संपादने
Marathi

‘गाना.कॉम’चा स्पर्धक... ‘फ्लॅट.टू’चा पहिला सहकारी

Chandrakant Yadav
11th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

हेमेश सिंग हा काही कुणी एखाद्या व्याख्येत सामावणारा कोडर नाही… कोडिंग हा त्याचा श्वास आहे… पॅशन आहे. तो अगदी शाळकरी असतानापासून कोडिंगच्या विश्वात बिनधास्त हुंदडत आलेला आहे. शाळेतली कॉम्प्युटर लॅब म्हणजे त्याचे अगदी दुसरे घरच होते. टेक्स्टबुकमधले प्रोग्रॅम कॉम्प्युटरला देत त्याची सुरवात झाली. आणि आउटपूट टेक्स्टबुकप्रमाणे असला की तो आनंदून जाई. सध्या हेमेश ‘फ्लॅटचॅट’च्या ‘आयओएस व्हर्जन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’चे नेतृत्व करतोय. फ्लॅटचॅट हे ‘फ्लॅट.टू’ (Flat.to.)चे ‘सिग्नेचर अॅप…’


हेमेशचा जन्म आणि शिक्षण आग्रा येथे झाले. आई-वडील दोघे ‘डॉक्टरेट’. पेशाने शिक्षक. शिक्षणाशिवाय जीवन म्हणजे व्यर्थ, यावर दोघांचा ठाम विश्वास. हेमेश म्हणजे कॉम्प्युटरचा किडा. बहुतांश ‘प्रोग्रॅमिंग लँग्वजेस्‌’मध्ये हेमेशची मातब्बरी. म्हणून मग वेब तंत्रज्ञानातच आपले कसब आजमवायला त्याने सुरवात केली. कॉलेजच्या पूर्वार्धात त्याच्याकडे लॅपटॉप नव्हता. मित्रांच्या लॅपटॉपवरून वेब विकासाचे शक्य तितके तंत्र तो आत्मसात करत असे. दरम्यानच्या काळात ‘वेब डेव्हलपमेंट सोसायटी’ नावाच्या विद्यार्थ्यांच्या ‘कम्युनिटी’बद्दल त्याला कळले. तंत्रज्ञानाशी निगडित महाविद्यालयातले सगळेच विषय विद्यार्थ्यांची ही ‘वेब डेव्हलपमेंट सोसायटी’ हाताळत असे. इथेच खऱ्या अर्थाने हेमेशच्या खऱ्या शिक्षणाचा पाया रचला गेला.

image


‘वेब डेव्हलपेंट सोसायटी’च्या टेक टीमच्या सदस्यांनी महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थ्यांचा विस्तृत डाटा साकारला. परीक्षेचा निकाल जाणून घेण्यासाठीचे ‘वेब पोर्टल’ विकसित केले. ५००० विद्यार्थ्यांचा डाटा अपलोड केला. सेमिस्टरनिहाय विद्यार्थ्यांच्या नोंदणीची यंत्रणा लावली. ‘एम. टेक.’ प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांसाठी एक संगणकीय समुपदेशन यंत्रणा उभारण्यात हेमेशचाही हातभार होता. विद्यार्थ्यांच्या ज़ीएटीई गुणसंख्येवर ही यंत्रणा आधारलेली होती. जागांचे वाटप (ॲलॉटमेंट ऑफ सिट्स) स्वयंचलितरित्या व सुलभपणे करण्यात या यंत्रणेची मोठी मदत झाली.


वेब डेव्हलपमेंट सोसायटी टीमने महाविद्यालयातील अनेकविध प्रक्रिया कॉम्प्युटर व इंटरनेटच्या मदतीने स्वयंचलित करण्यात मोठे योगदान दिले. पदवीचे पहिले वर्ष आटोपले तसे हेमेशची शाखा ‘आयटी’ ते ‘ईसी’ अशी बदलली गेली. हेमेशला हा फार मोठा धक्का होता. तसे पाहाता हेमेशच्या कॉलेजातले शिक्षक इतर कॉलेजातल्यांप्रमाणे विद्यार्थ्यांपासून अलिप्त राहाणारे नव्हते. विद्यार्थ्यांना मदतीला ते तत्पर असत. विद्यार्थ्यांच्या ‘एक्स्ट्रॉ करिक्युलर अॅक्टिव्हिटीज्’ना (विविध गुणदर्शन, उदा. खेळ, कला) या शिक्षकांचा पाठिंबा असे. शिक्षकच नव्हे तर त्या-त्या शाखांचे प्रमुखही (डिन) विद्यार्थ्यांना मदत करत. हेमेशलाही त्यांनी धीर दिला.


क्षमताच जोखायची तर त्यासाठीची सत्वपरीक्षा किती टोकाची असू शकते, त्याचे उदाहरण देणारा एक प्रसंग हेमेशला आठवतो.


हेमेश तो प्रसंग सांगू लागतात, ‘‘एम.टेक.ला रजिस्ट्रेशनसाठी जी यंत्रणा आम्ही विकसित केली होती. ती परिपूर्ण आहे या धुंदीत आम्ही होतो. काही अर्जदारांचे फोन आल्यानंतर कमतरता लक्षात आली. धुंदी उतरली. प्रोग्रॅमिंगमध्ये अपंग प्रवर्गाचा अंतर्भाव करायलाच आम्ही दुर्दैवाने विसरलेलो होतो. अर्थात नंतर ही चुक दुरुस्त केली गेली. आता काय करणार त्याला. एखादा प्रोग्रॅम डेव्हलप करताना तुम्ही तुमचे कोड तपासू शकता, पण जेव्हा तुम्ही खऱ्याखुऱ्या डाटावर प्रोग्रॅम रन करता, तेव्हा काही तरी चुकते आहे का, हे तपासणे अवघडच ठरते. इथेच तुमची क्षमता खरं तर जोखली जात असते.’’

मेटल ग्रंज…

कॉलेजातलीच गोष्ट. ‘ग्रुवशार्क’ या गाण्यांच्या साइट्ची त्याला गोडी लागली. अर्थात या साइटवर जी काही गाणी होती, जे काही इतर होते, त्याने हेमेश फार तृप्त होत असे, असेही नाही. मुख्य म्हणजे या साइटवर लोकप्रिय हिंदी गाणी नव्हतीच. संगीताचे आपण एखादे पोर्टल करावे, असे यातूनच त्याला सूचले. ‘मेटल ग्रंज’चा जन्म यातूनच झाला. हेमेश म्हणतो, ‘‘अर्थात या क्षेत्रातही ‘साव्न.कॉम’ आणि ‘गानॉ.कॉम’ या साइट्स होत्याच. ‘गाना’ साइट तितकीशी बरोबर नव्हती. तिला चेहराच नव्हता. त्रोटक होती. रसिकाला वाहून नेईल असा धाराप्रवाह तिच्यात नव्हता. नंतर जेव्हा हेमेशला कळले, की ‘गाना’च्या मागे ‘इंडियाटाइम्स’ आहे, त्याने म्युझिकल साइटच्या या भानगडीत आणखी पुढे न पडण्याचे ठरवून टाकले.

‘हमदर्द’ हेमेश…

सुटीच्या काळात हेमेशने बघितले, त्याचे मित्र नोट्स मिळवण्यासाठी किती धडपड करतात. हा त्याच्याकडून अमुक विषयाच्या नोट्स घेतो, तर त्याला टमुक विषयाच्या नोट्स देतो. परीक्षा तोंडावर आलेली असताना नोट्सच्या जमवाजमवीतच दमछाक होते. अभ्यासाचा वेळच एकप्रकारे वाया जातो. हेमेशच मग विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून गेला. इंटरनेटवर त्याने एक असे व्यासपीठ उभारले, जेथे नोट्स पीडीएफ फॉर्ममध्ये अपलोडही करता येतील आणि ज्याला त्या हव्या आहेत, तो त्या डाऊनलोड करू शकेल.

गरजणारा ढग बरसलाही नाही...

हेमेश सांगतो, ‘‘आम्हाला गरजणारा एक ढग जणू उभारायचा होता… अर्थात डॉक्युमेंट्सचा… डॉक्युमेंट्सचा ढिगारा लोकांसाठी उपलब्ध करून द्यायचा होता. व्हिझेट पुरवायचे होते. आम्ही ते केलेही… पण पुढे लक्षात आले, की अरे हे असे करणारे आणखीही भले भले मातब्बर बाजारात आहेत. दुसरे म्हणजे आपण जे काही करतो आहोत, त्याची लोकांना अगदी पोटतिडिकीची म्हणावी अशी गरजही नाहीये. ढग फक्त गरजणाराच आहे, बरसणारा नाही. थेट पैसे मिळवून देईल, अशा साइटची उभारणी सुचत नव्हती. कुणी मोठा भागीदार मला मिळेल, अशी स्थितीही नव्हती. पैसे भरून कुणी आपल्या साइट्सचे ग्राहक बनतील, असा विचार मी करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नव्हता. आता आणखी हा विषय पुढे ताणण्यात काहीही अर्थ नाही, असे मला वाटले आणि मी तो संपवूनही टाकला.’’

image


हेमेशचा ‘कॉम्पिटिटिव्ह कोडर’ असलेला एक मित्र जेव्हा अमरिकेत थेट ‘फेसबुक’मध्ये नोकरीला लागला, तेव्हा हेमेशही ‘कॉम्पिटिटिव्ह कोडिंग’कडे चुंबकाकडे लोखंड खेचले जाते, तसा खेचला गेला. अर्थात हे एक चांगले वळण होते आणि हेमेशला ते मार्गावर आणणारे होते.

हेमेशने आपल्या वेबकिड्या मित्रांची टीम बनवली. एसपीओजे, ‘टॉपकोडर आणि कोडशेफ’वर सराव सुरू केला. अखेर त्याचे फळ मिळाले. आयआयटी-केआयसीपीसीअंतर्गत भारतातून ही टीम दुसरी अव्वल ठरली, तर एसीएम-आयसीपीसी-(सार्क) अंतर्गत सातवे स्थान तिला मिळाले.

महाविद्यालयीन शिक्षणानंतर हेमेश हा गौरव मुंजाल यांच्या संपर्कात आलेला होता. हेमश व गौरव दोघांचाही मित्र असलेल्या एकाने ही भेट घडवून आणली होती. गौरव हे ‘फ्लॅट.टू’चे संस्थापक. ‘फ्लॅट.टू’साठी हेमेशने कामाला सुरवात केली. तोच ‘फ्लॅट.टू’ कंपनीचा पाया म्हणवल्या जाणाऱ्या प्राथमिक व्हर्जनची रचना करत होता आणि तोच या कंपनीचा पहिला कर्मचारीही होता.

भविष्याचा वेध घेताना हेमेश म्हणतो, ‘मलाही आपल्यासाठी एक जग रचायचे आहे. बघू या कधी जमते ते!’

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags