संपादने
Marathi

ʻवुडगीकस्टोअरʼ, दैनंदिन जीवनात गरजेच्या असलेल्या लाकडी कल्पक वस्तूंचे भांडार

Ranjita Parab
14th Jan 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

लाकडापासून तयार करण्यात आलेली टिकाऊ खेळणी, विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू यांचे कायम आपल्याला आकर्षण असते. मात्र गॉगल्स, डायरी तसेच मोबाईल कव्हर यांसारख्या दैनंदिन जीवनात आपल्याला गरजेच्या असलेल्या वस्तूदेखील जर लाकडी स्वरुपात मिळाल्या तर. आजकालच्या फॅशनेबल जगात ही नक्कीच अभिनव आणि काहीशी हटके गोष्ट ठरू शकेल आणि ही गोष्ट साध्य केली आहे ती साईकेत साहा यांनी. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील साईकेत यांनी ʻवुडगीकस्टोअरʼ (Woodgeekstore) नावाचा स्टार्टअप सुरू केला असून, ते गॉगल्स, विविध प्रकारचे संदेश एम्बॉस केलेल्या डायरी तसेच लाकडी मोबाईल कव्हरची विक्री करतात.

image


लाकडापासून विविध गोष्टी तयार करण्याचा छंद असलेले साईकेत यांनी कालांतराने या व्यवसायात पदार्पण केले. लाकडाच्या बनावटीची प्रचंड आवड असलेल्या साईकेत यांनी नंतर त्यांच्या कारखान्यात या वस्तू घडवण्यास सुरुवात केली. विविध वस्तू मोठ्या प्रमाणात तयार करण्याचा सध्याचा कालखंड आहे. त्यात आपली वेगळी ओळख निर्माण व्हावी, म्हणून आम्ही लाकडी वस्तूंची विक्री करण्यास सुरुवात केल्याचे साईकेत सांगतात. खासगी आयुष्यात वापरता येतील, अशा वस्तू लाकडापासून तयार करण्याचे त्यांचे लक्ष्य होते. साईकेत यांच्या कुटुंबाचा प्लायवूड मॅन्युफॅक्चरींगचा व्यवसाय होता. कुच बेहर, पश्चिम बंगाल येथे असलेल्या कारखान्यात लाकडावर काम करण्याचा साईकेत यांना अनुभव होता, ज्याचा फायदा त्यांना ʻवुडगीकʼकरिता उत्पादने तयार करताना झाल्याचे ते सांगतात. कॉर्पोरेट क्षेत्रात देण्यात येणाऱ्या नेहमीच्या डायऱ्यांऐवजी लाकडी डायऱ्या तसेच प्रतिवर्षी भेटवस्तू म्हणून देण्यात येणाऱ्या कॅलेंडरच्या निर्मितीतून त्यांच्या या व्यवसायाला सुरुवात झाली. लाकडी वह्या आणि गॉगल्सचे पहिल्यांदा उत्पादन तयार करताना त्यांनी प्लायवूडचा वापर केला. मात्र ते ढोबळ आणि सहज तुटू शकत होते. अपेक्षित असे उत्तर न मिळाल्याने साईकेत यांनी या प्रकारावर अधिक मेहनत घेतली. शेजारी असलेल्या बांबू फ्लोरींगच्या कारखान्याला भेट देऊन त्यांनी पातळ बांबू पॅनेलपासून डायरी कव्हर बनवता येते का, याचा प्रयत्न केला. कोलकाता येथील इंडियन प्लायवूड इंडस्ट्रीज रिसर्च एण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्युटमध्ये या उत्पादनांच्या दर्जावर त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी आपल्या व्यवसायात सीएनसी राऊटर, लेझर कटर आणि अल्ट्रा व्हॉयलेट कोटींग तंत्रज्ञानाचा वापर करुन डिजिटल फॅब्रिकेशनला सुरुवात केली. आणि अखेरीस अपेक्षित असलेले उत्पादन तयार करण्यात साईकेत यशस्वी झाले.

image


आपल्या उत्पादनांबद्दल साईकेत सांगतात की, ʻआम्ही तयार करत असलेल्या खासगी डायऱ्या किंव्या वह्या या तुमच्या मागणीप्रमाणे तंतोतंत तयार करुन देण्यात येतात. त्यावर तुमचे नाव, तुमच्या आवडीचा एखादा संदेश किंवा तुम्हाला हवी असलेली माहिती त्यावर एम्बॉस करुन देण्यात येते. याशिवाय या डायरीसोबत एक बांबूचे पेन आणि ज्यूटची एक पिशवी देण्यात येते. आमच्या या डायऱ्या तयार करण्यासाठी पुनर्वापर करता येऊ शकेल, अशा कागदाचा वापर करण्यात येतो. आम्ही तयार करत असलेल्या गॉगल्सची फ्रेम ही पूर्णतः शुद्ध बांबूपासून तयार करण्यात येते. तसेच त्यात पोलराईज्ड यूवी लेन्सचा वापर करण्यात येतो. नैसर्गिक गोष्टींपासून तयार करण्यात आलेला हा गॉगल वजनाला हलका, पर्यावरणपूरक आणि आजच्या फॅशनला साजेसा असतो. बांबूपासून तयार करण्यात आलेली या गॉगलची फ्रेम मजबूत आणि वजनाला हलकी असते. या गॉगलचे वजन फक्त ९५ ग्रॅम्स एवढे असते. अल्ट्राव्हॉयलेट कोटींगमुळे दव आणि पावसामुळे या गॉगलचे संरक्षण होते. तसेच या कोटींगमुळे या गॉगलला चांगली चकाकी येते. काही निवडक स्मार्टफोन्सकरिता आम्ही स्मार्ट लाकडी कव्हरदेखील तयार केले आहेत. याकरिता आम्ही बांबूसोबत अक्रोड आणि शीसम लाकडाचा वापर करतो. तुम्हाला हवी असलेली नक्षी आम्ही या मोबाईल कव्हरवर एम्बॉस करुन देतो.ʼ, असे ते सांगतात. बांबू या लाकडाला आम्ही प्राथमिक स्त्रोत म्हणून पाहत असल्याचे ते सांगतात.

image


www.woodgeekstore.com या ऑनलाईन स्टोअरची स्थापना १ ऑक्टोबर २०१५ रोजी झाली आहे. स्थापनेपासून आतापर्य़ंत त्यांच्या या अभिनव व्यवसायाला लोकांनीदेखील भरभरुन दाद दिली, ज्यामुळेच पुढील काम करण्यास प्रेरणा मिळत असल्याचे साईकेत सांगतात. आपल्या टीमबद्दल बोलताना साईकेत सांगतात की, ʻमाझी टीम लहान आणि उत्स्फूर्तपणे काम करणारी आहे. माझी टीम ऑनलाईन स्टोअर, प्लायवूड मॅन्युफॅक्चरींग करणाऱ्या कारखान्यांशी समन्वय करण्याचे काम पाहते.ʼ आम्हाला आशा आहे की, पर्यावरणपूरक लाकडाप्रति आमचे असलेले प्रेम असेच कायम राहिल आणि नवनवी उत्पादने तयार करण्यास आम्हाला प्रेरणा देईल. वुडगीकच्या भविष्याबद्दल आम्हाला खूप उत्सुकता असल्याचे साईकेत सांगतात.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags