संपादने
Marathi

आपल्या यशाची वाट धुंडाळणाऱ्या सहा उद्योगसम्राटांच्या राजकन्या

Team YS Marathi
1st Apr 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

आपल्या माहीत आहे की राजा-राणी, राजकन्यांचा जमाना आता इतिहासजमा झालाय. पण आज आपण भेटणार आहोत आधुनिक राजकन्यांना! आई-वडिलांच्या मोठमोठ्या उद्योगसाम्राज्यांमुळे या कन्यांना आधुनिक राजकन्याचं म्हणावं लागेल ना ? सोन्याचा चमचा तोंडात धरून जन्माला आल्यावर कशाचीही ददात भासत नाही. आई-वडिलांचे मनसोक्त लाड आणि संपत्तीमुळे या कन्यका भारावून गेल्या नाहीत किंवा संपत्तीची उधळण करत बसल्या नाहीत. आपल्याला हव्या त्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन, स्वतःच्या हिंमतीवर उंच भरारीची स्वप्न पाहिली. या तरुणींनी आपल्या यशाची वाट स्वतःच धुंडाळली.

अनन्याश्री बिर्ला यांचा महिला सक्षमीकरणाकरता ‘स्वतंत्र’ प्रकल्प

उद्योजक कुमारमंगलम बिर्ला आणि नीरजा बिर्ला यांच्या २२ वर्षाच्या अनन्याश्रीने २०१३ मध्ये ‘स्वतंत्र’ या मायक्रो फायनानसिंग स्टार्टअपची सुरूवात केली. २७४० अब्ज ६४ कोटी २९ लक्ष ५० हजार रुपयांची उलाढाल असणाऱ्या आदित्य बिर्ला उद्योगसमूहात काम करायचं नाही असं तिनं ठरवलं. तिच्या या निर्णयाचा तिच्या पालकांनी आदरच केला आणि तिच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. ग्रामीण उद्योजिका, महिला ग्राहक यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याकरता मार्ग सुचवणे, पतपुरवठा करणे याद्वारे महिलांना सक्षम बनवण्याचं काम ‘स्वतंत्र’मध्ये करण्यात येतं.

अनन्याश्रीने ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि व्यवस्थापनाची पदवी घेतली. मिस व्होगकडून “28 जिनीयस अंडर 28” (28 वर्षाखालील 28 तल्लख बुद्धीमान) मध्ये तिची निवड करण्यात आली आहे. तिला बुद्धीबळाचीही आवड आहे. राष्ट्रीय पातळीवरील अनेक स्पर्धांमध्ये तिने चमकदार कामगिरी केली आहे. तिला शास्त्रीय संगितामध्ये रस आहे. संतूर वाजवायला तिला मनापासून आवडतं. सगळयाच क्षेत्रात प्राविण्य मिळवणारी आणि आपल्या नावाला साजेशी कामगिरी करणारी अशी ही अनन्याश्री.

रिलायन्सची मनसुबदारी घेण्यास इशा अंबानी सज्ज

मुकेश आणि नीता अंबानी यांची २४ वर्षीय कन्या आहे इशा. रिलायन्स जीओ इन्फोकॉम आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स या कंपन्यांच्या संचालक मंडळाची सदस्या म्हणून आपल्या कामाची छाप पाडायला तिने सुरूवात केली आहे. याले विद्यापीठात मानसशास्त्र आणि दक्षिण आशिया विषयांचा तिने अभ्यास केला आहे. न्यूयॉर्कच्या मॅककिन्सेमध्ये तिने व्यापार विश्लेषक म्हणून काम केलं. इशाला पियानो वाजवण्याची आवड आहे. आपल्या कुटुंबियांचाच वारसा चालवत तिनेही फोर्ब्सच्या तरुण अब्जाधीशांच्या यादीत किशोरवयातच स्थान पटकावलं.

अनन्याश्री बिर्ला, श्रुती शिबुलाल, इशा अंबानी, मानसी किर्लोस्कर, लक्ष्मी वेणू, निसबो गोदरेज

अनन्याश्री बिर्ला, श्रुती शिबुलाल, इशा अंबानी, मानसी किर्लोस्कर, लक्ष्मी वेणू, निसबो गोदरेज


पर्यटनाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा श्रुती शिबुलालचा प्रयत्न

इन्फोसिसचे माजी सीइओ आणि अब्जाधीश शिबुलाल यांची कन्या आहे श्रुती. स्वतः कंबर कसून, मैदानात प्रत्यक्ष उतरुन तिने आपला व्यवसाय उभा केला. जागतिक दर्जाच्या रिसोर्ट आणि हॉटेल्सची साखळी बनवण्याच्या उद्देशाने २००५ मध्ये श्रुतीने ‘द तमारा’ची सुरूवात केली. तमाराच्या धोरण आणि विकासात्मक विभागाची संचालक म्हणून ३० वर्षीय श्रुती काम पाहते. गौरव मनचंदाशी तिचा विवाह झाला आहे.

कोलंबिया विद्यापीठातून श्रुतीने पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. २०१२ मध्ये कर्नाटकातल्या कूर्गमध्ये १७० एकर परिसरात पसरलेल्या कॉफीच्या मळ्यात तिने आलिशान रिसॉर्ट सुरू केलं. द तमारा कूर्ग या नावाने या रिसोर्टची सुरूवात झाली. श्रुती आपल्या सर्व पर्यटन प्रकल्पांमध्ये शाश्वत जीवनपद्धती आणि जबाबदार पर्यटनाचा मूलमंत्र जपते. नैसर्गिक वातावरण आणि स्थानिक पर्यावरणाला कसलीच बाधा न आणता कंपनीने आपलं पहिलं रिसोर्ट द तमारा कूर्ग सुरू केलं. शेरिल सँडबर्गचा आदर्श श्रुती डोळ्यासमोर ठेवते. बेंगळुरूत सर्व्हिस अपार्टमेंटस्, थिरुअनंतपुरमला हॉटेल आणि केरळमध्ये रिसोर्ट असा श्रुतीचा व्यवसाय पसरला आहे.

जॅझ संगिताची ती चाहती आहे. शेफ अभिजीत सहासोबत श्रुतीने कॅपेरबेरी हे अनोखं रेस्तराँ सुरू केलं आहे. खवय्यांच्या चवीढवींना पुरेपुर न्याय देणारे पदार्थ इथं चाखायला मिळतात. फावा या त्यांच्या रेस्तराँमध्ये अरबी पदार्थांचा आस्वाद घेता येतो.

निसबा गोदरेजचं काम आणि आयुष्याचा समतोल

निसबा आदी गोदरेज, निसा या नावानेही ओळखल्या जातात. गोदरेज ग्राहक उत्पादनांच्या त्या कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतात. असं म्हटलं जातयं की, तानया दुबाश आणि पिरोजशा या आपल्या भावंडांपेक्षा निसाची प्रगती जरा कांकणभर लवकर होईल. आदी आणि परमेश्वरी गोदरेज यांची निसा ही कन्या. व्हार्टोनाईटमधला त्यांचा मित्र कल्पेश मेहता याच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. १८९७ मध्ये सुरू झालेल्या या उद्योगाच्या भविष्यातल्या नवनवीन योजना आखण्यात आणि अंमल करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी सर्वांचंच लक्ष आपल्याकडे वेधलं. आपल्या अवघ्या एक महिन्याच्या तान्हुल्यासोबत त्या संचालक मंडळाच्या बैठकीत उपस्थित राहिल्या. कामाच्या ठिकाणी महिलांना पोषक वातावरण मिळण्याकरता निसा खूप आग्रही असतात.

मानसी किर्लोस्कर, कलाकार आणि उद्यमी

उद्योजक गितांजली आणि विक्रम किर्लोस्कर यांची मानसी ही एकुलती एक २६ वर्षीय कन्या. आपल्याला एक ना एक दिवस उद्योगात लक्ष घालावं लागणार हे मानसीला लहानपणापासूनच माहीत होतं. पण तरीही तिनं तिचं कलेचं प्रेम जोपासलं. तिने ऱ्होड आयलंड स्कूल ऑफ डिझायनिंगमधून आपलं शिक्षण पूर्ण केलंय. टोयोटोसोबत हातमिळवणी केल्यावर कंपनीचा पसारा आणखी वाढला. मानसी कौटुंबिक उद्योगातल्या हेल्थकेअर आणि बांधकाम कंपन्यांची जबाबदारी सांभाळत आपली कलाही जोपासत आहे. बेंगळुरूतलं द साक्रा वर्ल्ड ऑफ हॉस्पीटल या प्रकल्पावर सध्या ती अहोरात्र काम करतेय. मानसीला भारतातल्या आरोग्यसेवांचा दर्जा वाढवयाचा आहे. साक्राची साखळी बनवून देशातल्या इतर शहरांमध्ये चांगली आरोग्यसेवा पोहचवायची आहे.

लक्ष्मी वेणू तडफदार उद्योजिका

टिव्हीएस् ग्रुपची ४६७ अब्ज रुपयांची उलाढाल असणारी उपकंपनी सुंदरम् क्लेटॉन लिमिटेड (एससीएल)ची व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मी वेणू आहे. भारतातल्या ऑटोमोटीव्ह उत्पादक कंपन्यांमध्ये टीव्हीएसचं नाव आघाडीने घेतलं जातं. लक्ष्मीने याले विद्यापीठातून अर्थशास्त्रातली पदवी घेतली तर इंग्लंडच्या वारविक विद्यापीठातून इंजिनिअरिंग व्यवस्थापनात डॉक्टरेट मिळवली. लक्ष्मीत जन्मजातच नेतृत्वगुण आहेत असं म्हटल्यास त्यात काही वावगं ठरणार नाही. तिचे वडिल वेणू श्रीनिवासन टिव्हीएस ग्रुपचे अध्यक्ष आहेत तर तिची आई मल्लिका श्रीनिवासन ट्रॅक्टर आणि शेतकी उपकरण मर्यादित कंपनीच्या अध्यक्षा आहेत. सुंदरम-क्लेटॉन ऑटोमोटिव्हच्या विक्रीत वाढ आणि भविष्यातल्या आक्रमक चढाओढीकडे लक्ष्मीची करडी नजर आहे.

या कन्यकांनी आपल्या कार्यपद्धतीने आणि यशाने औद्योगिक सम्राटांना आपल्या कारभाराची सूत्र त्यांच्याकडे सोपावायला भाग पाडलं आहे. फक्त मुलांनांच कारभाराचा वारसा हक्क मिळेल ही पद्धत आता या राजकन्यांच्या यशामुळे नामशेष होत आहे. काहीजणी तर कौटुंबिक व्यवसायापासून बाजूला होत स्वतःच नवीन काहीतरी सुरू करत आहे. स्वतःच्या मेहनतीवर त्यात त्यांना चांगलं यशही मिळत आहे. 

लेखिका – शारिका नायर

अनुवाद – साधना तिप्पनाकजे

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags