संपादने
Marathi

थॉमसची सायकल, रस्ता ऐसा सरे; वनातली पाखरे, गिरविती अक्षरे!

Chandrakant Yadav
5th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

थॉमस हिरकॉक पहिल्यांदा वडिलांसह भारतात आले तेव्हा १२ वर्षांचे होते. भारतात सुरू असलेल्या ‘बचपन बचाओ’ (बालपण वाचवा) चळवळीत थॉमस यांचे वडील सक्रिय होते. वडिलांसह थॉमसने इथले दैन्य जवळून पाहिले. मुलांची अवस्था बघितली. अभाव बघितला. आणि थॉमसच्या बालमनात कालवाकालव झाली. झारखंड आणि बिहारमधील दुर्गम भागांतूनही थॉमसने या काळात मनसोक्त भटकंती केली. आणि त्याचा जीव इथल्या मुलांमध्ये अडकला तो कायमचा. इथले साक्षरतेचे प्रमाण होते केवळ २० टक्के. मुलींचे तर विचारूच नका, एखाददुसरा अपवाद वगळता इथल्या मुलींनी शाळेचे तोंडही पाहिलेले नव्हते.

झारखंडमध्ये घनदाट जंगले भरपूर आहेत, तशाच खाणीही भरपूर आहेत. पाड्यांतून राहणाऱ्या लोकांना वाटेतल्या जंगलामुळे लगतच्या गावांत येण्या-जाण्यात अडचणी. बरं. जंगलांतून वन्य श्वापदांचाही धोका. मुलांसाठी तर रस्ते कठीणच. मुलींचा मग विषयच नाही. मुळात इथले लोक आधीच मुलींनी शिकण्याच्या बाजूला नव्हते, त्यात हे जंगल आणि जंगली जनावरे म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीने दुष्काळात तेरावा महिना. शाळेत जायचे तर दहा-पंधरा किलोमीटर अंतर कापावे लागे. जंगली जनावरांचा प्रश्न होता तसा माणसांतील जनावरांचाही सवाल होताच. तेव्हा लहान मुले विशेषत: मुली पळवल्या जाण्याच्या घटना वरचेवर कानावर येत असत. एकुणात मुलांना एवढे अंतर कापून शाळेत पाठवायला वाड्या-पाड्यांतून कुणीही तयार होईना. हे दृश्य पाहून थॉमस यांचे मन द्रवले आणि या मुलांसाठी आपण काहीतरी करायचे, असा संकल्प त्यांनी सोडला.

मुलांना उद्देशून एकदा काय हवे म्हणून जेव्हा थॉमसनी सहजच विचारले तेव्हा बहुतांश मुलांचा गलका होता ‘सायकल.’ थॉमस मायदेशी परतले ते मुलांचे हे मागणे आपल्या गाठीशी बांधूनच. तिथे जुन्या सवंगड्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि झारखंडमधल्या या मुलांची व्यथा त्यांना सांगितली. मुलांच्या सायकलींसाठी आपण पैसा उभा करू, यावर एकमत झाले. ६०० डॉलर जमले. दहा सायकली विकत घेतल्या. ही २००८ ची गोष्ट. आपण मुलांसाठी दहा सायकली घेऊ शकलो, ही बाब नव्याने सायकल खरेदीसाठी त्यांचा उत्साह वाढवून गेली.

image


नंतर त्यांनी पैसे जमविण्यासाठी विविध फॉर्म्युले वापरले आणि मुलांना सायकली देणे सुरू ठेवले. बघता-बघता ४०० मुलांना सायकली देऊन झालेल्या आहेत. सायकली देता देताच थॉमस यांचे बालपण केव्हाच सरले आहे आणि ते आता तरुण झालेले आहेत. झारखंडमधल्या दुर्गम भागातली ही सारी मुले आता शाळेत जायचे तर काकू करत नाहीत. जंगलांतील अवघड रस्त्यांवरून सहज चालू शकतील अशा बेतानेच सायकलीही खास बनवलेल्या आहेत. चार लोकांचे वजन पेलू शकतील इतक्या मजबूत त्या आहेत. रस्त्यात सायकल बिघडली वगैरे तर ती दुरुस्त करता यावी म्हणून एक ‘टूल किट’ही सायकलीतच खास बसवलेले आहे.

image


कितीतरी मुले अशी होती, ज्यांना सायकल चालवताही येत नव्हती, मग थॉमस यांनीच या मुलांना सायकल शिकवली.

image


थॉमस यांची ही सायकल सेवा मुलांना शिक्षणाचा मेवा मिळवून देणारी ठरली आहे. थॉमस यांनी आपल्या प्रयत्नातील सातत्यातून ग्रामीण शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा ठरेल, असा एक मंत्रही दिलेला आहे. तो म्हणजे निव्वळ शाळा सुरू करून काहीही साधणार नाही. मुलांना शाळेपर्यंत आणण्यासाठीही बरेच काही करावे लागणार आहे.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags