संपादने
Marathi

बालिका वधूंच्या अरबांना विक्रीविरोधात हैद्राबादच्या मशिदीत मतैक्य!

Team YS Marathi
5th Sep 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

काही दिवसापूर्वी, हैद्राबाद येथील अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार दिली की तिच्या मुलीचे लग्न ६५ वर्षाच्या ओमान येथील नागरिकाशी पाच लाख रूपये घेवून लावून देण्यात आले. त्या मातेला तिच्या बालवधूने मस्कत येथून संपर्क केला त्यानंतर पोलिसांना मदतीसाठी संपर्क केल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यानंतर पोलिसांनी सातत्याने त्या गाझीचा शोध सुरू केला,ज्याने हा लग्नविधी लावून दिला होता, त्यात हैद्राबाद मधील मशिदींना सहभागी करून घेतले आणि त्यांनी मिळून बालवधूंची लग्न लावून न देण्याचा संकल्प केला. या मशिदींनी करारपध्दतीने लावून देण्यात येणा-या लग्नांच्या संख्येत देखील कमी करण्याचे मान्य केले आहे. ज्यामध्ये पैश्यासाठी मुलींना त्यांच्या इच्छेविरूध्द लग्न करण्यासाठी दबाव टाकला जातो. याबाबत जनजागृती करण्यासाठी आवाहन अनेकदा करण्यात आली. याबाबत हैद्राबाद जिल्ह्याचे लहान मुलांचे संरक्षण अधिकारी इम्तियाज रहिम म्हणाले की, “आता परिणाम जाणवू लागला आहे, मात्र जुन्या शहराच्या काही भागात अश्या प्रकारची लग्न अजूनही लावून दिली जात आहेत. कारण मध्यस्थ आणि दलाल यांचा हा व्यवसाय आहे. गरीब कुटूंबाना पैश्याचे अमिष देवून ते बळी पाडतात, त्यासाठी त्यांच्या गाझींची देखील मदत घेतली जाते (जे लग्नविधी करून देणारे असतात)त्यांच्याकडून पैश्याचा प्रस्ताव दिला की, (वयस्कर नव-याकडून लग्नासाठी) वधूच्या गरीब कुटूंबियाना तो मान्य करावा लागतो.”


Image: Quartz

Image: Quartz


करार (मुट्टा) पध्दतीची लग्न शोधणे कठीण असते, कारण अश्या बहुतांश लग्न करून या लहान मुलींना विदेशात नेले जाते आणि नंतर याचा तपास थंड होतो. बहुतेकवेळा मुलींना विदेशात कामाच्या बहाण्याने देखील नेले जाते, त्यानंतर तेथे गेल्यावर म्हाता-या अरबांशी लग्न करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जातो, ज्यातून मग त्यांची कधीच सुटका होत नाही. यामध्ये ब-याचदा काय होते जे सर्वात जास्त अडचणीचे असते ते म्हणजे त्या मुलीचे जवळचे नातेवाईकच तिची विक्री करण्यात सहभागी असतात. एका वृत्तसंस्थेच्या हवाल्याने इम्तियाज असे म्हणाले की, “ मागील काळात आम्ही गाझींना अश्या प्रकारची लग्न लावून देण्याचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली. आता आम्ही त्यांना लग्न लावून देत असताना वधूच्या वयाचा दाखला देणे सक्तिचे करतो, आम्ही मशिदींना अश्या प्रकारची लग्न जुळवली जावू नयेत असे आवाहन देखील करण्यास सांगतो.”

सध्या त्या १६ वर्षीय मुलीला देशात परत आणण्यासाठी भारतीय प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Do you have an interesting story to share? Please write to us at tci@yourstory.com. To stay updated with more positive news, please connect with us on Facebook and Twitter.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags