संपादने
Marathi

ʻLogiNext Solutionsʼचा प्रेरणादायी प्रवास तंत्रज्ञानात महिलांचे प्रमाण वाढविण्याची ʻमनीषाʼ

Ranjita Parab
16th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

कार्नेगी मेलॉन विद्यालयात मार्क झुकेरबर्गसोबत झालेल्या एका भेटीने ʻLogiNextʼच्या (लॉगीनेक्स्ट) सह-संस्थापक मनीषा रायसिंघानी यांचे अवघे आयुष्यच बदलून गेले. या भेटीबद्दल बोलताना त्या सांगतात, ʻमार्क यांनी आपली सहकारी शेरील सॅंडबर्ग (Sheryl Sandberg) यांच्याबद्दल सांगितले. शेरील यांचे TED talk बघितल्यानंतर माझी उत्सुकता वाढत होती. TED talk मध्ये शेरील महिला नेतृत्वाबाबत बोलल्या आहेत.ʼ आयबीएमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गिन्नी रोमेत्टी, आणि शेरील सॅंडबर्ग या दोन महिलांपासून मनीषा फार प्रेरीत झाल्या आहेत.

मनीषा या लॉगीनेक्स्ट सॉल्यूशनमध्ये तंत्रज्ञान आणि उत्पादनाचे काम पाहतात. बिझनेस मिटिंग्स, क्लाईंट ब्रिफिंग आणि नेटवर्किंग कार्यक्रमादरम्यान अनेकदा लोक विचार करतात की, मनीषा यांच्या कंपनीचे सह-संस्थापक तंत्रज्ञानाची माहिती देतात, ती माहिती त्या लोकांपर्यंत पोहोचवतात. मात्र सत्य यापेक्षा फारच वेगळे आहे. एका सह-संस्थापकाच्या रुपात स्वतःचा वेगळा ठसा उमटवण्याचा त्या प्रय़त्न करत आहेत. एका सर्वसामान्य कुटुंबात मनीषा यांचे बालपण व्यतित झाले. त्यांच्यावर सामाजिक आणि आर्थिक दबाव नसल्याने मनीषा यांना आव्हानांसोबत लढण्याची आणि आपला मार्ग शोधण्याची हिंमत मिळाली. आपल्या घरातील ʻमुलगाʼ समजल्या जाणाऱ्या मनीषा पुढे जाऊन पारिवारिक व्यवसायाचे नेतृत्व करतील, अशी अपेक्षा त्यांच्या कुटुंबाकडून बाळगली जात होती. मात्र त्यांनी परिवाराच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या तंत्रज्ञानाची निवड केली.

image


मुंबई विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी सॉफ्टवेयर इंजिनीयर म्हणून ʻमास्टेकʼसोबत काम केले. या कंपनीत सहा महिने काम केल्यानंतर, ʻकॉर्पोरेटʼ क्षेत्रात त्या आयुष्यभर काम करू शकत नाहीत, याची त्यांना जाणीव झाली. २००९ साली मास्टेक कंपनीत करण्यात आलेल्या नोकर कपाती प्रक्रियेदरम्यान कमी करण्यात आलेल्या १०० जणांमध्ये मनीषा यांचाही समावेश होता. आपल्या कॉर्पोरेट कार्यकाळानंतर मनीषा यांनी काहीतरी नवे शिकण्याचा ध्यास घेतला. काहीतरी असे शिकायचे की, ज्याची तंत्रज्ञानात मदत होऊ शकेल, असा निर्णय त्यांनी घेतला. माहिती प्रणाली (Information System) पद्धतीत त्यांना या प्रश्नाचे उत्तर सापडले. त्यानंतर त्यांनी ʻकार्नेगी मेलॉनʼ येथून माहिती प्रणालीमध्ये मास्टर्सची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी iTunes करिता डाटा विश्लेषक म्हणून वार्नर बंधुंसोबत काम केले. आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांनी अमेरिकेतील आयबीएमसोबत काम केले. २०१० साली मनीषा यांची भेट CMU येथे ʻLogiNextʼचे सह-संस्थापक ध्रुविल यांच्याशी झाली. त्यानंतर २०१३ साली एके दिवशी न्यूयॉर्क येथे कॉफी पित असताना त्या ʻLogiNextʼ व्यवसायातील समस्या आणि जटील गोष्टींबाबत चर्चा करत असताना त्यांना समजले की, या सर्व गोष्टींचे उत्तर इंटरनेटवर आहे. आपल्या मनोमन ही गोष्ट पक्की ठरवून त्यांनी अमेरिकेत आपल्या पहिल्या उत्पादनावर काम करणे, सुरू केले. २०१४ साली त्या अमेरिकेतून भारतात परतल्या.

आपल्या अनुभवाच्या आधारे मनीषा सांगतात की, ʻतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सध्या फार कमी महिला आहेत. दहाव्या इयत्तेपर्यंत मुला-मुलींचे प्रमाण समान होते. मात्र जेव्हा महाविद्यालयात मी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. तेव्हा हे प्रमाण अधिक कमी झाल्याचे माझ्या लक्षात आले. शाळेत जवळपास ४० टक्के, पदवीपर्यंतच्या महाविद्यालयात ३० टक्के आणि कार्नेगी मेलॉन येथे २० टक्के या दराने हे प्रमाण कमी झाले होते. त्याहूनही कमी महिला बी२बी आणि लॉजिस्टिक्स येथे आहेत. हे काम थोडे क्लिष्ट नक्कीच आहे. मात्र या कामात मला आनंद मिळतो.ʼ लॉजिस्टिक्स कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना एकटीच महिला असल्याने येणाऱ्या आव्हानांमुळे त्या नाराज होतात. शिवाय या क्षेत्रात महिलांचे प्रमाण अल्प असल्यामुळे त्या निराश होतात. एक नेतृत्वशाली व्यक्तिमत्व आणि उद्योजिका होण्याच्या नात्याने, या क्षेत्रात स्त्री-पुरुषांचे समप्रमाण राखणे, हे त्या एक आव्हान समजतात. त्या सांगतात की, ʻआपण अनेकदा पाहिले आहे की, कार्यालयात विशेषतः सुरुवातीच्या काळात पुरुषांचे वर्चस्व असते. कारण अधिकतम स्टार्टअप पुरुषांद्वारे करण्यात येतात आणि महिलांना अन्य महिला नेतृत्वाकडून समर्थन मिळत नाही, हे या गोष्टीचे प्राथमिक कारण आहे, असे मला वाटते. ʻLogiNextʼमध्ये सध्या कार्यरत असलेल्या महिलांना आगामी काळात नेतृत्व सोपवण्याचा आमचा मानस आहे. तसेच त्या स्वतः स्टार्टअप सुरू करण्याचीदेखील संभावना आहे. मला आनंद वाटतो की, माझ्या टीमने मला नेतृत्वरुपात पसंत केले एक बॉस म्हणून नाही.ʼ

image


मनीषा तंत्रज्ञान आणि उत्पादनाच्या माध्यमातून कायम नाविन्यपूर्ण गोष्टींकडे लक्ष देतात. त्यांचे लक्ष्य त्यांच्या टीमला व्यावसायिक आणि व्यक्तिगत विकासाच्या प्रत्येक संधीकरिता सक्षम बनविणे, हे आहे. त्या सांगतात की, ʻफक्त स्थानिक स्तरावरच नाही तर जागतिक स्तरावरदेखील, सर्वात कुशल कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्याची आमची कल्पना आहे. बरेचसे भारतीय पश्चिमी देशातून भारतात काम करण्यासाठी विशेष करुन स्टार्टअपकरिता मायदेशी परतत आहेत. अमेरिकेतून भारतात परतणाऱ्या कुशल कर्मचाऱ्यांशी लवकरात लवकर संपर्क करण्यात आम्ही सक्षम आहोत आणि आम्हाला या गोष्टीचा अनुभवदेखील आहे.ʼ आपल्याद्वारे बनविण्यात आलेल्या डाटाला मनीषा महत्व देतात. त्यांचे कुटुंबदेखील त्यांच्या या उद्योजकतेच्या प्रयत्नांचे समर्थन करते. त्या सांगतात की, ʻतीन बुद्धिमान पुरुष म्हणजे ʻLogiNextʼचे सह-संस्थापक ध्रुविल संघवी, आमचे गुंतवणुकदार संजय मेहता आणि आमचे सल्लागार मार्क देसंतिस यांनी कायम मला नेतृत्व करण्यासाठी प्रेरणा दिली. कंपनीच्या चढ-उताराच्या काळात आम्ही जे काही मिळवले, त्यामुळे माझा विश्वास अधिक दृढ झाला आहे.ʼ भारतात लॉजिस्टिक आणि साखळी पुरवठा क्षेत्र (सप्लाई चेन इंडस्ट्री) तसेच अन्य विस्तारणाऱ्या बाजारपेठांच्या काम करण्याच्या पद्धतीत बदल करणे, हे मनीषा यांचे भविष्यकाळातील लक्ष्य आहे.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags