संपादने
Marathi

ई-कॉमर्स क्षेत्रात वाटचाल करणं म्हणजे शिखर सर करणं : पुनीत सोनी- फ्लिपकार्ट सी पीओ

Team YS Marathi
16th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

शिखर आता समोर दिसायला लागलं होतं. आम्ही शिखराच्या गाडी जवळ पोहोचलो होतो. आम्ही त्यापासून ७०० फुटांवर होतो, आणि अशा वेळी आम्हाला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागत होता. फार क्वचित गिर्यारोहकांना शिखराच्या इतक्या जवळ पोहोचून असा निर्णय घ्यावा लागला असेल. तो म्हणजे पुढे जायचं की इथूनच मागे फिरायचं? आमचा एक सहकारी ज्याला श्वसनाचा त्रास होत होता, त्याला परत जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता, पण आमचा निर्णय आम्हाला घ्यायचा होता.

पुनीत सोनी, कोटोपक्सी शिखर चढाईची अनुभव सांगत होता. कोटोपक्सी हा इक्वेडोर मधील १९ हजार फुटहून अधिक उंच असलेला जगातील सगळ्यात उंच जिवंत ज्वालामुखी आहे.


image


समुद्रसपाटी पासून ४९ फुट ते १९३४७ फुट उंच

पुनीत फ्लिपकार्ट कंपनीचे सी पी ओ, फ्लिपकार्ट १५ बिलिअन अमेरिकन डॉलर ची उलाढाल असणारी आणि भारतात वेगाने पुढे जाणारी एक कंपनी. भाभा अणुशक्ती केंद्रातील एका शास्त्रज्ञाच्या मुलासाठी हा पल्ला गाठणं सहज शक्य नव्हतं. पुनीत साठी कोटोपक्सी गिर्यारोहण किंवा शिखर या पेक्षा क्षमता तपासणं अधिक महत्वाचं होतं. सद्य परिस्थिती मध्ये ते शक्य होईल की नाही हे बघायचं होतं.

आज फ्लिपकार्ट चा सी पी ओ म्हणून पुनीत सांगतो की ई कॉमर्स क्षेत्रातील नवनवीन आव्हानं स्वीकारणं आणि गिर्यारोहणात शिखर सर करणं या दोन्ही गोष्टी सारख्याच असतात. रोज नवीन आव्हानं आणि समस्या सोडवायला लागतात. बिग बिलियन डे हा कधीतरीच असतो. आपल्या ब्लाॅग वर पुनीतने त्याचे काही अनुभव सांगितले आहेत. तो म्हणतो.


image


मला आठवते त्या पाच दिवसात मी १५ तास झोपलो होतो, दुपारी 'बिन बॅगवर' (प्रवासी बॅग) काढलेली झोप आणि दमलेल्या अवस्थेत त्या मध्यरात्री कधी संपणार याची वाट बघत होतो. काही वेळा बंगळूरू मधील सूर्यप्रकाश पण सुखावह वाटायचा. मात्र १५ मिनिटं बाहेर आलो तरी भाजून निघाल्या सारखं वाटायचं. सहा तासात मी चक्रीवादळाप्रमाणे चार्टर्ड अकौंटटं, इंजिनिअर, बांधकाम कर्मचारी, डिलिवरी कर्मचारी, गृहिणी, लहान मुलं, सुरक्षा रक्षक यांना भेटलो. तसंच गोदाम, शाळा, बांधकाम सुरु असलेली इमारत, फर्निचरचं दुकान आणि काही घरांना भेटी दिल्या.

पुनीत साठी या सगळ्या गोष्टी म्हणजे नवीन काहीतरी शिकायचं आणि स्वतःला आजमावून पाहण्यासारखं होतं.. हा प्रवास सुरु झाला तो सुखासीन आयुष्य मागे ठेऊन पदव्युत्तर शिक्षण घेण्यापासून. त्याचं पदव्युत्तर शिक्षण अमेरिकेच्या व्योमिंग विद्यापीठात झालं. व्योमिंग शहर समुद्रसपाटी पासून उंचीवर असलेलं आणि पर्वतांनी वेढलेल्या या शहरानं जीवनाबद्दलची नवीन दृष्टी दिली.


image


" मला आठवतंय मी विद्यापीठात माझं ओळखपत्र आणायला चालत निघालो होतो आणि माझ्या बाजूने जाणाऱ्या एकाने मला बघून स्मितहास्य केलं. हा अनुभव माझ्यासाठी नवीन होता. पाव टक्का लोकसंख्या एकाच भागात राहत असेल तर प्रत्येकजण एकमेकांना ओळखतात." असं पुनीत म्हणतो. पदवीधर झाल्यावर जेव्हा पुनीत पारंपरिक मार्गाने नोकरी शोधायला लागला तेव्हा आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे हे पुनीतच्या लक्षात आलं.

वास्तव हे होतं की, अभियांत्रिकीची पार्श्वभूमी असलेला एक भारतीय जीआरई आणि जीमेट मध्ये उत्तम गुण मिळवूनही एखादी सामान्य नोकरी करणं हे त्याला काही पटत नव्हतं. त्यामुळे आपण काय करू शकतो आणि काय करायला पाहिजे याचा तो सतत विचार करत होता.

" मला व्यवस्थापन विषयासंबंधीची पार्श्वभूमी नव्हती, मात्र मला उत्तम व्यवस्थापन अभ्यासक्रम असणाऱ्या संस्थेत शिकायचं होतं आणि गुणवत्ता असलेल्या लोकांबरोबर काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे मी व्हार्टोन बिझनेस स्कूल मध्ये जाण्याचं ठरवलं. त्यासाठी मला खूप तयारी करणं आवश्यक होतं." असं पुनीत सांगतो.

नवनवीन आव्हानं स्वीकारणं आणि स्वतःला आजमावून पाहणं यातूनच पुनीत गिर्यारोहण क्षेत्राकडे वळला. कोटोपक्सी शिखर सर करण्यासाठी या क्षेत्रात आला. व्हार्टन संस्थेतील नेतृत्व विकास कार्यक्रमाचा भाग म्हणून पुनीत गिर्यारोहण मोहिमेत सहभागी झाला. नेतृत्व गुण आणि साहस यापेक्षा यातून निराळेच काहीतरी निष्पन्न झाले. अशा परिस्थितीत लोकं आपला कमकुवतपणा लपवण्याचा प्रयत्न करतात. पण वास्तव तुमच्या समोर आहे.

अपयशातून यशाकडे वाटचाल

हिम शिखराच्या अगदी जवळ पोहोचल्यावर काही शक्यता असतात, एक म्हणजे ज्याला श्वसनाचा त्रास होत आहे त्याच्यासह काही जणांनी परत खाली यायचं पण हे निराशाजनक आहे. दुसरा पर्याय म्हणजे त्याला तिथेच म्हणजे वरच्या कॅम्पवर सोडून इतरांनी मोहीम पूर्ण करायची. तिसरा पर्याय म्हणजे ती मोहीम तशीच सोडून सगळ्यांनी खाली यायचं आणि शेवटचा पर्याय म्हणजे अशा मोहिमेत फार क्वचित प्रसंगी घेतला जातो तो म्हणजे त्या व्यक्तीला तिथेच सोडून जायचं.

त्या सगळ्यांना माहित होतं की, एकाने जर ही मोहीम पूर्ण केली नाही तर कोणीच ती पूर्ण करणार नाही. त्यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आजारी सहकाऱ्याबरोबर खाली यायचं ठरवलं. त्यांनी खाली येण्यासाठी शक्कल लढवली. गिर्यारोहणाच्या दोराचा बारीक टोक एका सहकाऱ्याने पकडायचं तर दुसरं जाड टोक दुसऱ्या सहकाऱ्याने पकडायचं असं ठरलं. मोठी बाजू ज्याच्याकडे असेल तो दोर घेऊन उभा राहील आणि त्या दोराचा सहायाने इतर खाली उतरतील.

"मी अनेकवेळा शिखर सर करताना अपयशी झालो आहे. शिखर सर करताना येणार अपयश फारच निराशाजनक असतं. पण त्यातून मी अनेक गोष्टी शिकलो, त्यातलीच एक गोष्ट म्हणजे 'अपयश' अशी कोणती गोष्ट मुळात नसतेच. कारण प्रत्येक गोष्टींतून आपण काही ना काहीतरी शिकत असतो, जी आपल्याला भविष्यात उपयुक्त ठरत असते. त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीशी जुळवून घ्यायला लागलो. जेव्हा तुम्ही एखाद्या समूहाचं नेतृत्व करता त्यावेळी तुम्ही इतरांच्या प्रयत्नांशी निगडीत असता. गिर्यारोहण क्षेत्रातील महत्वाचा धडा म्हणजे निर्णय क्षमता." असं पुनीत सांगतो.

फक्त गिर्यारोहणातूनच तो अपयशातून यश मिळवायचं शिकला नाही तर कॉर्पोरेट क्षेत्रातही चढ उतार असतात.

गिर्यारोहण आणि कोटोपक्सी त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासातील महत्वाचे मैलाचे दगड ठरलेत. जेव्हा पुनीतने त्याच्या क्षमता काय आहेत हे बघायचं ठरवलं तेव्हा त्याने अनेक गोष्टी शिकायचं ठरवलं. मॅराथाॅन आणि गिर्यारोहण हा त्याचाच एक भाग होता. दुसरा भाग म्हणजे लहान मुलाचं मानसशास्त्र शिकणं. अभियांत्रिकी पासून मानसशास्त्रापर्यंत? पुनीत म्हणतो त्या विषयाने त्याला आकर्षित केलं आणि ते शिकणं म्हणजे स्वतः बद्द्ल जाणून घेण्यासारखं होतं. त्यामुळे त्याने अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.

यावेळी तो सात वर्षाच्या डॉमनिक नावाच्या मुलाला भेटला, हा प्रतिकूल परिस्थितीतून आलेला मुलगा होता. लॅटिन अमेरिकेत जन्माला आलेला मुलगा एका भारतीय अभियंत्या सोबत असणं ही परिस्थिती फारच वेगळी होती. " मी डॉमनिककडून अनेक गोष्टी शिकलो. पुनितने सांगितलं.

आजही पुनीत डॉमनिकच्या संपर्कात आहे. हे फार वेगळं आणि जादुई आहे असं त्याला वाटतं. डॉमनिक हा त्याच वस्तीमधील उच्च माध्यमिक शाळेत गेलेला पहिला मुलगा होता. आता तो यु सी एल ए मध्ये पदवी शिक्षण घेत आहे. " त्याचा सहवास मिळणं यापेक्षा मोठं दुसरं काही नाही. त्या मुलाशी काहीतरी विशेष नातं आहे." असं पुनीत म्हणतो.

एका वेळी अनेक गोष्टी शिकणं आणि त्या आत्मसात करणं यातून पुनीत घडत गेला.

तो सांगतो," कुंपणावर बसून मजा बघणं मला आवडत नाही तर प्रत्येक गोष्टीला सामोरं जायला मला आवडतं. ८० टक्के गोष्टी बरोबर आणि २० टक्के गोष्टी चुकीच्या असल्या तरी मला त्या आवडतात. आधी चुकायचं आणि नंतर त्या गोष्टी ठीक करायच्या हे केंव्हाही चांगलंच असतं, कुंपणावर काही न करता बघत बसण्यापेक्षा. मी अशा काही घटनांना तोंड दिलं आहे ज्यावेळी तुम्हाला निर्णय घेणं गरजेचं असतं आणि मी त्या गोष्टी सहजतेने हाताळल्या."

पुनीत सांगतो सगळ्यात निराशाजनक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे लोक जेव्हा म्हणतात की, तुम्ही काहीच करू शकत नाही. " मला हेच कळत नाही, हे कसं शक्य आहे, जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर तुम्ही त्यावर मार्ग शोधून काढता." तो सांगतो.

सगळं शक्य आहे कारण तुम्ही करू शकता. पुनीत सांगतो बी स्कूल मध्ये त्याला प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यावेळी त्याचा कोणी विचार केला नव्हता आणि त्याला वेळही दिला नव्हता. पण तिसऱ्या वेळी त्याला प्रवेश मिळवणं शक्य झालं. तो सांगतो हे तुमच्यातल्या क्षमतांमुळे शक्य होतं. जर तुमचा तुमच्यावर विश्वास असेल तर तुम्ही यश आणि अपयश यातील समतोल साधू शकलात.

" मी जे काही करतो ते मोठं काम नाही पण मोठ्या लोकांचं काम आहे. काही वेळा मी माझ्या ऑफिस मध्ये फिरत असतो तेव्हा लोकांना कामं करताना बघून मला आश्चर्य वाटतं की, अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे ही लोकं एकत्र येउन काम करतात.

याचा शेवट एकच आहे. का लोकं एकत्र येउन एकाच ध्येयासाठी काम करतात? याचं उत्तर म्हणजे काहीतरी असाधारण घडण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र येउन काम करणं गरजेचं असतं. या जादुमुळेच काहीतरी सुंदर जन्माला येतं."

ही परीक्षा नाही तर विक्रीची वेळ आहे.

बरेचदा लोकं असं समजतात की ती तुमची परीक्षा आहे. पण पुनीत असं म्हणतो की ती परीक्षा नसून तुम्ही किती चांगले आहात हे मांडण्याची ती वेळ असते.

" तुमचा स्वतःवर नियंत्रण आहे हे लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीला सामोरं जायला पाहिजे. मग ती मुलाखत असेल, किंवा तुमच्या सहकाऱ्यांसोबत सभा असेल किंवा व्यासपीठावर जाऊन हजारो लोकांसमोर बोलण्याची तुमची तयारी असायला हवी. तुम्हाला तुमच्या विषयी नेहमीच अधिक माहिती असते. तुम्हाला मिळालेले नकार हे तुम्हाला तुमच्यातील चांगल्या गोष्टी दाखवण्याची मिळालेली संधी आहे असं तुम्ही समजायला हवं." असं पुनीतचं मत आहे.

कोटोपक्सी शिखर आज खूप लांबवर आहे, पण त्या मोहिमेतून तो अशा काही गोष्टी शिकल्या ज्या त्याला वर्गातील शिक्षणात शिकता आल्या नसत्या.

लेखक : सिंधू कश्यप

अनुवाद : श्रद्धा वार्डे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags