संपादने
Marathi

शिवरायांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रातील प्रश्न सोडवून राज्याचा विकास करू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Team YS Marathi
26th Feb 2017
Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने आम्हाला राज्यात चांगला विजय मिळाला असून यापुढे देखील राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी शिवरायांच्या प्रेरणेतून आम्ही काम करीत राहू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


image


राज्यात नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदांमधील विजयानंतर मुख्यमंत्री हे मंत्र्यांसमवेत आज शिवछत्रपतींना अभिवादन करण्यासाठी सकाळी रायगड किल्ल्यावर दाखल झाले. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार प्रशांत ठाकूर, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, रायगड जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, हे ही उपस्थित होते.


image


महाड येथे हेलिपॅडवर आगमन झाल्यावर मुख्यमंत्री रायगड किल्ल्याकडे रवाना झाले. त्यानंतर रोपवेने गडावर येऊन मुख्यमंत्र्यांनी प्रथम मेघडंबरी येथे छत्रपतींचे दर्शन घेतले. होळीचा माळ येथील शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले आणि काही वेळ त्याठिकाणी थांबून शिवरायांचे स्मरण केले.


image


सौजन्य : महान्युज

Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags