संपादने
Marathi

याचा प्रारंभ संस्थापकांपासून होतो .....शैलेंद्र सिंग व्यवस्थापकीय संचालक ‘सेक्वाया कॅपिटल !’

Team YS Marathi
31st Oct 2015
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

गुंतवणुकीच्या क्षेत्रात चांगला किंवा वाईट ऋतू नसतो. तुम्हाला काय हवे असते? एक आवड असणारा संस्थापक, एक भव्य व्यावसायिक कल्पना, आणि तसाच आवडीने काम करू शकणारा चमू, जो खरोखरच सामूहिकरित्या काम करू शकतो.


श्रद्धा शर्मा (डावीकडे) शैलेंद्र सिंग यांच्यासमवेत

श्रद्धा शर्मा (डावीकडे) शैलेंद्र सिंग यांच्यासमवेत


आपल्या तडाखेबंद संवादातून टेकस्पार्क२०१५च्या शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात शैलेंद्र यांनी फूडटेक(अन्न तंत्रज्ञान)हायपर लोकल (स्थानिक)क्षेत्रातील कथित मंदीच्या वातावरणाबाबत स्पष्टपणे सल्ला दिला.

“ ठीक आहे येथे काही काळे ढग असतील परंतु हे कुणालाच माहिती नाही की, ही छोटीशी वावटळ आहे? की खूप मोठे चक्रीवादळ वाट पाहते आहे? म्हणूनच हातात छत्री घेऊन निघणे शहाणपणाचे ठरेल.” म्हणजेच निधी उभारणीत एखाद्याचा दृष्टीकोन कसा असायला हवा ? शैलेंद्र मानतात की, एखाद्या विशिष्ट वेळी लोक काय विचार करतात? यावरून अंदाज करणे चुकीचेच ठरेल. ग्राहकांच्या गरजा बदलत असतील त्यानुसार कंपनीने देखील त्या पूर्ण करण्यासाठी प्रायोगिक पद्धतीने कार्यरत राहिले पाहिजे.

त्यानंतर एखाद्या स्टार्टअप मध्ये नेमकी काय गुंतवणूक हवी ते शैलेंद्र सांगतात? 

ते सांगतात की, त्याची सुरुवात संस्थापकापासून होते. “तरुणवयात जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळी खूपच बंधने होती. मला वाटते बहुतांश तरुणांची सुरुवात त्याच विचारातून होत असावी. मी सदैव मानतो की, आयुष्यातील चांगल्या गोष्टींचे कधीही मोजमाप करता येत नाही. तसेच स्टार्टअपला तुम्ही एखाद्या परिमाणात मोजू शकत नाही.” ते म्हणाले. अशा प्रकारे हे वेड (आवड ),मोकळेपणा, स्वमग्नता आणि प्रेरणा या पतपुरवठा करणाऱ्या चमूच्या गुणांचा समुच्चय त्यांच्या ठायी असावा असे शैलेंद्र सांगतात. ते विषद करतात, त्यानुसार ही एक प्रकारची सत्वपरीक्षाच असते जसे, ‘ आम्हाला त्या भागीदारीत पाच ते दहा वर्षे गुंतवणूक करायची आहे ’

त्यांच्या मते बहुतांश वेळी एखाद्या कंपनीत तिच्या उभारणीच्या वेळी गुंतवणूक करणे म्हणजे एक प्रकारची आकर्षक गोष्टच असते. तेथे मान्यता मिळवण्यासाठीही मोठेया प्रमाणात मेहनत करावी लागते. ‘सेक्वाया’ सोबत आता दहा वर्ष घालवल्यानंतर शैलेंद्र एखाद दोन नवीन कल्पनांचा मागोवा देखील घेतात. कोणत्या? ज्या त्यांना इतरांपेक्षा काही वेगळं देतात.? “अतिशयोक्त पद्धतीच्या,” ते तातडीने प्रतिसाद देतात. एक गुंतवणूकदार म्हणून त्यांना वाटते की, संस्थापकावर त्याच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

आयआयटी आणि आयआयएम यांना पतपुरवठा

येथे एक असा समज आहे की सुरुवातीला आयआयटी किवा आयआयएमच्या बहुतेक माजी विद्यार्थ्यांना पतपुरवठा मिळतोच. शैलेंद्र तो खोटा ठरवतात. “ मी पूर्णतः असहमत आहे. तत्वाज्ञानातील पदवी मिळवलेले फ्रीचार्जचे कुणाल शहा, प्रक्टोचे एनआयटी-के पदवीधारक शशांक, हेल्पचाटचे अंकुर सिंगला वकील होते, आणि ओवायओ रुम्सचे रितेश कधीच महाविद्यालयात गेले नाहीत” ते सांगतात. ते मानतात की. स्टार्टअप चे भावविश्व(वातावरण) हे शर्यतीच्या मैदानासारखे आहे आणि गुंतवणूकदार स्पर्धकासारखे! चतुर गुंतवणूकदार त्यांच्यामते त्यांच्या आवडीची काळजी घेतात जेणेकरून पुढील मोठे अनर्थ टाळता येतात.

ज्वलंत क्षेत्र

शैलेंद्र यांच्यामते कोणती क्षेत्र गुंतवणुकीसाठी ज्वलंत आणि आकर्षक आहेत? ते म्हणतात की, एखादे क्षेत्र संस्थापकाच्या मते ज्वलंत नसेल तर ते कधीही ज्वलंत होऊ शकत नाही. सन २००७ मध्ये ‘फॅशन’ हा कळीचा मुद्दा होता. आज तो आणखी काहीतरी आहे. अशाप्रकारे ते पुढे सांगतात की, जर त्यांना निवड करायची झाली तर ते त्यांचा पैसा ‘मोबाईल’ मध्ये गुंतवतील जे फारच सरळ सोपे आणि दराच्या दृष्टीने अधिक फायद्याचे ठरेल. दुसरे म्हणजे अर्थशास्त्र, जेथे नियमात पतसंस्थानुसार बदल होतात. शैलेंद्र यांना काही स्टार्टअप्स अस्थिर जाणवले आहेत जे खूपच सारखे आहेत परंतु ओढून आणलेल्या व्यावसायिक आराखड्यातील आहेत. ते मानतात की, भारत ही विविधांगी बाजारपेठ आहे जेथून वेगवेगळ्या प्रकारच्या अस्थिरता निर्माण होतात.त्यांनी उद्योजकांना सांगितले की, अनेक प्रकारच्या गोष्टी शिकवल्या जातात ज्या प्रत्यक्षात नसतातच.

प्रेक्षकांच्या प्रश्नाला उत्तर देताना: ‘साहसी गुंतवणुकीतून नवख्या उद्योगांना अधिक पैसे खर्च करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल का?’ शैलेंद्र म्हणाले की, अनेक प्रकरणात तसे झाले आहे पण हे त्यावरही अवलंबून आहे की, उभारणीसाठी किती शक्यता आहेत . ते पुढे म्हणाले की, “जर तुम्ही भाग भांडवल उभारलेच नाही, तुम्ही मागे पडाल, विशेषतः जेव्हा तुम्ही अंमलबजवणीच्या श्रेणीत असता. येथे डार्विनचा सिद्धांत काम करतो.” पुन्हा एकदा एथलीटचे उदाहरण देऊन ते सांगतात की, “तुमचा गुंतवणूकदार जरी म्हणाला की, उधळा (प्रमाणाबाहेर भांडवल खर्च करा) तरीही तुम्हाला अधिक जोमाने आणि ताकदीने मोठ्या प्रमाणात उभारावे लागेल”.

शैलेन्द्रसोबत फ्रीचार्ज, हेल्पचॅट,जस्ट डायल, प्रॅक्टो, म्यु सिग्मा, पीपर टॅप आणि झूमकार, या उभरत्या उद्योगांना शैलेन्द्र यांचे म्हणणे ऐकण्याची नामी संधी होती.

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags