संपादने
Marathi

वैद्यकीय पर्यटनामुळे रुग्णालये झाली मालामाल!

Team YS Marathi
25th Jan 2017
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

अमेरिकेच्या तुलनेत भारतात मोठ्या आजारावरील उपचार ८०टक्के स्वस्तात होतात, त्यामुळे तेथील नागरीक भारतात येवून उपचार घेणे पसंत करतात. केवळ अमेरिकाच नाहीतर जगभरातील रुग्णाईत गेल्या सहा-सात वर्षांपासून भारतात इलाज करुन घेण्यासाठी येत आहेत, कारण युरोप किंवाअमेरिकेपेक्षा आपल्या देशात अत्याधुनिक चिकित्सा खूपच कमी खर्चात उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षांत दिल्ली, एनसीआर, चंडीगढ, मुंबई, बेंगळुरु आणि चेन्नई येथील रुग्णालयांच्या उलाढालीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यांचे कारण आहे देशात वाढणारे वैद्यकीय पर्यटन!

“भारताचा वैद्यकीय पर्यटनाचा कारभार पन्नास अब्ज रुपयांचा आकडा केंव्हाच पार झाला आहे, अमेरिका आणि युरोपातील देशांच्या तुलनेत येथे स्वस्त, अत्याधुनिक आणि पांरपारीक चिकित्सा सेवा उपलब्ध असल्यान जगाच्या नकाशात भारत वैद्यकीय पर्यटनाच्या बाबतीत उदयोन्मुख केंद्र म्हणून पुढे येत आहे”.


image


“ गेल्या काही वर्षांत रास्त दराने चागली चिकित्सा सुविधा देत असल्याने इतर देशांच्या तुलनेत भारतात येणा-या रुग्णाईतांची संख्या वाढली आहे, पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०१६च्या जून महिन्यापर्यंत ९६८५६ विदेशी नागरीक भारतात आले, २०१३मध्ये वैद्यकीय विजावर ५६१२९ विदेशी नागरीक आले होते. २०१४मध्ये त्यांची संख्या ७५६७१ होती. तर २०१५ मध्ये ती वाढून १३४३४४ झाली, त्यात सर्वाधिक संख्या बांगलादेशातून येणा-यांची आहे.

वैद्यकीय पर्यटनाची सुरुवात कमी खर्च आणि चांगले उपचार मिळत असल्याने झाली. देशात पर्यटनाचा मोठा उद्योग आहे. त्याचा मोठा वाटा सकल राष्ट्रीय उत्पन्नात आहे. पर्य़टनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालय नोडल एजंसी म्हणून काम करते. त्यात अत्युल्य भारत अभियानाचा समावेश आहे. सद्यस्थिती पाहता येत्या काळात देशात परदेशातून येणा-या पर्यटकांची संख्या वाढतच राहणार आहे. जागतिक चिकित्सा उद्योगातही भारताचे स्थान महत्वाचे आहे. एका सर्वेक्षणानुसार देशात विदेशी मुद्रा पर्यटनाच्या माध्यमातून तीस हजार कोटी रुपये इतकी येते. विदेशात चिकित्सा विम्याच्या परिघात येणारे आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, इत्यादी सर्व प्रकारचे उपचार देशात उपलब्ध आहेत, त्यासाठी विदेशी रुग्णांना सहजपणे विजा देखील उपलब्ध होतो.

“ भारतात बोनमॅरो प्रत्यारोपण, बायपास सर्जरी, गुडघ्याची सर्जरी, तसेच यकृताचे प्रत्यारोपण या उपचारांचा खर्च पश्चिमी देशांच्या तुलनेत कमी आहे. त्याशिवाय देशात दहा लाखापेक्षा जास्त कुशल डॉक्टर्स आणि लाखो प्रशिक्षित परिचारिका आहेत”.


image


कोरियातून दिल्लीत आलेल्या रेहाना यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या नाकाचा उपचार केला. त्यासाठी भारतात ३५ हजार रुपये खर्च झाला. तर त्यांच्या देशात ६०-७० हजार रुपये खर्च येणार होता. बोन मँरो प्रत्यारोपणाला अमेरिकेत दोन लाख डॉलर्स लागतात, ब्रिटनमध्येही जवळपास तेवढाच खर्च होतो, थायलंडमध्ये ६२५०० डॉलर्स लागतात तर भारतात याच उपचारांना २० हजार डॉलर्स पुरेसे असतात. अशाच प्रकारे बायपास सर्जरीला अमेरिकेत १५-२० हजार डॉलर्स, ब्रिटन मध्ये २०हजार डॉलर्स, थायलंडमध्ये १५ हजार डॉलर्स, तर भारतात ४ते६ हजार डॉलर्स इतका खर्च होतो. गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी अमेरिकेत २०हजार डॉलर्सचा खर्च येतो तर भारतात त्यावर केवळ हजार डॉलर्सच्या आसपास लागतात. दिल्ली, बंगळूरू, चेन्नई हैद्राबाद आणि मुंबई येथील अनेक खाजगी रुग्णालयात इतर देशातून बहुतांश रुग्ण येत असतात.

“ वैद्यकिय पर्यटनाशी संबंधित बाजारावर नजर टाकली तर, चिकित्सा उपकरणांच्या आयातीच्या क्षेत्रातही देशात वापरले जाणारे ७५ टक्के उपकरण विदेशातून आयात होतात, या उपकरणांच्या केंद्रीत औषध मानक नियंत्रण संस्था (सीडिएससिओ) व्दारे औषध तसेच प्रसाधन सामुग्री नियमावली १९४५ च्या आधीन राहून नियंत्रण केले जाते.” “चिकित्सा पर्यटनाच्या माध्यमातून भारतात येवून ताजमहाल आणि लालकिल्ला बघण्यासोबतच शस्त्रक्रिया करून घेण्याचा पर्याय विदेशी नागरिकांना आवडू लागला आहे, भारत वैद्यकिय पर्यटनाच्या बाबतीत मलेशिया, थायलंड, सिंगापूर, सारख्या देशांना मागे टाकत आहे. या पर्यटनाचा बाजार प्रतिवर्षी दोन अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त उड्डाण करत आहे. दिल्ली चंडिगढ, मुंबई बेंगळूरू आणि चेन्नईच्या अत्याधुनिक चिकित्सा केंद्राना तर चांगला नफा देखील यातून मिळतो आहे”.

विदेशातून सातत्याने रुग्ण येत आहेत. त्यात सर्वाधिक अमेरिका, ब्रिटन, रशिया, इराक, अफगणिस्थान येथील असतात. कारण हेच आहे की भारतात शस्त्रक्रियेच्या खर्चासहीत येण्याजाण्याचा विमान खर्च वजा केला तरी विदेशातील खर्चाच्या तुलनेत खूपच कमी खर्चात उपचार उपलब्ध आहेत. विशेषत: आखाती देशांसाठी भारत चिकित्सा पर्यटन उद्योगाचे केंद्र बनत आहे. मोठ्या प्रमाणात लोक उपचारांसाठी येत असतात. अपेक्षा आहे की या क्षेत्रातील उलाढाल २०२० पर्यंत २८० अब्ज डॉलर्स होईल. त्यामुळे आता स्टार्टअपची नजर विदेशी रुग्णांवर आहे. त्यामुळे या क्षेत्रात स्टार्टअपच्या रोजगार संधी निर्माण होत आहेत. मागील वर्षभरात असे अनेक स्टार्टअप तयार होत आहेत, ते विदेशातून येणा-या पर्यटक रुग्णांना त्यांच्या हिशेबापासून चांगले रुग्णालय मिळवून देण्यापर्यंत मदत करतात. रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहिती पासून येणे जाणे, मुक्काम आणि खाण्या-पिण्याच्या बंदोबस्तापर्यंतच्या सेवा देत आहेत, त्याशिवाय पर्यटन आणि शॉपिंगची देखील व्यवस्था करून देत आहेत.

डिस्क्लेमर: तज्ञांच्या सल्ल्याने हा लेख देण्यात आला आहे, Marathi.yourstory.com स्वत:हून कोणताही सल्ला देत नाही. कृपया योग्य माहिती आणि संदर्भासाठी चिकित्सा पर्यटन विभागाशी संपर्क साधावा.

लेखिका : रंजना त्रिपाठी

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags