संपादने
Marathi

फॅशन सर्वांच्या आवाक्यात आणण्याचं स्वप्न !

‘हॅशटॅग फॅशन’ आणि ‘कपकेक्स अॅण्ड क्लोजेट’

Pravin M.
13th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

आज फॅशन जगतामध्ये अनीशा दलाल, नीराली मालजी आणि पल्लवी दुग्गल अशा महिला उद्योजिकांची एक वेगळी ओळख आहे. फॅशनची प्रचंड आवड असल्यामुळे त्या या क्षेत्रात आल्या. पण फॅशनच्या आवडीसोबतच त्यांची एक जिद्द होती. अगदी प्रत्येकाच्या आवाक्यात नवीन फॅशन आणणे. आणि यासाठीच पल्लवी दुग्गल यांनी ‘हॅशटॅग फॅशन’ सुरु केली, तर अनीशा दलाल आणि नीराली मालजी या दोघींनी मिळून ‘कपकेक्स अॅण्ड क्लोजेट’ची सुरुवात केली. पल्लवी सांगतात, “जरी तुमचं लक्ष्य खूप दूर असलं आणि तिथपर्यंत पोहोचायचा प्रवास खडतर असला, तरी गरज असते ती फक्त एकेक पाऊल तोलून मापून उचलण्याची.”


image


पल्लवी दुग्गल आणि ‘हॅशटॅग फॅशन’

पल्लवी दुग्गल यांनी २०१४ मध्ये ‘हॅशटॅग फॅशन’ची सुरुवात केली. त्यांनी महिलांना आपल्या कमतरतांपेक्षा आपल्यातल्या चांगल्या गोष्टी ध्यानात ठेऊन कपडे आणि फॅशन करण्यासाठी प्रेरित केलं. खरंतर पल्लवी दुग्गल एका परंपरावादी, रुढी आणि चालीरितींचा पगडा असलेल्या कुटुंबात वाढल्या. पण करिअर निवडताना मात्र त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या सीए बनण्याच्या इच्छेविरूद्ध फॅशन विश्वात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला.

पल्लवी दुग्गल यांनी या प्रवासाची सुरुवात ‘लंडन कॉलेज ऑफ फॅशन’च्या स्कॉलरशीपने केली. इथे सहा महिन्यांचा कोर्स केल्यानंतर फॅशनचा अधिक अभ्यास करण्यासाठी त्या ‘पार्सन’ला गेल्या. तिथे आपला खर्च भागवण्यासाठी त्यांनी ‘ब्ल्युमिंगडेल्स’मध्ये इंटर्नशीपही केली. आणि इंटर्नशीपनंतर पल्लवी ‘ब्ल्युमिंगडेल्स’मध्येच नोकरी करु लागल्या. ‘ब्ल्युमिंगडेल्स’मध्ये त्यांनी व्यवसाय नियोजन, वितरण आणि व्यवसायातले आर्थिक घटक शिकून घेतले. न्यूयॉर्कमध्ये काम केलेल्या याच दोन वर्षांत त्यांच्या असं लक्षात आलं की भारतात फॅशनेबल पण स्वस्त कपड्यांची कमतरता आहे.

पल्लवी सांगतात की, “न्यूयॉर्कमध्ये असताना भारतात आपल्या नातेवाईकांना त्या भरपूर फॅशनेबल कपडे पाठवत होत्या. पण ते पाठवताना करावी लागणारी मेहनत आणि विमानतळावरही खूप पैसे त्यांना भरावे लागत होते. त्यातून त्यांच्या मनात ‘हॅशटॅग डॉट इन’ सुरु करण्याचा विचार आला. सुरुवातीच्या काळामध्ये खर्चाचं व्यवस्थापन, खरेदी, साठवण, वाहतूक, डिजाईनशी संबंधित नवनव्या कल्पना आणि मार्केटिंगही त्यांना स्वत:लाच करायला लागत होतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या ब्रॅण्ड्ससोबत काम करणा-या कंपन्यांकडून त्यांना कपडे खरेदी करावे लागले. मात्र आता त्यांचा असा दावा आहे की त्यांची उत्पादनं किंवा नक्षीकाम इतर कोणत्याही नावाजलेल्या स्टायलिश फॅशन उत्पादनाच्या तोडीस तोड आहेत.”

या कामाची प्रेरणा कुठून मिळाली असं आम्ही त्यांना विचारलं. तर त्या म्हणाल्या, “एखाद्या महिलेने चांगले उंची कपडे घातले तर ती सुंदर दिसते. त्यामुळे तिच्यात नक्कीच आत्मविश्वास निर्माण होतो. आणि महिलांमध्ये निर्माण होणा-या याच आत्मविश्वासामुळे मला आनंद मिळतो.” इतर महिलांच्या चेह-यावर आनंद पाहून त्यांना आणखी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा मिळते.

image


‘कपकेक्स अॅण्ड क्लोजेट’..अनीशा दलाल आणि नीराली मालजी यांचं स्वप्न

अनीशा दलाल आणि नीराली मालजी या अगदी लहानपणापासून जिवलग मैत्रिणी. लहानपणापासून प्रत्येक महत्त्वाचा निर्णय त्यांनी सोबतच घेतला. मग व्यवसाय तरी कसा मागे रहाणार. आज त्या दोघीही ‘कपकेक्स अॅण्ड क्लोजेट’च्या भागीदार आहेत. दोघींचा एकमेकींवर खूप जीव. असंच फॅशनबद्दल फोनवर झालेलं बोलणं पुढे एका फेसबुक पेजमध्ये अवतरलं आणि त्यातूनच पुढे जाऊन उभं राहिलं ‘कपकेक्स अॅण्ड क्लोजेट’चं ऑफिस. फॅशनपर्यंत या दोघींनाही पुरेश माहिती होती. मात्र त्यापलीकडे जाऊन त्यांनी व्यवसायाचं कोणतंही औपचारिक शिक्षण घेतलं नव्हतं. मात्र तरीही त्यांनी आपली कल्पना, आपल्या स्वप्नाची पाठ सोडली नाही आणि २०११ मध्ये अस्तित्वात आली ‘कपकेक्स अॅण्ड क्लोजेट’.

अनीशा दलाल आणि नीराली मालजी

अनीशा दलाल आणि नीराली मालजी


अनीशा आणि नीराली या दोघींनी काही मोजक्या फॅशन उत्पादनांचा संग्रह आपल्या फेसबुक अकाऊंटवर अपलोड केला. त्यांच्या या पोस्टला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आणि अवघ्या एका दिवसात सगळे उत्पादनं विकले गेले. इथेच त्यांना या व्यवसायात उत्तम संधी दिसली आणि फॅशन क्षेत्रामध्येच व्यवसाय करण्याचा त्यांनी गांभीर्यानं विचार केला. विशेष म्हणजे नीराली बँकिंग, विमा आणि कायद्याची पदवीधर आहे, तर अनीशा केमिकल इंजिनिअर आहे. या दोघी मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात, “आम्ही अवघ्या २० व्या वर्षी फॅशन उद्योगात पहिलं पाऊल ठेवलं. आम्हाला कोणताही अनुभव नव्हता. आमच्याकडे ना कुठलं ऑफिस होतं, ना कुठली गुंतवणूक. आमच्याकडे स्वत:कडे कोणती एमबीएची डिग्री नव्हती आणि आमच्यासोबत कुणी एमबीए डिग्री घेतलेली व्यक्तीही मदतीला नव्हती. शिवाय एवढी मोठी जोखीम उचलण्याचं आमचं वयही नव्हतं. पण आम्ही फक्त पुढे पुढे जात राहिलो आणि जे अशक्य वाटत होतं, ते करुन दाखवलं.”

पण कंपनीसाठी योग्य व्यक्तींना निवडताना त्यांना फार अडचणींचा सामना करावा लागला. फार प्रयत्न केल्यानंतर त्यांना काही योग्य माणसं मिळाली आणि आज स्थापनेपासून चार वर्षांनंतर ‘कपकेक्स अॅण्ड क्लोजेट’कडे आठ जणांची उत्तम टीम आहे. “निवड करणा-याच्या दृष्टीकोनातून तुम्हाला सर्वप्रथम एक गोष्ट निश्चित करावी लागते, ती म्हणजे नवीन कामावर येणा-या माणसांना आनंदात काम करता यायला हवं. कारण आज त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळे आम्ही नेहमीच कंपनीत असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतो ज्यात सर्वजण एका कुटुंबाप्रमाणे काम करु शकतील.”

नव्या उद्योजकांनाही अनीशा आणि नीराली काहीतरी सांगू इच्छितात. त्या म्हणतात, “तुम्ही भलेही अगदी छोट्या पातळीवर काम सुरु करा. पण तुमच्या व्यवसायातल्या अगदी एकूण एक गोष्टीमध्ये पारंगत होण्यावर जोर द्या. जसजसा वेळ जाईल, तसतसा व्यवसायाचा आकार आणि आवाका आपोआप वाढेल. ”

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags