वाराणसीमध्ये ‘द धोबी’ मार्फत रोजगार व गंगा नदीला स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणारे तीन तरुण

28th Apr 2016
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

      आपण स्वतः आरओ (वाटर प्यूरीफ़ायर) चे पाणी पितो, पण काय आपले कपडे आरओच्या पाण्याने धुतो ?.....हा प्रश्न वाराणसी मध्ये विचारणारे भेटले तर आश्चर्य वाटून घेऊ नका, तुमच्या कपड्यांना तलाव, कुंड, नदीचे अस्वच्छ पाणी तसेच घरात जे अंडरग्राउंड पाणी येते, त्यातील रसायन सुद्धा हानी पोहचवू शकते..... या शहरात तरुणांची एक अशी टोळी आहे जी  आपल्याला फक्त यासाठी जागरूकच करत नाही तर त्यांनी स्वतःची एक इंडस्ट्रीयल लाँड्री बनवली आहे ज्यात इटीपी प्लांटमधून स्वच्छ करून व वाटर सॉफ्टनर लावून पाण्याचे शुद्धीकरण करून कपडे धूतले जातात ज्यामुळे त्यांचे आयुष्य वाढते.

image


कपड्यांची व्यवस्थित काळजी घेण्याचा विडा उचलला आहे प्रगल्भ दत्त तिवारी व अजय सिंह यांनी. या जोडीने मिळून ‘द धोबी’ नामक एका संस्थेची निर्मिती केली आहे. प्रगल्भ दत्त तिवारी वाराणसीच्या एका प्रख्यात न्यूरोसर्जन यांचे सुपुत्र आहे. ज्यांचे १५० पलंगाचा एक दवाखाना आहे. देशातील प्रतिष्ठीत संस्थेत एमबीए करणाऱ्या प्रगल्भ दत्त यांनी नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा का विचार केला याच्या मागची एक रोमहर्षक कहाणी आहे. युवर स्टोरीशी गप्पा मारतांना प्रगल्भ यांनी सांगितले की, "ज्या वेळेस एमबीए केले तेव्हा सगळ्यांनी सल्ला दिला की एमबीए नंतर दवाखान्याच्या विपणन (मार्केटिंग)ची जबाबदारी सांभाळून दवाखान्याला मदत करायची. पण मला काही तरी नवीन करायचे होते. मी नेहमीच काही तरी वेगळे करण्याच्या विचारात होतो. म्हणूनच मी या व्यवसायाची निवड केली."

image


व्यवसाय करण्याचे कारण

वाराणसी मध्ये तलाव व कुंडाचे पाणी अतिशय खराब आहे....प्रगल्भ जेव्हा कधी या तलावात लोकांना कपडे धुतांना बघायचे तेव्हा त्यांच्या मनात यायचे की हे आरोग्याच्या दृष्टीने घातक असून दिवसभर अश्या पाण्यात उभे राहून या लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. शिक्षणादरम्यान त्यांच्या मनात विचार आला की आपण ही परिस्थिती बदलण्यासाठी एखादी मोहीम राबवून काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे.

image


प्रगल्भ तिवारी यांच्या विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना साथ मिळाली ती अजय सिंह यांची, जे पेशाने पत्रकार असून सामाजिक स्तरावरील बातम्यांचा आढावा घेतात. त्यांचे पण विचार काही याच पद्धतीचे आहे. युवर स्टोरीने जेव्हा अजय सिंह यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, "२००५ मध्ये मी जेव्हा वाराणशीला आलो तेव्हा गंगेच्या सुंदर व अदभूत अश्या या विस्तीर्ण घाटाची भुरळ पडली पण दुर्दैव, गंगेला आपणच जास्त दुषित करतो. यात त्यांचापण सहभाग आहे जे गंगेत कपडे धुतात म्हणूनच मनात विचार आला की आपल्या गंगेला या दुषिततेपासून मुक्तता मिळायला हवी.’’

image


याच मन:स्थितीत असतांना त्यांची ओळख तारुण्याची उर्मी व समाजासाठी काही करण्यची इच्छा असलेल्या प्रगल्भ यांच्याशी झाली. गप्पा झाल्या, विचार जुळले. सहाजिकच दोघांनी एक अशी एक लाँड्री टाकण्याचा संकल्प केला ज्यात कपडे घाण पाण्यात नाही तर ऑक्सिजनची मात्रा जास्त व स्वच्छ असलेल्या पाण्यात धुतले जातील. कपड्यांना आपटून आपटून धुण्यापेक्षा मशिनच्या सिलिंड्रीकल बास्केटमध्ये वाफ मिश्रित पाण्यात धुऊन त्यांना जंतू विरहित धुलाई मिळेल. कपड्यांची चमक टिकवण्यासाठी तेजाब, कॉस्टिक सोडा नाहीतर दर्जेदार रसायनाचा वापर केला जाईल. ज्यामुळे कपडे सुंदर, मऊ व बऱ्याच धुण्यानंतर सुद्धा नवीन दिसतील. याच कल्पनेने साकार झाली ‘द धोबी’ मोहीम.......

image


आता यांच्या पुढे प्रश्न होता की इंडस्ट्रीयल लाँड्रीचे नाव ऐकून लोकांच्या मनात दवाखाना, हॉटेल, रेल्वे इ. सारख्या ठिकाणाहून कपडे धुण्यासाठी येतील. पण या लोकांचा उद्देश काहीसा वेगळाच होता. ते आपल्या कपड्यांना नवीन चमक देण्याबरोबरच धोबी समाजासाठी नवीन तांत्रिक उपक्रम राबवून घाण पाण्यापासून त्यांना मुक्त करण्याचा होता. तसेच इंडस्ट्रीयल लाँड्री या विशेषणाला बदलून रोजचे कपडे धुण्याचा संकल्प केला. मशीन पोहचल्या, लाँड्री तयार झाली. आता आपल्या उद्देशाला समाजापर्यंत पोहचवणे, धोबी समाजाला आधुनिककरणाची तांत्रिक ओळख करून देणे व गंगेला प्रदूषण मुक्त करण्याचे मोठे आव्हान होते. यासाठी त्यांना आपल्या कामाची व्याप्ती वाढवण्याची अजून गरज होती. त्यांचा शोध संपला जेव्हा ते पत्रकार व दूरदर्शनवरील बातमी वाहिनी, दिल्ली मुंबईच्या अनेक प्रॉडक्शन हाऊसमध्ये कामाचा अनुभव असलेले पत्रकार नवीन सिंह यांना भेटले आणि त्यांनी या कामासाठी प्रगल्भ यांच्या बरोबरच स्वतःला वाहून घेतले. युवर स्टोरीला नवीन यांनी सांगितले, “या कामामुळे कपडे धुणारे स्मार्ट बनुन गंगेला प्रदुषणापासून मुक्ती मिळाली आहे व आमचा व्यवसाय सुद्धा वृद्धिंगत झाला आहे.”

image


वाराणशी मध्ये ‘द धोबी’ च्या प्रचाराचा परिणाम हा आहे की मागच्या चार महिन्यात १०० पेक्षा जास्त कपडे धुणा-यांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. कंपनी व ऑफिसमधील कपडे धुण्यासाठी वेगवेगळ्या नवीन प्रयोगांनी आम्ही त्यांना आकर्षित करीत आहोत. आम्ही धोबी समाजाला मार्केटिंगचे धडे देत आहोत. ‘द धोबी’ मार्फत गंगा प्रदूषण मुक्तीचा संकल्प गंगेत कपडे धुणा-यांना देत आहोत. तसेच कपडे धुणा-यांना ही विंनती केली जाते की त्यांनी गंगेत कपडे न धुता आमच्या लाँड्रीत ते धुवावेत. आम्हाला फक्त वीज व डिटर्जंटचा खर्च द्यावा व ते सुद्धा देणे शक्य नसेल तर मोफत कपडे धुवा पण गंगेला स्वच्छ ठेवा.

प्रगल्भ सांगतात की,” पूर्वी पासून पारंपारिक पद्धतीने जे लोक कपडे धूत आले आहेत ते आपले विचार एवढ्या सहजासहजी बदलणार नाहीत व त्यासाठी आम्हाला सातत्याने प्रयत्न करावे लागतील. त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी आम्ही लवकरच प्रशिक्षण शिबीर चालू करीत आहोत. ज्यात आम्ही सांगणार की, बदलत्या काळानुसार मशीनचा वापर हा प्रगती पथावर नेणारा आहे.”

सध्यातरी लोकांना चांगल्या पाण्याने कपडे धुतल्यामुळे काय फायदे होतात यासाठी अनेक इमारतींमध्ये ‘द धोबी’ चे कॅम्प लावले जात आहेत ज्यामुळे हळूहळू अनेक लोक त्यांच्याशी जोडले जाऊ लागले आहेत.

‘द धोबी’ या संकल्पनेवर अजय सिंह खूप उत्सुकतेने युअर स्टोरी टीमला सांगतात की, “तुम्ही असे अजिबात समजू नका की आम्ही एखादी समाजसेवा करीत आहोत....आम्ही आमचा व्यवसाय उभा करीत आहोत....फक्त नफा व नुकसानीसाठी हा व्यवसाय नाही तर हे एक असे स्टार्टअप आहे ज्यात व्यवसायाबरोबरच समाजाला एक नव्या युगानुसार शिक्षित करायचे आहे.” तसेच मशीनची ओळख करून देऊन प्रोस्ताहन द्यायचे आहे जेणेकरून वाराणशी धुलाईसाठी स्मार्ट होईल....हेच एक कारण आहे की आमच्या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे, ‘तुमचा धोबी स्मार्ट होऊ इच्छितो ते पण तुमच्यासाठी नाही तर तुमच्या कपड्यांसाठी'.

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory Marathi Facebook पेजला भेट द्या. लाईक करा.

आता वाचा संबंधित कहाण्या :

‘पिक माय लॉंड्री’-आयआयटी'च्या ३ मित्रांचा अनोखा उपक्रम

चमक कपड्यांची आणि व्यक्तिमत्वाचीही

ऑनलाईन लाॅन्ड्री व्यवसाय ही कल्पना योग्य आहे का ?

लेखक – आशुतोष सिंग

अनुवाद – किरण ठाकरे   

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close
Report an issue
Authors

Related Tags

Our Partner Events

Hustle across India