संपादने
Marathi

ऊर्जा संवर्धन आणि वापराला नवीन परिमाण देण्याचं लखनौच्या सोलर स्टोअरचं उद्दीष्ट

2nd Jan 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

ऊर्जेचं संवर्धन हे ऐच्छिक न राहता सध्या आपल्याकरता गरज बनली आहे. ऊर्जेचं वेगवेगळ्या प्रकारांमधलं रुपांतरण हे केवळ उरलेल्या आणि रुपांतरण करता न येणाऱ्या ऊर्जेची बचत करण्याकरता उपयोगी पडणार आहेच. शिवाय, निसर्गावर होणाऱ्या हानीकारक परिणामांना नियंत्रित करण्याकरताही तिचा उपयोग होणार आहे. सौरऊर्जा ही अतिशय सहज उपलब्ध होणारा ऊर्जेचा स्त्रोत आहे.

सौरऊर्जेचा दैनंदिन जीवनात परिणामकारक उपयोग करण्याच्या उद्देशाने, योगी त्रिपाठी यांनी २००८ मध्ये ‘द सोलर स्टोअर’ या ऑनलाईन स्टोअरची लखनौमध्ये सुरूवात केली. ३३ वर्षीय योगी यांनी पुण्याच्या आर्मी इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनिअरींग केलं आहे. सौरऊर्जा आणि तिचे फायदे यात त्यांना खूप आधीपासूनच विशेष रस आहे. सौरऊर्जेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्याकरता ते ऑस्ट्रेलियामध्ये गेले होते. पण प्रत्यक्ष मैदानात उतरूनच काम करण्याच्या उद्देशाने ते दोनच महिन्यात तिथून परतले.

फोटो सौजन्य- शटरस्टॉक

फोटो सौजन्य- शटरस्टॉक


मोठ्या कल्पना

सोलर सेल आणि इलेक्ट्रीक कार्स यासारख्या कल्पना आधीच यशस्वी झाल्या आहेत. पण योगींना आपली मारुती ८०० कार सोलर इलेक्ट्रीकल कारमध्ये (ताशी ६० किमी वेग) परावर्तित करण्यात यश आलयं.

योगी या कारबद्दल सांगतात, कारमध्ये पाच लाख रुपयांचे 2KW चे सोलर पॅनेल्स आहेत. यामुळे इंधनाच्या बचतीसोबतच वीजेच्या बिलामध्येही बचत होणार आहे. एकदा चार्ज केल्यावर ही कार ६० किमी धावते आणि खर्च मात्र ४५-५० रुपये येतो. तर एवढचं अंतर कापायला पेट्रोल कारला ३२५ रुपये लागतात. याची बॅटरी साधारण ५० हजार किमीपर्यंत चालण्याचा दावा ते करतात.

पण योगी यांना बऱ्याचशा आर्थिक अडचणी भेडसावल्या. योगी यांनी हार न खाता प्रोजेक्टर्स आणि सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांवर काम करण्याचं ठरवलं. २०१० मध्ये योगी यांनी इलेक्ट्रीक कार्स, घरगुती उत्सर्जन नियंत्रण पद्धत यासारखी काही चाचणी उत्पादनं बनवली. त्यांना बाजारातून खूप छान प्रतिसाद मिळाला. भारत हा या क्षेत्रात नवखा आहे त्यामुळे कमी किंमत असलेल्या उत्पादनांची सुरूवात इथून करता येऊ शकते.

पर्यायांकडे नजर

दरवर्षी भारतात केवळ एकदाच वापरता येणारे ३६० कोटी AA/AAA/C आणि D सेल्स वापरण्यात येतात. सोलर स्टोअरने NiMh चार्जेबल सेल असणारे बॅटरी चार्जर्स बनवण्याचं ठरवलं. योगी सांगतात, “हे सेल एक हजार वेळा चार्ज आणि डिस्चार्ज होईपर्यंत वापरता येतात. आमच्याकडे कुठेही सूर्यप्रकाशात ठेवल्यावर बॅटरी चार्ज करता येणारे सोलर सेल चार्जर्सही आहेत”.

एव्हरेडी, निप्पो आणि ड्यरासेल यांच्याशी सोलर स्टोअरची स्पर्धा आहे. योगी सांगतात, पूर्वी महिन्याला १५ ते २० हजार रुपयांपर्यंतच आमच्या उत्पादनांचा खप व्हायचा. पण आता दर महिन्याला साधारण एक लाखांपर्यंत उत्पादन विकली जात आहेत.

मर्यादित नफ्यातूनच परत कामासाठी, शोधासाठी खर्च करावा लागत असल्याने जाहिरातीकरता हातात काहीच शिल्लक राहत नाही. बरेच प्रयत्न करुनही सोलर स्टोअर अजूनही भांडवलाकरता गुंतवणूकदाराच्या शोधात आहे. योगी सांगतात, “माझ्या माहितीप्रमाणे आम्ही जगातील सर्वात स्वस्त सेल कनव्हर्टर आहोत. त्याबरोबर भारतातले एकमेव सोलर सेल आणि मोबाईल चार्जर निर्माते आहोत”.

योगी पुढे म्हणतात, ते सध्या अनोख्या प्रयोगावर काम करत आहेत. हालचालींवर आधारीत रस्त्यावरचे दिवे सुरू होणारी प्रणाली, फक्त 18W ऊर्जेचा वापर होणारा बॅटरीवर चालणारा एअर कुलर, 12 V बॅटरी चार्ज झाल्यावर आपोआप चार्ज होणं तसचं पॉवर सप्लायचं थांबवणारा बॅटरी चार्जर बनवण्यावर ते सध्या काम करत आहेत.

ऑनलाईन जाहिरातीकरता १० लाख रुपये तर वितरक आणि वितरणाकरिता ५० लाख रुपये जमवण्याचं सोलर स्टोअरच्या टीमचं उद्दीष्ट आहे. केट्टो (Ketto) कडून काही मदत मिळवण्याच्या प्रयत्नातही ते आहेत.

युअरस्टोरीचं मत

हरितऊर्जेचा वापर आणि फायदे याबाबत भारतात जागरुकता वाढत आहे. मात्र पाश्चिमात्य देशांशी तुलना करता आपल्याला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. जागतिक पातळीवर सोलर मोबाईल फोन, ऊर्जा निर्मिती उपकरणं आणि चार्जर्स ही काही नवी नाहीत. पण भारतीय बाजारपेठेत या गोष्टी रुळायला जरा वेळ लागेल हे निश्चित.

इतर उत्पादनांच्या कच्च्या मालाप्रमाणेच, सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांच्या कच्च्या मालाच्या आयातीकरता आपण बहुतांश चीन आणि तैवानवर अवलंबून आहोत. हळूहळू का होईना, हरित ऊर्जेची कल्पना आपल्याकडे उचलून धरली जात आहे. या लाटेवर स्वार होऊन सोलर स्टोर किती अंतर कापतं हे येणारा काळच ठरवेलं.

लेखिका – सिंधू कश्यप

अनुवाद – साधना तिप्पनाकजे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags