अमेरिकेतील शाळा गळतीच्या समस्येशी लढताना ‘फ्यूचर प्रोजेक्ट’ ने तीस हजार विद्यार्थ्यांची मदत केली आहे

अमेरिकेतील शाळा गळतीच्या समस्येशी लढताना ‘फ्यूचर प्रोजेक्ट’ ने तीस हजार विद्यार्थ्यांची मदत केली आहे

Tuesday July 18, 2017,

2 min Read

एखादे मूल लहानाचे मोठे होते ते याच समजात की मोठे होणे म्हणजे जास्त गुण मिळवणे होय. या मुलाच्या हे इतके अंगवळणी पडते की, चांगले गुण म्हणजेच आनंद आणि परिपूर्णता असे ते या प्रक्रियेत समजू लागते. मग ते स्वप्न कशी पहायची ते विसरून जाते. ‘फ्यूचर प्रोजेक्ट’ अमेरिकेतील अशा मुलांना मदत करते त्यांच्या संस्थापकांचे स्वप्न आहे की, अशा मुलांना मदत करून त्यांच्या यशाची परिभाषा बदलता येते. त्यांच्यातील क्षमतांचा विकास करून जीवन बदलता येते आणि त्यांच्या अंगभूत हुशारीतून स्वप्न पूर्ण करता येतात.

ऍन्ड्र्यू मॅन्गिनो आणि कानया बालकृष्ण दोघेही येल विद्यापिठाचे विद्यार्थी आहेत, त्यांनी फ्यूचर प्रोजेक्टची २०११मध्ये स्थापना केली. या प्रकल्पातून पूर्णवेळ मार्गदर्शक म्हणून ते शाळा चालवितात, ज्याचे नाव ड्रिम डायरेक्टर्स आहे. ज्यांना प्रशिक्षित करण्याचे आणि चालविण्याचे काम फ्यूचर प्रोजेक्ट करते. हे मार्गदर्शक वेगवेगळ्या पार्श्वभुमीतून आलेले आहेत, अगदी कवींपासून शास्त्रज्ञांपर्यंत आणि ते लहान मुलांसोबत काम करतात, त्यांना प्रोत्साहन देतात आणि प्रेरणा देतात. 

Image: The Huffington Post

Image: The Huffington Post


ज्यावेळी दोन्ही संस्थापकांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात येल डेली न्यूज मधून सुरूवात केली, त्यांना वास्तव समजले आणि समाजाची काही परतफेड करावी म्हणून काही करावे असे त्यांना वाटले. मात्र सुरूवातीला शाळांना हे समजावणे कठीण होते की, त्यांनी त्यांना मार्गदर्शक म्हणून काम करू द्यावे, कारण ते अभ्यासक्रमातील गुण किंवा श्रेणीवाढ करण्यासाठी काही करणार नव्हते. असे असले तरी सुरूवातील त्यांनी पाचशे विद्यार्थ्यांपर्यत जाण्यात यश मिळवले. आणि आता त्यानी ३०हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या जीवनावर प्रभाव टाकण्यात यश मिळवले आहे. ज्यांचा समाजाच्या घडणीत मोठा हातभार लागत आहे. कान्या यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “ आम्ही या गोष्टीच्या कल्पना करू लागलो की तरूणांच्या मनात काय विचार येत असतील, आणि ते मोठी स्वप्न पाहून त्यासाठी कसे मार्ग निर्माण करतील. त्यांना खरोखर कोणत्या विषयात रस आहे, जेणे करून ते त्यांची स्वप्न सत्यात आणू शकतील जे ते शाळेत शिकलेल्या शिक्षणा व्यतिरिक्त करू शकतात. आम्ही अशा प्रकारच्या कल्पनांची पध्दत निर्माण केली जी लोकांना शिकवेल की, धोका पत्करून धाडस कसे करावे. आपल्या कल्पना, छंद, वेड आणि नेतृत्व कशाप्रकारे करावे आणि कशा प्रकारच्या प्रेरणा निर्माण कराव्या ज्या परिपूर्ण असतील.”

या प्रकल्पाला वेगळे कशाने बनविले असेल तर त्यांच्या तळागाळातील संपर्काने, जो लहानग्यांना त्यांच्यासाठी काय हवे ते पाहतो, आणि मोठ्यांच्या मनाने नाही, तर जे ते लहानांवर थोपवू पाहतात.