संपादने
Marathi

लष्करातील चार मराठी अधिका-यांना परम विशिष्ट सेवा पदक जाहीर

Team YS Marathi
28th Jan 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

भारतीय लष्करातील मानाच्या समजल्या जाणा-या परम विशिष्ट सेवा पदकावर (पीव्हीएसएम) महाराष्ट्राच्या चार लष्करी अधिका-यांनी नाममुद्रा कोरली आहे.

दरवर्षी प्रजासत्ताक दिनी भारतीय लष्कराच्या वतीने शौर्य व विशिष्ट सेवेसाठी पुरस्कार जाहीर केले जातात. मूळचे महाराष्ट्राचे व लष्करात सेवारत असणा-या अधिका-यांनी यावर्षी या पुरस्कारांवर छाप सोडली आहे. लष्करातील सर्वोच्च पदक म्हणून संबोधले जाणारे ‘परम विशिष्ट सेवा पदक’ लेफ्टनंट जनरल (ले. ज.) राजीव वसंत कानिटकर, ले.ज.अशोक भिम शिवाने, ले.ज. अविनाश लक्ष्मण चव्हाण आणि ले.ज. विनोद गुलाबराव खंडारे यांना जाहीर झाले आहेत. यांसह विविध श्रेणींमध्ये लष्करी अधिका-यांना दिल्या जाणा-या पुरस्कारांवर मराठी मोहोर उमटली आहे. शहीद नायक पांडुरंग गावडे यांना मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्कार जाहीर झाला.


उजवीकडून (ले. ज.) राजीव कानिटकर,ले.ज.अशोक  शिवाने, ले.ज. राजेंद्र निंभोरकर, शहीद नायक गावडे

उजवीकडून (ले. ज.) राजीव कानिटकर,ले.ज.अशोक शिवाने, ले.ज. राजेंद्र निंभोरकर, शहीद नायक गावडेले.ज. राजेंद्र रामराव निंभोरकर यांना ‘उत्तम युध्द सेवा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहे. ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ पुरस्कार ले.ज.अशोक आंब्रे आणि ले.ज. मनोज मुकुंद नरवणे यांना जाहीर झाले आहेत.

शहीद नायक पांडुरंग महादेव गावडे यांना मरणोत्तर शौर्य चक्र

राष्ट्रीय रायफल्सचे नायक पांडुरंग महादेव गावडे यांना मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्कार जाहीर झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील नायक पांडुरंग गावडे जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात चक द्रुगमुल्ला येथे दहशतवाद्यांशी उडालेल्या भीषण चकमकीत गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान २२ मे 2016 रोजी नायक गावडे यांचा मृत्यू झाला.


ले.ज.अशोक आंब्रे 

ले.ज.अशोक आंब्रे 


राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल अमिताभ वालावलकर यांना ‘युध्द सेवा पदक’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

लष्करात शौर्य गाजविण्यासाठी देण्यात येणारे ‘सेना पदक’ राज्यातील पाच अधिका-यांना जाहीर झाले आहे.महाराष्ट्राचे ले.कर्नल. रणजीतसिंह पवार यांना मरणोत्तर सेना पदक जाहीर झाले आहे. मेजर(मे) राघवेंद्रकुमार येंडे, मे.अर्जुन अर्मोद चव्हाण, मे. ऋषीकेश अरूण बरडे , कॅप्टन मानस सुधाकर जोंधळे आणि सुभेदार सुनिल नामदेव पाटील यांना सेना पदक जाहीर झाले आहे. 

कर्नल अनिलकुमार जोशी यांना ‘सेना पदक’ जाहीर झाले आहे. ब्रिगेडीयर संदीप महाजन, कर्नल धनंजय एम.भोसले यांना ‘विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे. लष्कराच्या वायुसेवेचे मेजर नितीन शिवाजीराव भिकाने यांना ‘मेघदूत’ या विशिष्ट ऑपरेशनसाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी लेफ्टनन कर्नल राजेश विलास हाकरे, मेजर हर्षल वासुदेव कचरे, मेजर सुमीत जोशी आणि स्पेशल परपज रायफलचे अभय हरिभाऊ पगारे यांना ‘ऑपरेशन रक्षक’ मध्ये केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे.(सौजन्य - महान्युज)

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags