संपादने
Marathi

कधीकाळीचा शिपाई आज आहे दहा कोटी रूपयांच्या उलाढालीच्या उद्योगाचा मालक!

Team YS Marathi
29th Aug 2017
Add to
Shares
4
Comments
Share This
Add to
Shares
4
Comments
Share

स्वप्न तर सारेच जण पहात असतात मात्र त्यासाठी मेहनत करून ती प्रत्यक्षात आणण्याचा चंग बांधणारे फारच थोडे लोक असतात. छोटू शर्मा, जे छत्तीसगढ स्थित सिएस समूहाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, यांची कहाणी अशीच आहे. 


•	Image Source: Amar Ujala

• Image Source: Amar Ujala


हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील छोट्या गावातून आलेल्या छोटू यांनी आपली कारकिर्द शिपाई म्हणून सुरू केली. परिस्थितीच्या रेट्याने त्यांना दिवसा काम आणि रात्री शिक्षण असे करावे लागले. सध्या हाच माणूस छत्तिसगढ मध्ये सॉफ्टवेअर उद्योगांचा मालक झाला आहे, ज्याची उलाढाल १०कोटी रूपये आहे. छोटू यांनी आपले पदवी पर्यंतचे शिक्षण कांगडा येथील धलीयारा महाविद्यालयातून १९९८ मध्ये पूर्ण केले. त्यावेळी त्यांच्याजवळ संगणक शिकण्यासाठी पाच हजार रूपये देखील नव्हते. मात्र तरीही त्यांना जाणिव होती की संगणक शिकणे महत्वाचे आहे त्यामुळे त्यांनी चंदिगड येथे जाण्याचा निर्णय घेतला.

हालाखीची आर्थिक स्थिती असल्याने कुठेच प्रवेश मिळणार नाही हे चंदू यांना माहिती होते, त्यामुळे त्यांनी संगणक केंद्रातच शिपाई म्हणून नोकरी सुरू केली, मात्र नोकरीची वेळ पूर्ण झाली की त्याच केंद्रात त्यांनी मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर डेवलपर म्हणून प्रमाणपत्र मिळवले.

त्यावेळी देखील त्यांची आर्थिक स्थिती इतकी नाजूक होती की कधी कधी त्यांना न जेवता उपाशी झोपावे लागत असे. छोटू यांनी मग शिकवण्या घेण्यास सुरुवात केली, त्यांंनी सायकलवरुन प्रवास करण्यास सुरूवात केली त्यावेळी त्यांच्याजवळ स्वत:चा संगणक देखील नव्हता. दोन वर्ष बचत केल्यावर त्यांनी स्वत:ची बाईक आणि संगणक खरेदी केले.

सॉफ्टवेअर विकसित करण्याबाबतचे प्रमाणपत्र असल्याने त्यांना अॅप्टेक संगणक केद्र येथे शिक्षकाच्या नोकरीची संधी मिळाली. शिकवणी झाल्यानंतरही ते जास्त वेळ तेथेच थांबून अन्य काही विद्यार्थ्यांना शिकवत त्यामुळे २०००सालापर्यंत त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले.

मग त्यांनी दोन बेडरूमचा फ्लॅट घेतला आणि स्वत:चे संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केले. सहा महिन्याच्या काळात त्यांच्याकडे ८० विद्यार्थी होते, ह सारे विद्यार्थी अश्या कंपन्यातून नोकरीला लागले ज्यांची उलाढाल पाचशे कोटीच्या घरात आहे.

त्यानंतर त्यांनी शिक्षणसंस्था सुरू केली त्याचे नाव सीएस इन्फोटेक. त्यांच्या २००७ नंतर अनेक ठिकाणी शाखा सुरू झाल्या. सध्या त्यांच्याकडे हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिकतात. छोटू यांनी सुमारे १५० लोकांना रोजगार मिऴवून दिला आहे आणि ते लहान गरीब मुलांना मदत करण्याच्या सामाजिक उपक्रमात देखील स्वत:हून सामिल होतात. 

Add to
Shares
4
Comments
Share This
Add to
Shares
4
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags