आरोग्यादायी आहारासाठी अदिती गोखले यांचे ‘ऑल थिंग्स आॅर्गेनिक’

आरोग्यादायी आहारासाठी अदिती गोखले यांचे ‘ऑल थिंग्स आॅर्गेनिक’

Thursday July 14, 2016,

5 min Read

आपणासर्वांना आधुनिक आणि आरामदायी जीवनशैलीची सवय झाली आहे. ‘झटपट सारे काही’ अशी आपली मानसिकता झाली आहे. या आपल्या झटपट अपेक्षेमुळे उद्भवणारे अनेक धोके आपल्या लक्षात येत नाही असे भिन्न प्रकारच्या शोधातून आणि निष्कर्षातून जाहीर झाले आहे. हल्लीच एका शोधांतर्गत लक्षात आले आहे की आपण एक्रिलामाइ सारख्या विषारी पदार्थाचे खूप मोठ्या प्रमाणावर सेवन करत आहोत. अशा प्रकारचे केमिकल तळून ठेवलेल्या खाद्य पदार्थात, ग्रील करून खाण्यात येणाऱ्या पदार्थात, चिप्स, ब्रेड, बिस्किटं, क्रॅकर्स आणि अन्य प्रकारच्या नाश्त्याच्या प्रकारात आढळतात. या केमिकल्सच्या जास्त प्रमाणात होणाऱ्या सेवनाने आपल्या पचनशक्तीवर विपरीत परिणाम होतो. पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. आणि यापासून कॅन्सरसारखे भयंकर आजारही उद्भवू शकतात.

३६ वर्षीय अदिती गोखले एक आई म्हणून आपल्या मुलांना किती सुरक्षित आहार दिला पाहिजे हे जाणतात. अॅग्री बायोटेक क्षेत्रात कामाचा अनुभव असल्याकारणाने त्यांना माहिती आहे की विकसित देशात ताज्या उत्पादनांची गुणवत्ता राखण्यासाठी खास लक्ष पुरवले जाते. त्यांनी आपल्या याच कामाच्या अनुभवाचा उपयोग करून घेत व्यवसाय करायचे ठरवले आणि ‘ऑल थिंग्स आर्गेनिक’ च्या त्या सह-संस्थापक झाल्या. या संस्थेत काम करण्याचा त्यांचा मुख्य उद्देश होता सर्वांना सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण उत्पादनं उपलब्ध करून द्यावेत.

image


अशी झाली सुरवात

आयआयएम बंगळूरू येथून शिक्षण पूर्ण केलेल्या अदितीने नियोजन सल्लागार म्हणून बीसीजी आणि कॉर्न फेरी यांसारख्या कंपन्यांमध्ये महत्वाच्या पदावर काम केले होते. या काळात त्यांनी कंपनीत फक्त नियोजन सल्लागार म्हणूनच काम केले नाही तर त्या कामाच्या अंमलबजावणीसाठीही प्रयत्न केले. कंपनीत निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे आणि व्यवसाय वृद्धिगत करणे अशा भूमिका अदिती निभावत होत्या. या व्यतिरिक्त अदिती यांना आणखी काहीतरी करण्याची उर्मी होती. ज्यासाठी त्यांना स्वत: निवडलेल्या मार्गाने मार्गक्रमण करायचे होते. यासाठी म्हणून त्यांनी ताज्या उत्पादनांसाठी काम करणारी कंपनी माहिको बरोबर जवळपास चार वर्षे काम केलं. हे काम करत असताना त्यांनी युरोपमधील कंपनीचे देखील कामकाज पाहिले. या दरम्यान त्यांची ओळख मिंत्रा या कंपनीचे सीएमओ गुंजन सोनी यांच्याबरोबर झाली. जे आॅर्गेनिक खाद्याला प्राधान्य देणारे ग्राहक होते. जे आॅर्गेनिक फूड या क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याचा विचार करत होते. त्याचवेळी गुंजन यांच्या माध्यमातून अदिती यांची भेट अमन सिंघल यांच्याबरोबर झाली.

घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी आॅर्गनिक उत्पादनं तयार करण्याची एक शृंखला तयार करण्यात आली. ज्यामुळे ग्राहकांना हे कळेल की ते वापरत असलेले खाद्यपदार्थ कुठून येतात. अशा प्रकारे शेतातील मालाला थेट ग्राहकांपर्यंत जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. अदिती सांगतात की,” आम्ही विशेष उत्पादनांवर खास लक्ष केंद्रित केले आहे. ग्राहकांना सेंद्रिय, आरोग्यपूर्ण उत्पादनं घरपोच मिळावे यावर लक्ष केंद्रित केले.”

image


‘ऑल थिंग्स आॅर्गेनिक’ वेबसाईटची सुरवात सप्टेंबर २०१५ मध्ये झाली आणि त्यांच्या या पोर्टफोलिओमध्ये देशातील काही महत्वाच्या ब्रान्डचा समावेश करण्यात आला. यामध्ये 24 मंत्रा, आर्गेनिक इंडिया आणि इंडिफाइल यांसारख्या नावांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त यांचा स्वतःचा ब्रांड आहे ‘ ‘आॅर्गेनिक ओरिजिंस’(Organic Origins). जिथे ग्राहकांना विविध प्रकारचे आॅर्गेनिक उत्पादनं उपलब्ध केले जातात. यामध्ये फळे, भाजीपाला, किराणामाल यांचा समावेश आहे. फक्त खाद्यपदार्थच नव्हे तर सौंदर्यप्रसाधने, कपडे आणि घरगुती अन्य वस्तूही ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जातात.

इतरांपेक्षा असलेले वेगळेपण

‘ऑल थिंग्स आॅर्गेनिक’ या माध्यमातून मिळणारी उत्पादनं ही ताजी, सर्टिफाइड उत्पादनं असतात. याठिकाणी कोणीही ग्राहक फळभाजी उत्पादनांची माहिती व त्यांना मिळणाऱ्या अन्य उत्पादनांची माहिती घेऊ शकतो. गेल्या काही महिन्यांपासून ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांच्या या ब्रांडने तीन खास गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे.

१. मुलांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आवडणाऱ्या वस्तू

२. नित्य आहारातील व्यंजन, ज्याची सर्व कुटुंबाला गरज आहे.

३. आरोग्यदायी नाश्त्याची उत्पादनं तयार करणे.

अदिती यांचे म्हणणे आहे की, “ऑल थिंग्स आॅर्गेनिक फक्त शो केसमध्ये दिसणारा ब्रांड नाही, तर हा संपूर्ण जगभरात तयार होत असलेल्या दर्जेदार उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहे.” ज्या उत्पादनांच्या माध्यमातून नफा मिळेल फक्त अशाच उत्पादनांवर लक्ष केंद्रित न करता गरजू महिला आणि त्यांच्या गटांमार्फत तयार करण्यात येणाऱ्या दर्जेदार उत्पादनांवरदेखील लक्ष केंद्रित करत आहे, त्यांना आपल्या वेबसाईटवर विशेष स्थान उपलब्ध करून देत आहे.

या क्षेत्रातील स्पर्धेला सामोरे जाताना

पीडब्लूसी-फिक्कीच्या एका अहवालानुसार पोषक आहार आणि नाश्त्याच्या पदार्थांचा १० ते १२ टक्क्यांनी १४५०० ते १५००० कोटीच्या वेगाने विस्तार होत आहे. २००४ ते २०१३ मध्ये या क्षेत्रातील विक्री आठ हजार कोटी रुपयांनी वाढून ४७ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे. या आकडेवारी नुसार शहरी भागात या उत्पादनांना चांगली मागणी आहे. एफएमसीजीच्या या बाजारात अनेक प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे या बाजारात नव्याने व्यवसाय करू पाहणाऱ्यांना हा व्यवसाय इतका सोपा नाही.

‘ऑल थिंग्स आॅर्गेनिक’ यशस्वीपणे काम करत आहे. यामुळेच त्यांच्याकडे आजघडीला ७५ टक्के नियमित ग्राहक आहेत. या व्यवसायात अदिती आणि अमन सिंघल या दोघांनी मिळून गुंतवणूक केली. तसेच गुंजन सोनी आणि एस के टुटेजा यांनीदेखील काही प्रमाणात गुंतवणूक केली आहे. या कंपनीच्या व्यतिरिक्त एस के टूटेजा हे अन्य काही भारतातील खाजगी कंपन्यांच्या महत्वपूर्ण पदावर कार्यरत आहे. कंपनीचा अधिक विस्तार करण्यासाठी कंपनीचे संस्थापक अधिक गुतंवणूक करण्यास प्रयत्नशील आहे.

सध्या दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी काम सुरु आहे. अदिती आणि त्यांच्या टीमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त ग्राहकांना दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देणे. त्यांना २० हजार अशा कुटुंबापर्यंत पोहोचायचे आहे, जे महिन्याकाठी चार हजार रुपये खर्च करतात. अदिती सांगतात की, “ या व्यवसायात माझा अनुभव फारच चांगला आहे. मी समाधानी आहे. काही महिन्यांपूर्वी अनेक आव्हानांचा मी सामना केला. मात्र दिवसेंदिवस मी पाहिलेले स्वप्न मोठ्या प्रमाणात साकार होताना दिसत आहे. माझे म्हणणे असे आहे की, ग्राहकांचे हित लक्षात ठेवून अधिकाधिक प्रयत्न करा, यश तुमचेच आहे.”

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

मानवी हस्तक्षेपामुळे उद्भवलेल्या समस्या सोडविणारी झिरो बजेट नैसर्गिक (अध्यात्मिक) शेती, एक वरदान

आत्मसंतुष्ट न होता, सतत नव्याचा ध्यास असलेल्या यशस्वी उद्योगिनीची कथा

पंकज नवानी यांच्या ʻबिन्सर फार्म्सʼचा प्रेरणादायी प्रवास

लेखिका : प्रतीक्षा नायक

अनुवाद : नंदिनी वानखडे-पाटील