडून आधीच मिळवला आहे. इस्रोला हे १०उपग्रह एकमेकांना न धडकता पृथ्वीच्या कक्षेत स्थापन करायचे आहेत. यासाठी एक विशेष कोड बनवण्यात आला आहे जो या शेकडो उपग्रहांना वेगवेगळ्या वेळी (stages) वेगवेगळ्या दिशेने (direction) वेगवेगळ्या परस्परावलंबी गतीमध्ये (relative velocity) अंतराळात सोडणार आहे. हा जागतिक विक्रम करण्यासाठी शास्त्रज्ञांनी दिवसरात्र मेहनत घेतली आहे.

Add to
Shares
5
Comments
Share This
Add to
Shares
5
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags