संपादने
Marathi

रस्त्यावरच्या खाण्याचे शौकीन आहात? मग भेट द्या महिमाच्या टॉकिंगस्ट्रीटला

Team YS Marathi
13th Feb 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

रस्त्यावर चाटची गाडी किंवा साध्या दुकानात मिळणाऱ्या पाणीपुरीला असणारी अप्रतिम चव, कुठल्याही स्टार हॉटेलमधल्या पाणीपुरीला येणं केवळ अशक्य आहे. कारण खाऊगल्लीत मिळणाऱ्या पदार्थांमध्ये आपलेपणा, जीभ-बोटं चाटायला लावणारी चव असते. खिसाही जास्त रिकामा न होता चटपटीत पदार्थांवर पोटभर, मनमुराद ताव मारता येतो. इथे खाताना कोणाकडे किती पैसे आहेत? याचा हिशोब लावत नाहीत. तुम्ही कोणत्या धर्म अथवा पंथाचे आहात, तुम्ही दिसायला कसे आहात? याचा इथे काहीही संबंध नसतो. उत्कृष्ट चव आणि खाण्याची आवड हाच इथला नियम असतो.

image


महिमा कपूर यांच्या मते, तुम्हाला जर एखाद्या शहराचा रंग जाणून घ्यायचा असेल किंवा त्या शहराला जाणून घ्यायचं असल्यास, तिथल्या रस्त्यावर खाणं किंवा स्थानिक पदार्थ खाणं हा एक उत्तम पर्याय आहे. त्यांना रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांशी गप्पा मारायला, त्यांच्या गोष्टी जाणून घ्यायला आणि त्याच्या नोंदी करायला खूप आवडतं. खाऊगल्लीतल्या खाऊवर असलेलं त्यांचं प्रेम आणि खाद्य विक्रेते यांच्यातून मग टॉकिंग स्ट्रीटचा (Talking Street) चा जन्म झाला. या वेबसाईटमुळे स्थानिक तसेच पर्यटकांना शहरातल्या कोणत्या गल्लीत कोणता पदार्थ चांगला मिळतो हे समजतं. जुलै २०१४ मध्ये याच्या कामाला सुरूवात झाली आणि त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात वेबसाईट सुरू झाली.

टॉकिंग स्ट्रीट

नासकॉमच्या दहा हजार इकोसिस्टीमचा भाग म्हणून टॉकिंग स्ट्रीटने आतापर्यंत ३२५ दुकानांची माहिती घेतलीय. यामध्ये स्थानिक फुड जॉईंटची समीक्षा करण्यात येते. शहराच्या वेगवेगळ्या भागात तुम्हाला काय चांगलं खायला मिळेल, त्याचं भौगोलिक स्थान, तिथं कसं पोहचता येईल, तिथे भेट दिलेल्या खवय्यांच्या प्रतिक्रिया यासर्वांची माहिती आपल्याला टॉकिंग स्ट्रीटमधून मिळते.

गोव्याच्या चविष्ट आणि रसदार खाद्यसंस्कृतीबाबत माहिती करून देण्याकरता, गेल्या वर्षी डिसेंबर पासून गोव्यातल्या खाऊ गल्ल्यांविषयीही इथं माहिती द्यायला सुरूवात झालीय. महिमा सांगतात, “गोव्यामध्ये पर्यटकांचा प्रचंड ओघ असतो. यामुळे बेंगळुरूच्या तुलनेत टॉकिंग स्ट्रीटला गोव्यात काम करायला खूप वाव मिळतो. परिणामी खूप मोठ्या प्रमाणात युजर्स मिळत आहेत”.

image


सध्या टॉकिंग स्ट्रीट द्वारे युजर्स (वैयक्तिक/ऑफिस) पार्टी किंवा समारंभाकरता स्थानिक किंवा खाऊगल्लीतल्या पदार्थांची मोठी ऑर्डर नोंदवू शकतात. दुकानांमध्ये स्वच्छता आणि आरोग्याची योग्य काळजी घेतली जातेय ना याची खात्री झाल्यावरच त्यांचा टॉकिंग स्ट्रीटमध्ये समावेश करण्यात येतो. तसेच हे विक्रेते प्रशिक्षित आहेत ना, खाद्यपदार्थ योग्यरित्या हाताळून, योग्यरितीने त्याचं पॅकेजिंग ग्राहकाकडे पोचवलं जातयं ना याकडेही टॉकिंग स्ट्रीटचं लक्ष असतं. देयकाच्या एकूण रकमेतला काही वाटा टॉकिंग स्ट्रीटला मिळतो.

अनुभवाचा फायदा

कोलकत्त्यात जन्म आणि मोठ्या झालेल्या महिमा यांचं शालेय शिक्षण दिल्लीत झालं. तर २००२ मधून अनंतपूरच्या श्री सत्य साई विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्राची पदवी मिळवली. २००५ मध्ये बेंगळुरूच्या आयआयएममधून त्यांनी एमबीए केलं.

एफएमसीजी संस्थेमध्ये त्यांना विपणन आणि विक्री क्षेत्रातला नऊ वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे ग्राहकांच मन, त्यांच्या अपेक्षा, समस्यांचं निराकरण आणि संवाद प्रक्रियेची त्यांना चांगली जाण आहे. ३४ वर्षीय महिमा यांच्या यशाचं गमक हेच आहे. मनापासून आणि मजेत काम करणं त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाला त्या यापद्धतीत सामील करून घेतात.

अवघड वाट

उद्योजकाच्या वाटेमध्ये अडचणी आ वासून उभ्या असतातच. महिमाही याला अपवाद नाही. त्या सांगतात, “साधनांचा वापर हा दर महिन्याला माझ्याकरता एक मोठा प्रश्न असतो. मी खर्च करत असलेल्या पैशांतून मला जास्तीत जास्त कसं मिळेल. तसंच धंद्यातल्या कोणत्याही धोक्याशिवाय पै न पै अखेरपर्यंत कशी पुरवता येईल याचा विचार मी सतत करत असते. आमची आत्ताची टीम अतिशय समरस होऊन काम करतेय. मला ट्रॅकवर ठेवायचं काम माझे सल्लागार अगदी चोखपणे करत आहेत”.

image


हे सर्व करताना कधीकधी आभाळात मळभही दाटून येतं. महिमा सांगतात, बऱ्याचदा आपण करत असलेल्या कामाबद्दल आपल्यालाच संशय येतो. आता पुढे काय असे प्रश्नही पडतात. पण सकारात्मक विचार आणि काटकपणा यांच्या जोरावर त्या संकटांवर मात करत पुढे जात आहेत.

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये महिमा आनंद शोधत असतात. आतापर्यंत मिळालेल्या गोष्टींबाबत त्या समाधानी आहेत. त्या सांगतात, “माझ्याकडे काम करणारी खूप छान टीम आहे. माझे सल्लागार स्वतःही एक उद्योजक आहेत. त्यांना २५ वर्षांचा अनुभव आहे. ते अतिशय साधे पण उच्च शिक्षित तांत्रिक सल्लागार असून, उत्पादनाचा दर्जा योग्य असण्याकडे त्यांचा नेहमी कटाक्ष असतो. कंपनीत बऱ्याचदा नवीन लोकांच्या नियुक्तीनंतर कामाच्या पद्धतीत वेगळेपणा येतो. पण मी आमच्या कंपनीच्या वातावरणात रुळतील अशा लोकांचीच नियुक्ती करते. आमची मूल्य, पर्यावरण जागरुकता, तत्पर, कामाशी प्रामाणिक आणि हिशोबात चोख या सगळ्या बाबी आमच्याकरता खूप महत्त्वाच्या आहेत”.

पुढच्या काही वर्षांमध्ये त्यांना ग्राहकांशी प्रामाणिक राहून एक शाश्वत, प्रमाणशीर व्यवसाय उभारायचा आहे.

बेंगळुरूच्या रस्त्यांवरील खाद्यसंस्कृती

बेंगळुरूच्या रस्त्यावरील खाद्याबाबत बोलताना महिमा सांगतात, “इथं आता हळूहळू कॉस्मॉपॉलिटीन संस्कृती रुळू लागलीय. खूप छान स्ट्रीट फूड जॉईंट इथे आहेत आणि नव्याने रोज कोणी ना कोणी आपलं खात उघडत असतं”. बेंगळुरूमधली त्यांनी सुचवलेली काही ठिकाण – स्थानिक चवीकरता अक्की रोटी (तांदळाची मसालेदार भाकरी), रागी रोटी (नाचणीची भाकरी), पद्दुस (आप्पे), होळीगे (पुरणपोळी) याकरता व्ही व्ही पुरम फुड स्ट्रीट, चायनीज दोस्याकरता ९९ व्हरायटी दोसा जॉईंट, जास्वंदाच्या चहाकरता इंदिरा नगरच्या ८० फुटी रोडवरील शॅरोन टी स्टॉल आणि मेक्सिकन चाटकरता वसंत नगर मधलं आर आरज ब्लू माउंट.

आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

आचारी आणि खवय्यांना एकाच छताखाली आणणारे ʻरेस्टोकिचʼ

ʻद ब्रेकफास्ट बॉक्सʼ, घरबसल्या आस्वाद घ्या पौष्टीक न्याहारीचा

एका लहानशा उपहारगृहात झाडू मारणा-याने बनविले ‘सरवणा भवन’, आज आहे ८० उपहारगृहांचा मालक!


लेखिका – तन्वी दुबे

अनुवाद – साधना तिप्पनाकजे

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags