संपादने
Marathi

आरोग्य आणि स्वच्छतेबाबतच्या तक्रारींसाठी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या ऍपला कर्नाटक सरकारचं अर्थसहाय्य !

Team YS Marathi
26th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

बंगळुरूमधल्या नागरिकांना आरोग्य आणि स्वच्छतेबाबत थेट राज्य सरकारकडे तक्रार करता येणं शक्य झालंय ते हेल्थायझन या मोबाईल ऍपमुळे...त्यामुळे बंगळुरू शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांना थेट सहभागी होता येत आहे.


image


हेल्थायझन हे ऍप सुरू करण्यामागे नागरिकांना प्रत्यक्ष कामात सहभाग होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे. फक्त आरोग्य आणि स्वच्छता एवढ्यापुरता या ऍपचा हेतू मर्यादित नसून आपला परिसर चांगला कसा होईल यासाठी नागरिकांनी सरकारला दुषणं देण्यापेक्षा या कार्यात सहभागी व्हावं असं हेल्थायझन ऍप विकसित करणाऱ्या टीमचं म्हणणं आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करायचं यावर मित्रांच्या चर्चेच्यावेळी हेल्थायझन ऍपची संकल्पना जन्माला आली. सुट्टीचा काही वेळ आपण मोबाईल ऍप बनवण्यात घालवावा असं निर्णय घेतल्याचं ही टीम सांगते. ही संकल्पना त्यांनी KSHSRCच्या एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर डॉ. साधना यांना सांगितली आणि त्यांना ही संकल्पना खूपच आवडली. मग त्यांनी यासाठी खूप मदत केल्याचं टीम सांगते.

राज्य आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी या ऍपमध्ये दाखवलेल्या रुचीमुळे प्रोत्साहन मिळाल्याचं ही टीम सांगते. आज बाजारपेठेत अशी अनेक ऍप्स असतानाही हेल्थायझनला सरकारनं पाठिंबा दिल्यानं आत्मविश्वास वाढल्याचं या टीमला वाटतं.

या ऍपद्वारे नागरिकांना आरोग्य आणि स्वच्छतेबाबतच्या तक्रारी करणं अगदी सहज शक्य होतं. त्यासाठी खाली दिलेली सोपी प्रक्रिया आहे.

. ज्याबद्दल तुम्हाला तक्रार करायची आहे त्याबाबतचा फोटो काढा

. त्या तक्रारीची सविस्तर माहिती भरा

. त्यानंतर ती माहिती सेंड करा

वापरकर्त्याला त्यांच्या तक्रारीची स्थिती healthizen.org वर पाहता येते आणि कोणालाही सर्व तक्रारींची माहितीही पाहण्याची मुभा आहे.


image


KSHSRC च्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. साधना या प्रकल्पाच्या प्रमुख आहेत. ऍप सर्वसमावेशक कसं होईल याबाबत त्यांनी मोलाची मदत केली आहे. त्यामुळे हेल्थायझन ऍपच्या माध्यमातून आरोग्यविषयक प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वळवण्यात यश आलं आहे. हे ऍप आणि त्याची सर्व प्रक्रिया NITK सुराथकालचे विद्यार्थी आनींदिता रवीकुमार, कल्याणसुंदरम एस., कार्तिक श्रीनिवासन, अर्क राय चौधरी आणि सिद्धार्थ आर. थोटा यांनी तयार केली आहे. या ऍपला सुरूवातीलाच चांगली पसंती मिळाल्याचं ही टीम सांगते. पण अजून बरीच वाटचाल बाकी असल्याचंही ही टीम सांगते. बंगुळरुमधल्या काही सजग नागरिकांनी आणि या टीमच्या मित्र परिवारानं त्यांना या ऍपमध्ये काही सुधारणा सुचवल्या आहेत. लवकरच या ऍपचं iOS व्हर्जन आणण्याचा टीमचा प्रयत्न आहे. अनेकांनी हे ऍप डाऊनलोड केलं असलं तरी त्याचा वापर केलेला नाही, पण लवकरच ते या ऍपचा वापर करतील असा विश्वास या टीमला आहे.


image


हे ऍप सुरू करण्यास कर्नाटक सरकारनं खूपच मदत केली आहे. हा प्रकल्प मंजूर केल्यानंतर यासाठीचा संपूर्ण निधी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिला आहे. हे ऍप तयार करण्याच्या प्रक्रियेपासून सरकारनं यात लक्ष घातलं, तसंच वेळोवेळी त्यात बदलही सूचवले आहेत. हे ऍप तयार केलं तेव्हा या क्षेत्रातील स्पर्धेची जाणीव नव्हती पण काही समाजसेवकांनी तयार केलेलं Clean India हे ऍपही चांगले असल्याचं ही टीम सांगते. सरकारला त्यांचं काम चांगलं करता यावं यासाठी त्यात नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवण्याकरीता हेल्थायझन हे ऍप मदत करतं. नागरिकांना सरकारच्या कामात सहभागी होण्यासाठी हेल्थायझन हा थेट आणि अधिकृत मार्ग आहे. सरकारसोबत जनतेचा सहभाग या लोकशाहीतील तत्वाचा वापर इथं दिसतो, असं या टीमचं म्हणणं आहे.


image


इतर ऍपच्या बाबतीत नागरिकांनी ते प्रश्न स्वत: सोडवण्याची अपेक्षा असते. छोटे प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्था सोडवू शकतात पण उघडे नाले, नवीन नाले बांधणं, मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवणं ही कामं सरकारची असतात आणि त्यात हेल्थायझन हे ऍप मध्यस्थाची भूमिका निभावतं असं टीम म्हणते. विविध समस्यांवर स्थानिक राज्यकर्त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हेल्थायझन हे ऍप अधिकृतपणे काम करतं. असं यापूर्वी कधीही होत नव्हतं आणि हाच नेमका इतर ऍप आणि या ऍपमधला फरक आहे, असा या टीमचा दावा आहे.

लेखक – जय वर्धन

अनुवाद- सचिन जोशी

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags