संपादने
Marathi

'कानपुरी कल्पनेला' मिळाली पाच लाख अमेरिकन डॉलर गुंतवणूक

आयआयटी कानपूर मधील तीन पदवीधरांच्या स्टार्टअप 'आईलेंज' साठी सिंगापूरच्या कंपनीने ५ लाख अमेरिकन डॉलर ची प्राथमिक गुंतवणूक केली.

Suyog Surve
19th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

तीन ध्येयवेड्या तरुणांनी आशिष कुमार, कौस्तुभ सिंहल आणि अंकित सचान यांनी आपल्या आयुष्याच्या प्रवासासाठी जो रस्ता निवडला तो स्वप्न आणि अपेक्षांनी भरलेला होता. मात्र यश प्राप्त करण्याकरिता केवळ स्वप्न आणि अपेक्षाच असून चालत नाहीत तर दूरदृष्टी, दृढ संकल्प आणि चिकाटीची जोड त्याला असावी लागते आणि हे सगळेच गुण कानपूरच्या या तीनही पदवीधारकांमध्ये आहेत. या तरुणांनी अशी भारतीय कंपनी सुरु करण्याचे स्वप्न पहिले जी सर्वच क्षेत्रात जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवेल.

image


गतकाळाच्या आठवणीना उजाळा देताना आशिषला तो काळ आठवतो जेव्हा स्वतःच्या उद्योग स्थापनेआधी पासून ते 'जोमॅटो' या कंपनीकडे आकर्षिले गेले होते. त्यांना या कंपनीच्या सेवा इतक्या आवडायच्या की त्यांनी आपल्या खाजगी वापरासाठी ज्या पहिल्या मोबाईल अॅपला डाउनलोड केले होते ते याच कंपनीचे होते. मागील दहा वर्षे एकत्र राहिल्या नंतर हे तीनही सहसंस्थापक स्वतःमध्ये तांत्रिक गोष्टींविषयी एक स्वाभाविक आकर्षण पाहतात. आपापल्या कामावरून परतल्यानंतर हे तिघेही सारी रात्र कोडींगच्या कामात घालवत. आशिष सांगतो की रेल्वे तिकिटाच्या प्रतीक्षा यादी संदर्भात एक भविष्यवेधी मंच तयार करण्याच्या प्रक्रीयेदरम्यान या तिघांना अशा कामाने आकृष्ट केले. जरी तो प्रोग्राम कधीच मूर्त रूप घेऊ शकला नाही तरी त्याने यांना पुढे जाण्याचा रस्ता मात्र प्रकाशित केला.

आता या नंतर काय? या तिकडीने आपल्या या वेडावर पूर्ण लक्ष्य केंद्रित करता यावे म्हणून स्वतःच्या नोकऱ्या सोडून दिल्या आणि लवकरच फॅशअप (Fashupp) सोबत जगासमोर आले. जे एक सोशल फॅशन शोध- संबंधातले आॅनलाईन व्यासपीठ होते आणि हे त्यांच्या दुसऱ्या उद्योगा करिता मैलाचा दगड ठरले. त्यांना आपल्या वर्तमान स्टार्टअप संबंधातली कल्पना एका 'साय - फाय' फिक्शन मधून सुचली. ज्यात मुख्य पात्राला ज्याही गोष्टीची माहिती हवी असते त्यावर तो आपली दृष्टी स्थिर करतो आणि त्याला हवी ती सर्व माहिती मिळते. त्यांना या गोष्टीची जाणीव झाली की कोणत्याही उत्पादना बद्दलच्या माहितीसाठी विजुअल्स अर्थात एखाद्या वस्तूचे वा उत्पादनाचे दृश्यमान स्वरूप नैसर्गिकरित्या अधिक प्रभावशाली आहे.

आपल्या पहिल्या उत्पादनानंतर या तिकडीने जानेवारी २०१५ मध्ये आयलेंझ (iLenze) वर काम करणे सुरु केले आणि ६ महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर जून महिन्यात आपल्या नव्या उत्पादनाला घेऊन जगासमोर आले.

मूलतः हे एक व्हिजुअल सर्च (Visual Search) स्टार्टअप आहे आयलेंझ हे वास्तविक आणि आॅनलाईन जगाच्या अंतराला कमी करण्याचे प्रयत्न करतो. उत्पादन शोध (Product Discovery) या मूळ धारणेला मध्यवर्ती ठेऊन काम करणारा स्टार्टअप सध्या फैशन, फर्निचर आणि घर सजवणाऱ्या उत्पादनाच्या क्षेत्रात संचालित होतो आहे. काम करणे सुरु केल्या पासून तीन महिन्यांच्या आतच हे स्टार्टअप ई कॉमर्स च्या क्षेत्रातील प्रस्थापित कंपन्यांसोबत काम करण्यात यशस्वी झाले आहे

सद्य परिस्थितीत हे तिघे सहा ग्राहकांसोबत काम करत आहेत आणि मागील महिन्यात यांनी ३ हजार अमेरिकन डॉलरचा व्यापार केला आणि यांच्या कडे १० हजार अमेरिकन डॉलर चे करार अद्याप शिल्लक आहेत. आता जरी हे आपल्या समोर येणाऱ्या बाजारातील संधींना शोधण्यात आणि समजण्यात वेळ घेत असले तरी त्यांना आशा आहे की आगामी सहा महिन्यांत त्यांचा व्यापार १ लाख अमेरिकन डॉलर चा महसूल जमा करण्यात यशस्वी होईल .

आपल्या स्वप्नांचे क्षितीज ठरवताना आशिष सांगतो," आमचे स्वप्न म्हणजे बाजारात विस्तारित स्वरुपात व्हिजुअल सर्चसाठी एक मंच उपलब्ध करून देणे हे आहे. या दिशेने पावले उचलत आम्ही त्यावर काम करण्यास सुरवात केली आहे आणि तुम्ही अपेक्षा करू शकता की येणाऱ्या काही महिन्यांतच आम्ही आमचे उत्पादन बाजारात घेऊन येण्यात यशस्वी ठरू."

ग्राहक बाजारपेठेत आपल्या उत्पादनाला एका क्रमबद्ध पद्धतीने उतरवणे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून पुढील वाटचालीसाठी या तिघांची टीम प्रयत्नशील आहे. आणि याच प्रकल्पा अंतर्गत, लवकरच त्यांचे एक अॅप्लिकेशन सादर करण्याच्या ते प्रयत्नात आहेत. या सोबतच ही कंपनी भागीदारीच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवण्या करता प्रयत्नरत आहेत आणि यासाठी त्यांनी सिंगापुरातील एका स्टार्टअप सोबत हातमिळवणी केली आहे. आशिष चे म्हणणे आहे की भविष्यात त्यांचा बेत १० जागतिक भागीदारांना आपल्या सोबत जोडण्याचा आहे जे त्यांच्या महसुलात ५० टक्क्याहून अधिक योगदान करतील. या सोबतच येणाऱ्या ६ महिन्यात आईलेंझ ची इलेक्ट्रोनिक्स आणि एफएमसीजी सारख्या कार्यक्षेत्रात विस्ताराची योजना आहे.

image


अजून पर्यंत पूर्णतः संस्थापाकांच्याच जमा पुंजी वर चाललेली आईलेंझ, सिंगापूर स्थित मार्कटस कॅपिटल कडून ५ लाख अमेरिकी डॉलरची प्रारंभिक गुंतवणूक मिळवण्यात यशस्वी ठरली आहे.

या गुंतवणुकी संदर्भात युवरस्टोरी कडे विशेष विचार व्यक्त करताना आशिष सांगतात की, मिळालेल्या निधीतून एक चांगली तांत्रिक टीम तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. सध्या केवळ तीन जणांची टीमच यावर काम करते आहे. या सोबतच एक चांगली सक्रीय सेल्स टीम तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. टीम मध्ये वीस जणांचा समावेश असेल.

या सोबतच या गुंतवणुकीचा वापर अॅप्लीकेशन तयार करण्यासाठी सुद्धा केला जाणार असल्याचे संस्थापकाचे म्हणणे आहे की, मर्कटस कॅपिटल कडून गुंतवणूक करणाऱ्या ट्रेसी क़्युक आपले मत मांडतात की,"आम्ही गुंतवणूक करण्यासाठी अशा कंपन्याच्या शोधात होतो ज्यांच्यात विस्ताराच्या संभावनेसोबतच विश्लेषणात्मक दृष्ट्या अग्रेसर होण्याचीही ताकद असेल. अनेक कंपन्याच्या मूल्यांकनानंतर आमच्या नजरेत 'आयलेंझ' व्यावसायिक दृष्ट्या या तंत्राला लागू करण्यात यशस्वी झाला आणि या क्षेत्रात नवी कंपनी असूनही ते आमचा विश्वास जिंकण्यात यशस्वी ठरले." त्या पुढे म्हणतात की," या व्यतिरिक्त संस्थापक टीम कडून दाखवली गेलेली समजदारी आणि कामा प्रती त्यांची निष्ठा त्यांना गुंतवणुकी साठी प्रोत्साहित करणारे अन्य घटक ठरले."

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags