संपादने
Marathi

आईस्क्रीममध्ये काहीतरी नविन शोधत असाल तर, ‘स्कूप्स एन स्टिक्स’ ला पर्याय नाही. . . .

Team YS Marathi
18th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

आईस्क्रीमचे नाव घेताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते, मात्र जर आईस्क्रीम जर हाताने आणि केवळ नैसर्गिकरित्याच बनलेली असेल तर गोष्टच निराळी. दिल्लीचे लोक याच प्रकारात आईस्क्रीम मध्ये काही नवे शोधत असतील तर ‘स्कूप एन स्टिक्स’ कडे जावेच लागेल.. आईस्क्रीमची चव चाखायला देत आहेत, शोएब मोहम्मद आणि फातिमा नकवी.

image


हे दोघेही दक्षिण दिल्लीतील वसंतकुंजमध्ये ‘स्कूप्स एन स्टिक्स’ नावाची आईस्क्रीमची कंपनी चालवितात. येथे चॉकलेट, सॉल्टेंड कॅरेमल, बीटरूट, वॅनीला, स्ट्रॉबेरी, ऑरेंज, लेमन, जिंजर आणि पॉमोग्रेनेट या सर्व प्रकारची आईस्क्रीम उपलब्ध आहेत. त्याव्यतिरिक्त येथे प्रत्येक प्रकारच्या चविष्ट आईस्क्रीमला एकत्र करून एक वेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम बनवले जाते. शोएब यांनी ‘युअरस्टोरी’ला सांगितले की, ‘आम्ही आमचे कुठलेही आईस्क्रीम बनविण्यासाठी कृत्रिम सामग्रीचा वापर करत नाहीत. आम्ही सामग्रीची निवड करण्याकडे विशेष लक्ष देतो आणि उत्तम गुणवत्तेचे सामानच आईस्क्रीमसाठी वापरतो.’

image


शोएब यांच्या मते, ‘ मी आणि फातिमा जवळपास ३ वर्षे लंडन मध्ये राहिलो. मी ऑक्सफोर्ड महाविद्यालयातून एमबीए केले आहे आणि सागरी अभियंता (मरीन इंजिनियर) म्हणून काम केले होते. दुसरीकडे फातिमा या बँक ऑफ अमेरिकेत इन्वेसमेंट बँकर म्हणून कार्यरत होत्या.’ लंडन मध्ये राहताना आम्ही दोघे वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम खायचो आणि विचार करायचो की, ही चव आमच्या देशात का मिळत नाही. या दरम्यान फातिमा लंडनमध्ये आईस्क्रीम तयार करायला शिकल्या.

‘स्कूप्स एन स्टिक्स’ मध्ये विपणनाची जबाबदारी शोएब यांच्याकडे आहे. ते सांगतात की, ‘आम्ही दोघे स्वतःला ‘आईस्क्रीम वेडे’ मानतो. आईस्क्रीमची चव चाखण्यासाठी आम्ही युरोपच्या काही शहरात देखील गेलो आणि तेथील अनेक प्रकारचे आईस्क्रीम देखील चाखले आणि त्यांची बनविण्याची पद्धत देखील शिकलो.’ लंडन मध्ये राहताना आम्ही दोघांनी मन बनविले की, आम्ही भारतात परतून आईस्क्रीमच्या क्षेत्रात काम करू आणि लोकांना अनेक प्रकारची चव आणि कलात्मक आईस्क्रीम चाखायला लावू.

image


शोएब सांगतात की, ‘ऑगस्ट २०१४ मध्ये भारतात परतल्यानंतर आम्ही सर्वात पहिले काही महिन्यापर्यंत बाजाराची पूर्ण तपासणी केली. येथे उपलब्ध असलेल्या आईस्क्रीमची माहिती घेतली. त्यावेळी आम्हाला माहित पडले की, भारतातील शहरात मिळणा-या अधिकाधिक आईस्क्रीम मध्ये कृत्रिम पदार्थांचा वापर असतो. त्यावेळी आम्ही हा निष्कर्ष काढला की, भारतात नैसर्गिक सामग्रीने बनलेल्या हैंडमेड आईस्क्रीमसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.’

सर्वात पहिले आम्ही काही नवी चविष्ट आईस्क्रीम बनवून लोकांना चाखायला दिली आणि त्यांच्या प्रतिक्रियेनुसार पुढील रणनीती बनवली. त्यानंतर आम्ही फेब्रुवारी २०१५ मध्ये ‘स्कूप्स एन स्टिक्स’ कंपनीचे अनावरण केले. शोएब सांगतात की, ‘जी व्यक्ती एकदा आमची आईस्क्रीम खाते, त्या व्यक्तीला दुसरीकडील आईस्क्रीम पसंतच पडत नाही. आमच्या ग्राहकांच्या संख्येत तेजीने वाढ होत आहे.

image


फातिमा यांच्या मते, कंपनीच्या सुरुवातीच्या १० महिन्यात आतापर्यंत आम्हाला चांगली प्रतिक्रिया मिळाली आहे. शहरातील काही प्रसिद्ध हॉटेल स्थायीरित्या आमच्याकडून आईस्क्रीमची मागणी करत आहेत. त्याव्यतिरिक्त विवाह सोहळा, वाढदिवस इत्यादी आनंद सोहळ्यासाठी आमच्याकडे आईस्क्रीमची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मी आणि शोएब अनेक कार्यक्रमात आमचा आईस्क्रीमचा स्टॉल नक्की मांडतो. येथे लोकांकडून मिळणारी प्रतिक्रिया आमच्यासाठी बहुमुल्य असते. आम्ही लवकरच आमचे स्वतःचे आईस्क्रीम पार्लर उघडणार आहोत आणि आम्हाला संपूर्ण देशात आमच्या आईस्क्रीम पार्लरची चेन उघडायची आहे.

लेखक : अनमोल

अनुवाद: किशोर आपटे.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags