संपादने
Marathi

मुंबईला मिळणार बूर्ज खलिफा पेक्षा उंच मनोरा आणि नवे मरिन ड्राईव्ह!

Team YS Marathi
24th Apr 2017
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक, महामार्ग आणि बंदर विकास मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईचा चेहरा मोहरा बदलून टाकायचे ठरविले आहे. मुंबईच्या बंदर विकास विभागाच्या पडीक जमिनींचा विकास करताना दुबईतील १६३ मजल्यांच्या प्रसिध्द बूर्ज खलिफा टॉवर पेक्षा उंच मनोरा मुंबईच्या पूर्व किना-यावर उभारण्याचा संकल्प त्यांनी केला आहे, या शिवाय हिरवाईने सुशोभित किनारा मुंबईच्या मरिन ड्राईव्ह पेक्षा मोठा असेल.


Image Source: Shutterstock

Image Source: Shutterstock


मुंबईच्या पूर्व किना-यावरील औद्योगिक जागेत हा प्रकल्प साकारला जात आहे,ज्याचे काम मुंबई पोर्ट ट्रस्ट करत आहे, ज्याचा उल्लेख गडकरी स्वत: शहरातील सर्वात श्रीमंत जमीनदार असा करतात. याबाबत गडकरी म्हणाले की, “ मुंबईत आम्ही पहिल्या क्रमांकाचे जमीनदार आहोत. आम्ही (पोर्ट ट्रस्ट जमिनीसाठी) प्रसिध्द ताज हॉटेल, बॅलॉर्ड इस्टेट, आणि रिलायन्स इमारत यांचे मालक आहोत. येथील मोठ्या प्रमाणात असलेल्या जमिनींचा विकास अपेक्षित असून पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या या जमिनी आहेत.”

गडकरी पुढे म्हणाले की, “ योजना तयार झाली आहे आणि आम्हाला फक्त केंद्राच्या परवानगीची गरज आहे. आम्ही आमची जमीन विकासक आणि गुंतवणूकदार यांना देत नाही. आम्ही स्वत: तिचा विकास करण्याचे ठरविले आहे. आम्ही छान हरित स्मार्ट रस्ते करू जे मरिन ड्राईव्ह पेक्षा तीन पट मोठे असतील. आम्ही ऐतिहासीक लॅण्डमार्क म्हणून बूर्ज खलिफा पेक्षा मोठा मनोरा तयार करू. याचा आराखडा तयार झाला आहे, आम्ही मंत्रिमंडळाच्या परवानगीची वाट पहात आहोत.

मुंबई पोर्ट ट्रस्ट ही मुंबईतील आर्थिक राजधानीत सर्वाधिक जमिनीची मालक असलेली केंद्र सरकारची संस्था आहे, जी १८७३पासून मुंबईच्या बंदराशी संबंधीत कामे करत आहे. याबाबतचा आरखडा पाचशे हेक्टर जमिनीच्या विकासांचा आहे, ज्यामध्ये बंदराशी संबंधीत कामे देखील आहेत. या शिवाय व्यापारी वापर, किरकोळ, मनोरंजनात्मक, आणि इतर अनेक प्रकारच्या वापराचा विचार आहे. या आराखड्याच्या वैशिष्ट्यापैकी एक म्हणजे सात किमी लांब मरिन ड्राईव्ह, जो माझगांव पासून सुरू होतो आणि वडाळा येथे संपतो. हा पट्टा सध्याच्या मरिन ड्राईव्ह पेक्षा जास्त मोठा असेल, यामध्ये मेरीटाईम वस्तूसंग्रहालय, मरिना, आणि सामुहिक मनोरंजनाच्या जागांचा देखील समावेश असेल, ज्यात मुंबईच्या देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित केले जाणार आहे.

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags