संपादने
Marathi

‘सोनेरी आशा बळावल्या’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ चे दिग्दर्शक अनेक कारणांनी आनंदी आहेत!

Team YS Marathi
19th Apr 2017
Add to
Shares
4
Comments
Share This
Add to
Shares
4
Comments
Share

अलंकृता श्रीवास्तव ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ च्या दिग्दर्शिका यांच्यासाठी हा साजरा करण्याचा क्षण आहे, असे असले तरी या सिनेमाचे भारतातील भवितव्य अधांतरीच आहे, मात्र या सिनेमाची निवड गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी झाली आहे. मागील सप्ताहात हा सिनेमा लॉस ऐंजेलिस मध्ये प्रदर्शित झाला, ‘ इंडियन फिल्म फेस्टिवल’ मध्ये आणि या सिनेमाचे प्रदर्शन न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये देखील करण्यात आले.

या सन्मानाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “ माझ्या साठी हे अगदी अनपेक्षित होते, मला आणि माझ्या सहका-यांना उत्साह देणारी ही बाब आहे.” अलंकृता यांच्या या सिनेमाला अलिकडचे केंद्रीय फिल्म प्रमाणन मंडळाने प्रमाणित करण्यास नकार दिला होता.


Image: The Huffington Post

Image: The Huffington Post


,त्याबाबत त्या म्हणाल्या की, “ मी सेंसॉरचे प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित व्हावा. मी माझ्या सिनेमाच्या अस्तित्वासाठी लढा देत आहे, या सिनेमाला सेंसॉरची मान्यता नसणे म्हणजे एखाद्याला त्याच्या जन्माचा दाखला नाकारण्यासारखेच आहे. लिपस्टिक अंडर माय बुरखा ला प्रमाणपत्र नाकारणे म्हणजे अन्यायच आहे. सध्या मी अपील करण्याच्या प्रक्रियेत आहे जेणेकरून मला मंडळाने सिनेमाचे प्रमाणपत्र द्यावे. मला आशा आहे की काहीतरी सकारात्मक घडेल”.

ही कहाणी चार महिलांभोवती फिरते, ज्या मुक्तपणे जगण्यासाठी भारतात प्रयत्न करत असतात, मात्र या सिनेमाला प्रमाणित करण्यास नाकारण्यात आले कारण हा स्त्रीप्रधान सिनेमा आहे, आणि त्यात अपशब्द वापरण्यात आले आहेत, असे कारण देण्यात आले. या सिनेमाला प्रमाणपत्र नाकारण्यात आल्यानंतरही या सिनेमाने भारतात मुंबई फिल्म फेस्टिवलमध्ये ‘लैंगिक समानते बाबतचा सर्वोत्कृष्ट सिनेमा' म्हणून पुरस्कार प्राप्त केला.

लैंगितकेवर आधारित परछेड, बिसा,आणि फायर या सिनेमांना प्रमाणपत्र नाकारण्यात आले नव्हते, त्यामुळे अलंकृता यांना याचे आश्चर्य वाटले की, त्यांच्याच सिनेमाला असे का रोखण्यात आले. पण त्या ठाम होत्या कारण त्यांना लोकांचा वाढता पाठिंबा आहे आणि त्या म्हणतात की, “ या सिनेमात सुरूवातीच्या काही संवादात चर्चा आहे की, भेदाभेदांच्या लोकप्रिय संस्कृतीबाबत मुक्तपणे विचार करणा-या महिलांच्या मनात काय आहे. देशाचे सुजाण नागरिक म्हणून, आपण प्रश्न विचारला पाहिजे की या सिनेमात पर्यायी मुद्दे का मूकपणे राहिले आहेत. २०१७ मध्ये देखील आम्हाला सेंसॉरशिप सारख्या सनातनी गोष्टीचे निर्बंध घातले जातात. आम्ही तरी देखील यांच्याशी समझोता करून का जगतो आहोत?”

Add to
Shares
4
Comments
Share This
Add to
Shares
4
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags