संपादने
Marathi

फॅशन, फन, फ्रेंड्स यांना एकत्र आणणारे ʻऑलमेमॉर्सʼ

Team YS Marathi
17th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

एक असे स्टार्टअप जे वर्तमानकाळातील फॅशनसंबधी, भेटवस्तूसंबंधी आणि गंमतीशीर आहे, असे वर्णन मृगांक शेखर आणि कुश श्रीवास्तव आपल्या ʻऑलमेमॉर्सʼ या सोशल कॉमर्स स्टार्टअपचे करतात. ʻआम्हाला खरेदी या विषयातील तीन एफ म्हणजेच फॅशन, फन आणि फ्रेंडस, हे ऑलमेमॉर्स नामक एकाच छत्राखाली आणायचे होतेʼ, असे त्यांनी युअरस्टोरीशी बोलताना सांगितले. एक वर्षापेक्षा कमी कालावधीचे असलेले ʻऑलमेमॉर्सʼने सध्या उत्पादनाचा वैधता स्तर पार केला आहे. त्यांच्या मोबाईल एप्लिकेशनला आतापर्यंत २५ हजार लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे. गेल्या महिन्यातच त्यांच्या आयफोन ʻगिफ्ट आयडीयाʼने भारतातील टॉप १० जीवनशैलीच्या श्रेणीत स्थान पटकावले होते. त्या यादीत त्यांच्यासोबत फिल्पकार्ट, स्नॅपडील आणि ओएलक्स यांसारख्या स्टार्टअपचा समावेश होता. लवकरच मोबाईल एप्लिकेशन डाऊनलोडच्या बाबतीत एक लाखांचा टप्पा पार करण्याचा त्यांना विश्वास आहे. ʻआम्हाला आता विश्वास वाटू लागला आहे की, जे उत्पादन आम्ही तयार करत आहोत, ते वापरकर्त्यांकरिता महत्वाचे आहे.ʼ, असे ʻऑलमेमॉर्सʼचे मुख्य कार्यकारी अधिकारी मृगांक सांगतात.

image


आयआय़टी दिल्ली येथे कुश आणि मृगांक शिकत होते. महाविद्यालयीन दिवसांपासूनच या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. क्वेस्ट येथे या दोघांनीही आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची एकत्रित सुरुवात केली. स्टार्टअप आणि कॉर्पोरेट वातावरणाचे, क्वेस्ट हे एक चांगले मिश्रण होते. तसेच ही कंपनी अमेरिकेत चांगली प्रस्थापित झाली होती. भारतात त्यांचे नव्याने काम सुरू झाले होते. क्वेस्टच्या दोन्ही ठिकाणी काम करण्याची मजा आम्ही अनुभवली, असे मृगांक सांगतात. त्यांनी २००४ ते २००६ ही दोन वर्षे तेथे घालवली. त्यानंतर मृगांक आरएसए येथे तर कुश एमचेक येथे निघुन गेले. मोबाईलवर पैसे भरणा करण्याऱ्या या दोन्ही स्टार्टअप्स आहेत. मृगांक सांगतात की, ʻआम्ही दोघांनीही जवळपास सहा वर्षे या क्षेत्रात काम केले.ʼ मृगांक हे कायम नव्या कल्पना, प्रयोगावर काम करत असत आणि त्यावर संशोधन करायला त्यांना आवडत असे. आरएसएमध्ये चांगले काम करत असतानाच त्यांनी आपले स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्याचे स्वप्न पाहिले. मृगांक सांगतात की, ʻसर्वप्रथम ही गोष्ट माझ्या लक्षात आली की, जर तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी करत असतानाच तुमच्या कल्पनेवर काम करत असाल, तर ती कल्पना फक्त छंदाप्रमाणे होऊन जाते. कारण त्याकडे तुम्ही आवश्यक तेवढे लक्ष देऊ शकत नाही किंवा ती तुमच्या प्राधान्यक्रमावर नसते.ʼ दरम्यानच्या काळात एमचेक येथील मुख्य तांत्रिक अधिकाऱ्याने कुश यांना वेगळ्या स्टार्टअपमध्ये गुंतवले. जेथे अनेक जबाबदाऱ्या होत्या, गोंधळ होता तसेच जलदगतीने निर्णय घ्यायच्या क्षमतेची आवश्यकता होती. ते दोघेहीजण स्टार्टसोबत जोडले गेले होते. जवळपास वर्षभरापेक्षा जास्त काळ स्टार्टअपच्या कल्पनेवर चर्चा केल्यानंतर त्या दोघांनीही सोशल कॉमर्स स्टार्टअपमध्ये नशीब आजमवण्याचे ठरविले. जानेवारी २०१३ मध्ये त्यांनी बंगळूरू येथे ओलमॅक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी सुरू केली. त्यांचे पहिले उत्पादन ऑलमेमॉर्स, हे मे २०१३ साली बाजारात दाखल झाले.

image


ऑलमेमॉर्स एक असे व्यासपीठ होते, जे ग्राहकाला वैयक्तिक अनुभव पुरवत होते. ऑलमेमॉर्सचे मुख्य कार्य़कारी अधिकारी (चीफ ऑपरेशन ऑफिसर) कुश सांगतात की, ʻआम्ही विविध ई-कॉमर्स संकेतस्थळावरुन उत्पादने घेतली आणि ग्राहकांच्या आवडीनुसार त्यात बदल केले.ʼ ʻऑनलाईन व्यापाऱ्यांकरिता ऑलमेमॉर्स बाजारपेठेप्रमाणे एक व्यासपीठ पुरवते. ज्यावर अनेक व्यापारी त्यांचे नवे उत्पादन सुरू करू शकतात. तसेच प्रसिद्ध आणि हंगामी उत्पादनांची जाहिरात करू शकतातʼ, असे मृगांक सांगतात. सध्या ऑलमेमॉर्सची एण्ड्रॉईड आणि आयओएस मोबाईल एप्लिकेशन्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी एक एप्लिकेशन खरेदी आणि फॅशन संबंधी आहे. तर दुसरे एप्लिकेशन भेटवस्तूंकरिता आहे. लवकरच त्यांचे तिसरे एप्लिकेशन बाजारात दाखल होणार आहे. ग्राहकांना अधिक चांगली सुविधा पुरवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. त्यामुळेच त्यांच्या मोबाईल एप्लिकेशन वापरकर्त्यांकरिता ते प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार करत आहेत, ज्यामुळे एप्लिकेशनमधील छायाचित्रे जलदगतीने आणि अधिक चांगल्या पद्धतीने डाऊनलोड होऊ शकणार आहेत. ʻप्रत्येकाला जलदगतीने एखादे छायाचित्र डाऊनलोड झालेले आवडेलʼ, असे मृगांक सांगतात. भारतात सोशल बाजारपेठेची वाढ होत आहे. अमेरिका आणि भारतातील बाजारपेठांच्या आकडेवारीवरुन मृगांक सांगतात की, ʻभारतात २०१५ अखेरपर्यंत हा व्यवसाय २५० दशलक्ष डॉलर्स एवढा होणार आहे.ʼ या क्षेत्रात आधीपासूनच अनेक प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे पहिल्या नजरेतच ग्राहक प्रेमात पडावेत, अशी स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचे आव्हान ऑलमेमॉर्ससमोर होते. मृगांक सांगतात की, ʻहे आव्हान निश्चितच अवघड होते. मात्र आमच्या उत्पादनांमध्ये नक्कीच हे आव्हान पार करण्याची क्षमता होती. आमच्या जाहिरातीच्या रणनितीमुळे नवनवे ग्राहकदेखील आमच्यासोबत जोडले जात होते.ʼ व्यापाऱ्यांना आपली नवी उत्पादने बाजारात दाखल करण्यासाठी, त्यांची जाहिरात करण्यासाठी याचा वापर व्यासपीठाप्रमाणे होतो. त्यांच्या या व्यवसायाचा विस्तार करण्याचे प्रयत्न ते करत आहेत. मात्र त्याकरिता त्यांना निधीची आवश्यकता आहे.

लेखक - मालविका वेलायनिकल

अनुवाद - रंजिता परब

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags