संपादने
Marathi

तृतीयपंथी मॉडेल अंजली आम्मार, मामुट्टी यांच्या सिनेमाची आगामी अभिनेत्री!

Team YS Marathi
7th Feb 2017
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

ज्या समाजात तृतीयपंथीयाचे अधिकार ही फार दूरची गोष्ट समजली जाते, मॉलीवुड जगताने धाडसी उदाहरण घालून दिले आहे --- मल्याळम सुपरस्टार यांनी त्यांच्या आगामी सिनेमातून तृतीयपंथी मॉडेल अंजली आम्मारला पुढे आणण्याचे ठरविले आहे.


Anjali Ameer. Source: Southlive

Anjali Ameer. Source: Southlive


२१ वर्षीय कोइंबतूरची मॉडेल, जिने दोन वर्षीपूर्वी यशस्वीपणे लिंगबदल शस्त्रक्रिया केली आहे, ती ‘प्रेनाबू’ नावाच्या सिनेमाची तारका असेल असे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे. या प्रसिध्द अभिनेत्याने या बाबत फेसबूकवरून माहिती दिली आहे:

दोनच वर्षापूर्वी अंजली यांनी शस्त्रक्रिया करून लिंगबदल करून घेतला आहे. जगात अजूनही तृतीयपंथीयाना सन्मानाची वागणूक दिली जात नसताना त्यांनी वयाच्या १९व्या वर्षी यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली आहे, त्यावेळी त्या पदवी घेण्यासाठी बंगळूरूमध्ये राहात होत्या. त्यानंतरही अंजली यांचा त्यांचा लिंगा बाबतचा संघर्ष सुरुच ठेवावा लागला.

मॉडेलिंग मध्ये यशस्वी कारकिर्द केल्यानंतर आपल्या स्वप्नपूर्ती साठी अभिनेत्री म्हणून मल्याळी सिनेमात येणारी अंजली ही पहिली तृतीयपंथीय असेल. त्यांच्या सह कलाकारांबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “ मामुट्टी हे खूपच सहकार्य करतात”.

दिग्दर्शक सेनू रामस्वामी यांचे तमिळ प्रेनाबू यंदा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. मेगास्टारच्या या घोषणेचे त्यांच्या चाहत्यांनी स्वागत केले आहे आणि ते सिनेमाची आतूरतेने वाट पहात आहेत.

अलिकडेच अंजली लामा, आणखी एक तृतियपंथी कलावंत, यांनी लँक्मे फँशन विकमध्ये रँम्पवर चालून प्रथा परंपरा मोडीत काढल्या आहेत. समाजात सातत्याने लिंगभेदाचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा अशा प्रकारच्या कहाण्यातून आशा पल्लवित होतात. 

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags