संपादने
Marathi

स्टार्टअप सुरु करताय ? मग या ११चुका टाळा, भावी उद्योजकांसाठी कानमंत्र

20th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

स्टार्टअप सुरु करणारा प्रत्येक उद्योजक सुरुवातीच्या काळात काही चुका करतो. या चुका कोणत्या आहेत ? त्यापैकी कोणत्या चुका दुरुस्त केल्या जाऊ शकतात त्याबद्दल सांगतायत फाईंडयोगी संस्थेचे संस्थापक नमन सारवगी

फाईंडयोगी संस्था सुरु करताना सुरुवातीच्या तीन वर्षात मी २० ते २५ वेगवेगळ्या उद्योजकांच्या संस्थापकांशी चर्चा केली. आम्ही एकमेकांना रोज पाहत होतो. कधी-कधी दुपारच्या जेवणाच्यावेळी आपल्या समस्या एकमेकांशी शेअर करायचो. मी त्यांना काही मदत करु शकत नव्हतो. पण या चुकांचा एक पॅटर्न असल्याचं मला जाणवलं. ज्या चुका आम्ही रोज करत होतो. यापैकी बहुतेक संस्थापक माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे होते. त्यांनी चांगल्या शिक्षणसंस्थांमधून शिक्षण पूर्ण केलं होतं. नावाजलेल्या कंपन्यांमध्ये नोकरी केली होती. त्यामुळे त्यांच्याकडे तगडा अनुभव होता. पण या चुकांचं अनेकदा भीती आणि काही वेळा फक्त आळशीपणा हेच कारण होतं हे मला जाणवलं.

image


या चुकांची ही एक नमुना यादी आहे.

कामाच्या वेळाची तडजोड

रोज किमान १० तास काम करण्याचा प्रयत्न करा. विशेषत: सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळात काम करा. त्यामुळे तुम्ही शारिरीक आणि मानसिक रित्या सदृढ राहाल. टीमच्या सदस्यांशी तुम्ही नियमित भेट घेणं आवश्यक आहे. कामाची अव्यवस्थित वेळ आणि बेशिस्त या प्राथमिक गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी अंगी शिस्त अंगिकारली पाहिजे.

कमी वेळात एखाद्याला नोकरीवर घेणे

विमानाचं तिकीट स्वस्तामध्ये खरेदी करण्यासाठी लोकं एखादा तास सहज खर्च करतात. पण ज्या व्यक्तीला नोकरी देणार आहोत, त्याची माहिती घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. लक्षात ठेवा महिनाभर गळणारा नळ वापरण्यापेक्षा त्यावर एकदाच चांगला खर्च करणं आवश्यक आहे.

कोणतेही कोडिंग नाही

एक संस्था म्हणून तुम्ही एखादी वस्तू बनवणे किंवा त्याची विक्री करणे हा तुमचा उद्देश असतो. त्यावेळी एखादा युवा संस्थापक सुरुवातीच्या काळात रोज काम करतो. संस्थेचं कार्यालयीन काम स्वत: करण्यावर त्यांचा भर असतो. हे उद्योजक तांत्रिक आणि विक्रीच्या कामासाठी कर्मचा-यांची नियुक्ती करतात. अशा प्रकारे काम करणा-या स्टार्टअप्सबद्दल कदाचित तुम्ही फारसं ऐकलं नसेल. कारण ही स्टार्टअप दीर्घकाळ टिकत नाहीत.

अन्य स्टार्टअपवर चर्चा करणे

ही माझी अत्यंत आवडती गोष्ट आहे.याचा मला कधीही कंटाळा येत नाही. दोन संस्थापकांच्या व्यवसायात डॉट कॉम ( संकेतस्थळामधील पत्ता) सारखा असेल. पण त्यांचा उद्योगही एक असेल असे नाही. त्यामुळे दुस-या संस्थापकाशी चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. तो वेळ चांगल्या वस्तुंची निर्मिती करण्यामध्ये घालवावा. किंवा आपल्या उद्योगांमध्ये येत असलेल्या अडचणी सोडवण्यावर भर द्या. दुस-या स्टार्टअपचं काय झालं ? याचा तुमच्या उद्योगावर काहीही परिणाम होत नसतो.

एक लोगो तयार करण्याचा प्रयत्न

तुमचे प्रोडक्ट बाजारासाठी योग्य आहे की नाही याची तुम्हाला कल्पना असणे आवश्यक आहे. त्याशिवाय तुमच्या लोगोमधून तुम्ही ठोस संदेश देऊ शकत नाही. विजरॅकेटचा लोगोमधील अक्षरं अस्पष्ट होती. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट लपली होती. त्यामुळे वेबसाईट सुरु होण्यापूर्वीच त्यांना ग्राहक मिळाले होते.

कल्पना अर्धवट सोडू नका

कल्पना या चांगल्या असतात. त्यांना अर्धवट सोडू नका. जास्तीत जास्त डेटा जमा करा. त्यानंतर निर्णय घ्या. अर्धवट चर्चांमुळे एखाद्या प्रोडक्टवर काम सुरु करण्यासाठी अनेक दिवस वाया जाऊ शकतात. जर दोन व्यक्ती एकमेंकाशी आपल्या कल्पना आणि तर्कांची देवाणघेवाण करु शकत नसतील तर त्यांनी एका टिममध्ये काम करण्यात वेळ घालून नये.

ग्राहकांचा शोधण्यासाठी फेसबुकचा तळ गाठणे

फेसबुकवर पडिक व्यक्ती हा रिकामटेकडा असतो. ज्या व्यक्तींना तुम्ही ओळखतही नाही. त्यांच्यासोबत वेळ वाया घालवू नका. काही पैसे खर्च करून फेसबुकवर जाहिरात द्या आणि आपल्या कामाची पडताळणी करा.

सर्व लिखीत स्वरुपात हवे

हा व्यवस्थापानाचा विषय आहे. सर्व सुचना लिखित स्वरुपात द्या. तोंडी आदेश लोकांपर्यंत पोहचाताना अडचणी येऊ शकतात. यामुळे वादही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही काही नवे बनवण्याचा विचार करत असताना तुमचे विचार कदाचित पूर्ण तयार झालेले नसतील. अशा वेळी त्याचं लेखन करुन ठेवलं तर त्या विचारांना निश्चित आकार मिळू शकतो.

काळानुसार काम करा

सहा महिन्यामध्ये सर्व निधी जमा होईल असा विचार करणं सोडा. त्या ऐवजी ‘अ’ काम पूर्ण केलं तर इतका निधी मिळेल, ‘ब' काम केलं तर त्याचा हा फायदा होईल अशा प्रकारच्या चर्चा कंपनीमध्ये सुरु करा. त्यामुळे सर्व कंपनीचे कर्मचारी एक लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून काम करायला लागतील. तसंच तुमच्या देणगीधारकांनाही ख्रिसमसच्या सुट्टीनंतर किंवा एखादी अडचण पूर्ण झाल्यावर पैसे गोळा होतील असे सांगू नका. त्याऐवजी एकाच वेळी वेगवेगळ्या देणगीधारकांशी चर्चा करा. तुम्हाला अनेक देणगीदार मदत करण्यास तयार होतील त्यावेळी विनम्रपणे एखाद्या देणगीधारकाची मदत तुम्ही नाकारायला हवी.

अनुभवी लोकांना नोकरीवर ठेवा-

कर्मचारी उत्साही असणं ही काही त्याची विशेषता नाही. तुमच्याकडे प्रशिक्षण देण्यासाठी वेळ कमी आहे. तुमचं काम पूर्ण करु शकतील अशाच लोकांना नोकरी द्या. मोठ्या कंपनीच्या नोकरी देण्याच्या पद्धतीची नक्कल करु नका. त्या कंपनीचा पायाभूत विकास अगोदरच झालेला असतो.

विनाकारण सल्ला ऐकणे

दुस-या स्टार्टअपची तुम्हाला माहिती त्याचा देणगीदार किंवा संस्थापक सदस्य सांगेल तेवढीच मिळू शकते. ही माहिती तुम्हा एखादा पत्रकाराच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येत असेल तर ही माहिती केवळ माध्यमांचं लक्ष वेधून घेण्यासाठी असू शकते. जी गोष्ट दुस-या उद्योगासाठी फायद्याची ठरलीय ती तुमच्या उपयोगाची असेलच असे नाही. त्यामुळे असे सल्ले किंवा गोष्टी लक्षपूर्वक ऐका आणि नंतरच त्याचं गरजेनुसार अनुकरण करा

लेखक--नमन सारावगी

अनुवाद – डी. ओंकार

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags