संपादने
Marathi

आता लवकरच मजा लुटा भारतातल्या पहिल्या वाईन-आईस्क्रिमची...

12th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

आईस्क्रिम लहानांपासून-मोठ्यांना सर्वांनाच आवडतं आणि वाईन म्हणजे पार्टीची शान असते. याच आईस्क्रिम आणि वाईनला एकत्र करता आलं तर?.. याच भन्नाट कल्पनेतून दोन मित्रांनी साकारली भारतातली पहिली वाईन-आईस्क्रिम.

image


विक्रांत मेटकर आणि निशांत हलकर्णी या बालपणाच्या मित्रांना वेगळं काही तरी करायचं होतं. विक्रांत सॉफ्टवेअर इंजिनियर होता. निशातनं नुकताच आयुर्वेदीक उत्पादकांचा व्यवसाय सुरु केला होता. २०१४ च्या डिसेंबर महिन्यात दोघांनी नाशिकमध्ये एक रेस्टॉरंट सुरु करण्याची तयारी सुरु केली होती. पण फक्त हॉटेल सुरु करणं हे त्याचं ध्येय कधीच नव्हतं. त्यापलिकडे जाऊन काहीतरी नवीन करायची त्यांची इच्छा होती. दोघांनाही फूड एन्ड ब्रेवरेज क्षेत्रात नवीन प्रयोग करायचे होते. यातूनच मग सब झिरो रिर्सच कंपनीची स्थापना झाली. या प्रक्रियेत त्यांना आणखी एक मित्र भेटला, निखिल वाणी. निखिल बांधकाम व्यवसायात आपलं नशीब आजमावत होता. निशांत-विक्रांतचं संशोधन आणि त्याला मिळालेली निखिलची साथ अशी चांगली भट्टी जमली आणि तयार झालं भारतातलं पहिलं वाईन आयस्क्रिम.

नाशिकला भारताची वाईन राजधानी म्हटलं जातं. देशात सर्वाधिक द्राक्षाचं पिक घेणाऱ्या या जिल्ह्यात मोठ्या वायनरी आहेत. इथं उत्तमोत्तम वाईन बनतात. त्यांनी जगाची बाजारपेठ काबीज केलीय. या वाईनच्या उपउत्पादनावर काही तरी करता येईल का ? यावर विक्रांत आणि निशांत यांनी भर दिला. यातूनच वाईन-आयस्क्रिमची संकल्पना पुढे आली. वाईनचं वेगवेगळ्या फ्लेवरमधलं आयस्क्रिम तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. सुरुवातीला सर्व अशक्यच वाटत होतं. कारण वाईन म्हणजे अल्कोहोल गोठत नाही आणि त्याला गोठवायचं असेल तर उणे 300 डिग्री सेल्सियसपर्यंत तापमान न्यावं लागतं. पण या तापमानाला वाईन गोठली तरी ती खाणं अशक्य होतं. कारण या तापमानाला गोठलेली वाईन दगडासारखी टणक होते. वर्षभर संशोधन केल्यानंतर निशांत आणि विक्रांतला वाईन-आईस्क्रिमचा फॉर्मुला सापडला. त्यांनी प्रायोगिक तत्वावर हे आयस्क्रिम तयार केलं आणि आधी 300 जणांना त्याची चव चाखायला दिली. हे आईस्क्रिम नेहमीच्या आईक्रिमपेक्षा वेगळं असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रयोगाचा पहिला टप्पा यशस्वी पार पडला होता.

जागतिक स्तरावर ‘मॉलिक्युलर गॅस्ट्रोनॉमी‘ या नाविन्यपूर्ण संकल्पनेवर संशोधन सुरु आहे. ऑर्गॅनिकचा वापर करुन खाद्यपदार्थांच्या गुणवत्तावाढीचा हा प्रयत्न आहे. सब झिरो रिसर्च कंपनीतर्फे या संशोधनासाठी याचाच वापर केला आणि भारतातलं पहिलं वाईन-आईस्क्रिम तयार झालं. सब झिरो रिसर्च कंपनीनं या तंत्राचं पेटंटदेखील दोन महिन्यापुर्वी मिळवलंय. अमेरिका आणि युरोपात मर्सर्स डेअरीसारख्या कंपन्या वाईन-आईस्क्रिमचं उत्पादन करतात. परदेशात हे आईस्क्रिम फार प्रसिध्द आहे. यामुळं सब झिरो रिसर्च कंपनीच्या या वाईन आईस्क्रिमची थेट स्पर्धा ही मर्सर्स डेअरीसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रान्डशी होणार आहे. व्हॅनिला-शिराज, कॅडबरी-कॅबरनेट, पिच व्हाईट झिनपॅडल, स्ट्रॉबेरी स्पार्कलींग, रिसलींग, चेरी मर्लाट, पोर्ट अशा विविध फ्लेव्हर्समध्ये वाईन आईस्क्रिम तयार करण्यात आलंय. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या आईस्क्रिममध्ये कधीही न केलेले टेस्टी आणि अनोखे फ्लेवर तयार करण्यावर सध्या संशोधन सुरु आहे. लवकरच हे नवीन फ्लेवर्स ही उपलब्ध होतील असं विक्रात मेटकर यांनी म्हटलंय.

आता हे वाईन आयस्क्रिम रितसर विकण्याची परवानगी मिळवण्यासाठी संबंधीत मंत्रालयांकडे प्रस्ताव पाठवण्यात आलंय. त्यावर मोहर लागताच देशभरात वाईन आईस्क्रिमची पार्लर सुरु करण्याचा सब झिरो रिसर्च कंपनीचा मनसुबा आहे. फ्रान्चाईजी पध्दतीनं अगोदर देशभरातल्या महत्वाच्या शहरात वाईन आईस्क्रिम पार्लर्स सुरु करण्याचा कंपनीचा विचार आहे. त्यानंतर जागतिक पातळीवर जाण्याचा आत्मविश्वास ही विक्रांत यांनी बोलून दाखवलाय.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags