संपादने
Marathi

कर्नाटकात औद्योगिक विकासाला अधिक टिकाऊ आणि सर्वसमावेशक करणारे जपानी उद्योजक !

Team YS Marathi
5th Feb 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

पर्यावरणाच्या हानी आणि मानवकल्याणाला चिरडण्याच्या वृत्तीमुळे ब-याचश्या कंपन्यांना टीका सहन करावी लागली आहे. मात्र काही देश जसे जपानच्या कंपन्या कर्नाटक सरकारसोबत भागीदारी करून नव्या वाटा शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.

image


इनवेस्ट कर्नाटक२०१६च्या संमेलनात काही आगळ्यावेगळ्या गटांपैकी एक भारत आणि जपानच्या व्यापारातील दिग्गजांनी सांगितले की, कसे उद्योग स्थानिक जनतेसोबत काम करतानाच गावे आणि शहरांना अधिक चांगल्याप्रकारे विकसित करु शकतात.

फ्रान्स, जपान, स्विडन, दक्षिण कोरिया, इटली, यूके आणि जर्मनी सारखे देश या वर्षीच्या इनव्हेस्ट कर्नाटकमध्ये अधिक सहभागी झाले.

बंगळूरुमध्ये जपानचे राजदूत जुनिची कवाए यांनी सांगितले की, भारतात अधिकांश जपानी कंपन्या काम करत आहेत, ज्या सर्वाधिक दुस-या क्रमांकाच्या आहेत. अनेक भारतीयांना हे माहित आहे की, सोनी, होंडा, मित्सुबीशी, हिताची सारख्या कंपन्या भारतात काम करत आल्या आहेतच तरीही अनेक छोट्या कंपन्या देखील कार्यरत आहेत. (अमेरिकास्थित वेंचर कँपिटल कंपनीचा भारतात मोठा दबदबा आहे, परंतू जपानी गुंतवणूक कंपन्याही येथे आहेत जसे की सॉफ्ट बँक आणि बिनोस)

टोयोटा-किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष शेखर विश्वनाथन यांच्या मते, जरी अधिकांश लक्ष फँक्टरी रचना आणि उत्पादनांवर केंद्रीत असले तरी भारतात उभरत्या अर्थव्यवस्थेसाठी हे आवश्यक आहे की, आजुबाजूच्या वातावरणातही सुधारणा झाल्या पाहिजेत.

बिदादी औद्योगिक असोसिएशनचे (बीआयए)गठन टोयोटा-किर्लोस्करने केले होते. बिदादी औद्योगिक असोशिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि टोयोटा-किर्लोस्करचे उपमहाव्यवस्थापक रहेंद्र हेगडे यांच्या मते बिदादी औद्योगिक असोसिएशनमध्ये बॉश आणि अन्य कंपनी सामुहिक नेतृत्व करत समुदायाच्या मुद्द्यावर अंमलबजावणी करत आहे.

मॉडल टाऊनशिपला विकसित करण्यासाठी बीआयएने स्थानिक रस्ते चांगले करणे, उर्जा, शाळा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, आणि तक्रार निवारण योजना चालविल्या आहेत. संरक्षण प्रोत्साहन जागरुकता अभियान याअंतर्गत चालविले जाते. रस्त्यावर पदपथ आणि दुभाजक बनविले जातात आणि रस्त्यांवर पाणी साचू नये यासाठी गटारे निर्माण केली जातात.

स्थानिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन देखील सुरु करण्यात आली आहे, त्याचबरोबर आरोग्य शिबीरे आणि जनावरांसाठी देखील २०पेक्षा जास्त गावांत कँप लावण्यात आले आहेत. महिला उद्योजिकांना मदत दिली जाते, गणित मेळ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहाय्य केले जाते. स्थानिक शेतक-यांना सिंचनासाठी उपकरणे आणि पैसा उपलब्ध करून दिला जातो.

हेगडे सांगतात की, “ आम्ही उत्सुकतेने कर्नाटकातील अन्य संस्थासोबत काम करून मॉडल टाऊनशिप वातावरण तयार करु शकतो. त्याचबरोबर राज्यात अधिक जास्त गुंतवणूक आकर्षित करण्यास तत्पर आहोत.”

काही जपानी कंपन्या ग्रामीण शाळांमध्ये असलेल्या स्वच्छतेच्या वाईट स्थितीला सुधारण्यासाठी काम करत आहेत. या अशा शाळा आहेत ज्यामध्ये जपानी कंपन्यामध्ये काम करणा-यांची मुले शिकत आहे केहिन फी चे कार्यकारी संचालक मासाकी याशिमा यांच्या मते, ज्या समाजात कंपन्या काम करतात त्यांना व्यापक दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे.

कंपनीची मुल्य घोषणा पाच गोष्टींवर अवलंबून आहे, ज्यामध्ये निष्पक्षता, विश्वास, अंतर्गत रचनात्मकता यांचा समावेश आहे जो एका आदर्श कॉर्पोरेटचा पाया आहे. जेट्रो बंगळूरूचे महासंचालक जन्या ताशिरो यांच्यामते अनेक जपानी कंपन्या आपल्या भारतीय भागिदारांसोबत अशा प्रकारच्या चर्चा करत आहेत. जपानी कंपन्यांनी आपल्या सामाजिक जबाबदारीच्या भावनेतूनच ओबेदनहल्ली येथे शाळांमध्ये शौचालये आणि पाण्याच्या टाक्या बसविल्या आहेत.

इनवेस्ट कर्नाटक२०१६शी जोडलेल्या मुख्य गोष्टी वाचण्यासाठी आमच्या फेसबूक पेज ला लाईक करा.

आता वाचा या संबंधित कथा :

'इन्व्हेस्ट कर्नाटक २०१६'मधील गुंतवणूक आणि संधी

उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्नाटक राज्याची महत्वाकांक्षी 'स्टार्टअप पॉलिसी २०१६'

कर्नाटक किनारपट्टीवरील छोट्या शहरांची मोठी भरारी

लेखक : मदनमोहन राव

अनुवाद: किशोर आपटे.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags