संपादने
Marathi

रजनी बेक्टरना उद्देशून जेव्हा अब्दुल कलाम म्हणाले होते ‘ओह… दॅट यू आर दी आइस्क्रिम लेडी’

Chandrakant Yadav
6th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

बेकरी आणि स्नॅक्सचे उत्पादन करणाऱ्या ‘क्रिमिका’च्या व्यवस्थापकीय संचालिका रजनी बेक्टर यांना आज कोण ओळखत नाही. रजनी यांचा जन्म फाळणीपूर्व हिंदुस्थानात कराचीला झाला. रजनी यांचे वडील सरकारी नोकरीत होते. फाळणीनंतर ते दिल्लीला आले. वयाच्या सतराव्या वर्षी रजनी यांचे लग्न लावून दिले. १९५७ ची ही गोष्ट. लुधियानातील एका व्यापारी कुटुंबात सून म्हणून रजनी यांचा संसार सुरू झाला. तो काळ स्वातंत्र्योत्तर असला तरी स्त्री स्वातंत्र्याची पहाट अजून उगवायची होती. सुदैवाने रजनी यांच्या सासरची मंडळी पुरोगामी विचारांची होती. रजनीवर त्यांनी त्या काळातली बंधने घातली नाहीत. लग्नानंतर रजनीने पदवीचे शिक्षण पूर्ण केले, यातच सारे काही आले. रजनी यांना सुरवातीपासूनच वेगवेगळे पदार्थ करून इतरांना खायला घालण्याचा छंद होता. छंदही पुरा होईल आणि काहीतरी नवे शिकायलाही मिळेल म्हणून त्यांनी पंजाब कृषी विद्यापीठात ‘बेकिंग’चा कोर्स केला.

स्वैपाकासाठीचा सराव… खायला सारे गाव

मला स्वैपाकातून मनस्वी आनंद मिळे. कुणाची भेट झाली, की माझ्याकडून जेवणाचे आमंत्रण हमखास असायचे. खाऊ घातल्याचे समाधान नव्हतेच असेही नाही. पण माझी ‘रेसिपी’ कशी झाली, हे जाणून घेणे हा त्यामागचा मुख्य हेतू असायचा. शिवाय आमच्याकडल्या तरणतलावात लहान मुलांना पोहण्यासाठी बोलवून त्यांच्या पुढ्यात मी बेक केलेले केक आणि कुकीज हमखास वाढत असे. मुलांनी आणखी मागितले म्हणजे मी समजायचे की अर्रे वा! केक चांगले झाले आहेत.’’

कौतुकही झाले अन् पैसेही मिळाले

रजनी आइस्क्रिमही बनवत. आप्तस्वकीयांमध्ये रजनीमेड केक-कुकीज आणि आइस्क्रिमचा आता बोलबाला झालेला होता. तुम्ही हे विका… तुमच्या हाताला स्वाद आहे, या सल्ल्यातून रजनीने पहिला गल्ला टाकला तो स्थानिक आनंद मेळ्यात. कौतुकही झाले आणि पैसेही चांगले मिळाले. मागे वळून मग पाहिले नाही. दिवसागणिक व्यवसायाचा गुणाकार सुरूच राहिला.

image


स्वादाचा सुगंध दरवळला…

रजनी सांगतात, की त्यांनी बनवलेले स्नॅक्स चवीने खाल्ले जात. आइस्क्रिम तर विशेष चवीने. कॅटरिंगची कामे चालून येऊ लागली. मग त्यांनी आपल्या स्वैपाकघरातील एक लहानसे ओव्हन आणि ३०० रुपये भांडवल एवढ्या बळावर आपल्या छंदाला धंद्याचे रूप दिले. लवकरच स्वादाचा हा सुगंध परिसरात दरवळू लागला. समारंभांसाठी खास ऑर्डर रजनी यांना मिळू लागल्या.

अर्थात रजनी अद्याप व्यवसायात मुरलेल्या नव्हत्या. चांगल्या दर्जाचा सामान आणून अत्यंत कमी किमतीत त्या पदार्थ बनवून देत. बहुतेक व्यवहारांतून त्यांना तोटाच होई. पती महाशयांनी मग रजनी यांना सल्ला दिला, की नेमकेपणाने व व्यावसायिक पद्धतीने हे काम केले तरच उपयोग आहे अन्यथा सारे व्यर्थ आहे.

image


रजनी बेक्टर

‘‘१९७८ मध्ये मग २० हजार रुपये गुंतवणुकीच्या जोरावर घरातल्या गॅरेजमध्येच एक छोटेसे आइस्क्रिम युनिट त्यांनी सुरू केले. आता मोठ्या ऑर्डरही येऊ लागल्या. माझी कार्यक्षमता, आत्मविश्वास वाढलेला असल्याने मी त्या घेऊही लागले. पदार्थांमध्ये मी क्रिमचा वापर जरा जास्तच करते आणि यातूनच कंपनीचे नावही मी ‘क्रिमिका’ असेच ठेवले.

रजनीमेड आइस्क्रिम कमालीचे यशस्वी झाले. पुढे जीटी रोडवर रिकाम्याच असलेल्या पिढीजात मालकीच्या एका जागेत त्यांनी ब्रेड आणि बिस्किट बनवण्याचे युनिटही सुरू केले. बँकेतून त्यासाठी त्यांनी कर्जही उचलले. सगळी उपकरणे नवी खरेदी केली. रजनी म्हणतात, ‘‘गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड मी कधीच केली नाही. यंत्रसामग्रीपासून ते कच्च्या मालापर्यंतचे सारे बारिकसारिक तपशील मी तपासलेले असतात.’’

अवघे कुटुंब रंगले ‘क्रिमिका’त

१९९० हे वर्ष उजाडत असताना पंजाबात दहशतवादाने टोक गाठलेले होते. यजमानांचा पिढीजात व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर होता. तोवर ‘क्रिमिका’च्या व्यवसायाने ५ कोटी पार केलेले होते. मग यजमानांनीही रजनी यांच्या व्यवसायातच लक्ष घालायला सुरवात केली. तिन्ही मुलेही ‘क्रिमिका’च्या कामकाजात आपापल्या भूमिका पक्क्या केल्या.

संपूर्ण परिवारच भिडलेला होता. मग काय! वर्षाकाठी २० कोटी रुपये या व्यवसायातून हाती येऊ लागले. पुढे २० कोटीही पार केले. १९९५ मध्ये भारतीय बाजारपेठेत खाण्या-पिण्याचे परदेशी

ब्रँड दाखल होऊ लागलेले होते. याच कालावधीत ‘क्रिमिका’ आणि रजनी बेक्टर यांनी जगाला आपल्या चवीचा गुलाम बनवून घेतलेले होते.

‘मॅकडोनॅल्ड’को पाना मुश्किलही सही मुमकीन है!

‘‘१९९५ मध्ये ‘मॅकडोनॅल्ड’ही दाखल झालेले होते. स्थानिक पुरवठादारांच्या शोधात ही कंपनी होतीच. ‘बर्गर’साठी आमचा अर्ज होता आणि आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जा गाठताना खूप कष्ट उपसले आणि आमचा बर्गर या दर्जाचा ठरला. निवड झाली. इतक्या लब्धप्रतिष्ठित कंपनीशी आपण करार करतोय म्हटल्यावर आत्मविश्वास सातव्या आकाशाला भिडलेला होता. लवकरच आम्ही ‘मॅकडोनॅल्ड’साठी ब्रेड आणि टोमॅटो सॉसही बनवायला आणि पुरवायला लागलो.’’

रजनी यांचा विश्वास आहे…

‘‘खाण्या-पिण्याच्या व्यवसायात गुणवत्तेचा उच्च दर्जा प्राप्त करणे आणि तो कायम ठेवणे हे खरोखर एक मोठे आव्हान आहे. वापरावयाचे पदार्थ (कच्चा माल) निवडताना तुम्ही अजिबात तडजोड करू नका. ठरवून टाका मी हेच वापरेन. तुमचा व्यापार वाढलाच म्हणून बेधडक समजा.’’


पंजाबव्यतिरिक्त मुंबई आणि ग्रेटर नोएडामध्येही ‘क्रिमिका’चे अत्याधुनिक आणि स्वयंचलित प्लँट आहेत. कंपनीची उलाढाल या घडीला ७०० कोटी रुपयांवर गेलेली आहे. ४००० हून अधिक कर्मचारी विविध कारखान्यांतून कार्यरत आहेत.

image


व्यापार जगतातील योगदानाबद्दल रजनी यांना कितीतरी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्क़ार प्राप्त झालेले आहेत. रजनी यांना सारेच पुरस्कार महत्त्वाचे वाटतात, पण २००५ मध्ये तत्कालिन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते प्राप्त झालेला पुरस्कार त्यांना आगळा वाटतो. अब्दुल कलाम रजनी यांना उद्देशून म्हणाले होते… ‘‘ओह… दॅट यू आर आइस्क्रिम लेडी!’’

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags