संपादने
Marathi

मॅनचेस्टर दहशतवादी हल्ल्यातील पिडीतांना शिख मंदिराने दिले अन्न आणि निवारा!

Team YS Marathi
7th Jun 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

मागील सप्ताहात एरियाना ग्रॅण्डे यांच्या संगीत कार्यक्रमा दरम्यान झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर दयाळूपणाच्या अनेक सुंदर कहाण्या समोर आल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शिख गुरुद्वाराने (मंदीर) बाधीतांसाठी अन्न आणि निवा-याची सोय केली.


image


हरजिंदर कुकरेजा त्यांच्या ट्वीट मध्ये म्हणतात की, “ मॅनचेस्टर येथील शिख मंदिराने अन्न आणि निवारा यांची सोय केली. तेथे सा-या लोकांना मुक्तपणे प्रवेश आहे.”

यूके मधील बातम्यांनुसार, ‘एव्हरीथींगज् १३’ या शिख शैक्षणिक धर्मादाय संस्थेतील प्रवक्त्याने सांगितले की ते केवळ त्यांचे कर्तव्य करत आहेत. मॅनचेस्टर मधील गुरूद्वारा निवारा आणि अन्न देवू करत आहेत, हल्लयात ज्यांना त्रास झाला आहे त्यांच्यासाठी ते त्यांच्या सा-या गरजा पूर्ण करत आहेत. गुरूद्वारा म्हणजे “गुरूंचे द्वार” आणि शिख हा ऐतिहासिक संप्रदाय आहे, जे गरजू लोक होते ते त्याकडे वळले. त्यांनी सांगितले की, “ सध्याच्या काळात शिख समाजाने जबाबदारी नव्या तरूणांच्या हाती सोपवली आहे आणि त्यांनी ती योग्य प्रकारे सांभाळली आहे.”

स्फोटांनंतर अनेकांनी मॅनचेस्टर येथील विमानतळांवरून सुखरूप जाण्याचा प्रयत्न केला. हे त्यावेळी शक्य झाले ज्यावेळी अनेक टँक्सी चालकांनी ठरविले की ते शक्य ती सारी मदत लोकांना करतील.एका वृत्तानुसार एक टॅक्सी चालक म्हणाला की, “ येथे अनेकजण त्यांच्या प्रियजनांच्या शोधातच होते. मी त्यांना रूग्णालयात सोडून आलो, त्यांच्याजवळ पैसे नव्हते, ते जखमी, घाबरलेले होते. तेव्हा एकजुटीने आम्ही त्यांना मदत करण्याचे ठरवले.”

या हल्ल्याचे वर्णन युनायटेड किंगडम मधील आता पर्यतचा सर्वात भयानक हल्ला असे केले जात आहे. आत्मघाती हल्लेखोराने डिटोनेटरच्या मदतीने त्यावेळी हल्ला केला ज्यावेळी एरियाना ग्रँन्डे यांनी त्यांच्या मंचावरील कार्यक्रम संपविला. या हल्ल्यात २२जण मयत झाले तर ५९ जण जखमी झाले आहेत.

वृत्तानुसार मॅनचेस्टरच्या नगर परिषद प्रमुख सर रिचर्ड लिसे यांनी म्हटले आहे की, “ हा खरोखर भयानक हल्ला होता, आणि आमच्या मनाला त्याने धक्का बसला आहे, खास करून त्यांना ज्यांना त्यांच्या प्रियजनांना मुकावे लागले आहे आणि जखमी होवून रूग्णालयात पडावे लागले आहे. मँनचेस्टर हे अभिमानास्पद आणि मजबूत शहर आहे, आणि आम्ही दहशतवाद्यांना याची परवानगी देत नाही की, त्यांनी या शहरात येवून भिती आणि दहशत यांचे साम्राज्य निर्माण करावे. आमच्यात फूट फाडून त्यांचे मनसुबे पूर्णत्वाला जावे हे त्यांचे इरादे कधीच पूर्ण होवू देणार नाही.”

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags