संपादने
Marathi

कुणालाही रक्ताची कमतरता होऊ नये म्हणून, ‘द सेवियर’ नावाने एक अभियान चालवत आहे, एक तरुण...!

Team YS Marathi
21st Apr 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

सध्याच्या जलद गतीने चालणा-या आयुष्यात कुणालाही, कधीही रक्ताची गरज पडू शकते. याबाबतची जाणीव आपल्याला तेव्हा होते, जेव्हा आपले कुणी जीवन आणि मृत्यू यामध्ये झगडत असते. ज्यानंतर आपली झोप उडते आणि रक्त गोळा करण्यासाठी खूप धावपळ करावी लागते. तेव्हा एखाद्या ब्लडबँकमधून अनोळख्या व्यक्तीने दिलेले रक्तच आपल्या व्यक्तीचे आयुष्य वाचविण्यात उपयोगी ठरते. मात्र, एक अशी व्यक्ती आहे, ज्यांना माहित आहे की, कुणाचे आयुष्य वाचविण्यासाठी रक्त किती किमती आहे. त्यासाठी ते दिवस रात्र याच प्रयत्नात आहेत की, जेथेही रक्ताची कमतरता असेल, तेथे ते आपल्या साथीदारांच्या सहाय्याने त्यांची मदत करू शकतील. कोलकाता येथे राहणारे कुणाल यांनी ‘द सेवियर’ नावाची एक संस्था देखील स्थापित केली आहे. त्यांची ही संस्था कोलकाता व्यतिरिक्त दिल्ली एनसीआर, बंगळूरू, मुंबई आणि दुस-या शहरात काम करत आहे. 

image


कुणाल यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण दिल्लीमध्ये राहून पूर्ण केले. जेव्हा ते पदवीच्या दुस-या वर्षात होते, तेव्हा त्यांनी बीबीए सारख्या विषयांवर पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली होती. त्याव्यतिरिक्त कुणाल यांनी सेवियर पब्लिकेशन नावाने एक कंपनी स्थापित केली. त्यामार्फत ते स्वतःच पुस्तक लिहायचे, छापायचे आणि स्वतःच त्याला विकण्याचे काम करत होते. विशेष बाब ही आहे की, त्यांनी लिहिलेली पुस्तके दिल्लीच्या इंद्रप्रस्थ विद्यापीठातील विद्यार्थी वाचत होते. कुणाल यांच्या मते, “मी ‘सेवियर’ नाव आपल्या आजीच्या नावाने घेतले आहे, ज्यांचे नाव सावित्री होते आणि शब्दकोशमध्ये जर एसएवी नावाने कुठला शब्द शोधला गेला तर, पहिला शब्द सेवियरच असतो.”

image


शिक्षणात हुशार असलेले कुणाल एका ठिकाणी बीबीए सारख्या विषयांवर पुस्तक लिहित होते, तेथेच दुसरीकडे त्याच दरम्यान त्यांनी वृद्धांसाठी एक अॅप देखील बनवले आणि त्याचे नाव ‘नो मोर टेंशन’ असे ठेवले. हे अॅप अजूनही गुगल प्लेस्टोरमध्ये सामील आहे. या अॅपच्या माध्यमातून वृद्ध लोक कुठल्याही संकेतस्थळाला काही सेकंदात उघडू शकत होते. या अॅपला २४टप्प्यात मांडण्यात आले होते आणि प्रत्येक टप्प्यात अनेक संकेतस्थळ असतात, ज्यानंतर केवळ दोन क्लिकमध्ये कुठलीही व्यक्ती आपल्या आवडीच्या संकेतस्थळाकडे पोहचू शकत होती. 

image


दिल्लीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना कोलकत्याला परतावे लागले. मात्र, त्याआधी त्यांनी एक कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली होती आणि त्याचे नाव “हाउ अॅन आईफोन मेड मी द यंगस्ट बिलेनियर” होते. ही कादंबरी केवळ उद्योजकतेशी संबंधित प्रत्येक त्या प्रश्नांचे उत्तर होते, ज्यांना त्याची माहिती हवी असते. कादंबरी लिहिताना त्याच्या आजोबांना एका अपघातात पायावर दुखापत झाली होती. ज्यानंतर त्यांची शस्त्रक्रिया करावी लागली. कुणाल यांच्या मते, “त्या दरम्यान आम्हाला बी पॉजिटिव रक्ताची गरज भासली, मात्र रुग्णालयात हे रक्त उपलब्ध नव्हते, त्यामुळे आम्हाला रक्त गोळा करण्यात खूप समस्या निर्माण झाल्या. तेव्हा आम्हाला जाणीव झाली की, देशात तीन कोटी लोक रक्त देण्यास पात्र असूनही  रक्ताची कमतरता आहे, एक कोटी लोकांकडूनदेखील रक्त मिळत नाही.” कुणाल सांगतात की, त्यांनी कुठेतरी वाचले होते की, देशात प्रत्येक वर्षी तीस लाख युनिट रक्ताची कमतरता होते. ज्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू होतो. 

image


स्वतःसोबत झालेल्या या घटनेनंतर कुणाल यांनी ऑगस्ट, २०१४मध्ये ‘द सेवियर’ नावाने फेसबुकवर आपल्या या अभियानाला सुरुवात केली. सुरुवातीस त्यांनी स्वतःसोबत ४-५ अशा लोकांना सामील केले, जे गरज पडल्यास रक्त देण्यासाठी तयार होत होते. ज्यानंतर हळू हळू त्यांनी अजून काही लोकांना स्वतःसोबत सामील केले आणि दीड वर्षाच्या आत त्यांचा एक मोठा गट तयार झाला. ज्याचे सदस्य केवळ कोलकत्यातच नव्हे तर, दिल्ली, बंगळूरू, मुंबई आणि दुस-या शहरात आहेत. या ठिकाणांवर ‘द सेवियर’चे सदस्य केवळ ब्लड कँप्मच लावत नाहीत तर, लोकांना रक्तदान करण्यासाठी जागरूकता अभियान देखील चालवितात. कुणाल यांच्या मते, प्रत्येक महिन्यात विभिन्न ठिकाणांवर ४-५ वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात. त्या व्यतिरिक्त आपातकालीन स्थितीत त्यांचा गट गरजूंना रक्त पोहोचविण्याचे काम करतो. 

image


विशेष बाब ही आहे की, फेसबुक सोबतच त्यांचा वॉट्सअपवर एक ग्रुप आहे, ज्यामार्फत कुठलीही आवश्यक माहिती एकमेकांना दिली जाते आणि जेव्हा डोनरची व्यवस्था होते, त्यानंतर ज्यांना रक्ताची गरज असेल, त्यांची भेट घेतली जाते. इतकेच नव्हे तर, डोनरला ‘द सेवियर’चा गट एक प्रशस्तीपत्र देखील देतो आणि त्याची माहिती हे लोक फेसबुकवर देखील देतात. कुणाल यांच्या मते, आतापर्यंत १५ हजार ब्लड डोनर यांच्यासोबत सामील झाले आहेत. दिल्लीत ‘द सेवियर’चे काम मनीषा जैन बघतात. कुणाल यांच्या मते, “मी एकटा इतके मोठे काम करू शकत नव्हतो, मात्र मनीषा जैन आणि सरन थाम्बी यांनी या अभियानात खूप मदत केली आहे.” 

image


‘द सेवियर’चा गट लोकांमध्ये रक्तदान करण्यासाठी जागरूकता पसरवण्यात सणावारांचा खूप चांगला वापर करतात. हे लोक होळी, दिवाळी, ख्रिसमस आणि अन्य प्रकारचे कार्यक्रम करतात आणि तेथे येणा-या लोकांमध्ये रक्तदानाबाबत प्रसार करतात. जागरूकते संबंधित सर्व कार्यक्रमांची माहिती हे फेसबुकवर देखील टाकतात. कुणाल यांच्या मते, “आमचा गट एक विशेष ध्येय गाठण्यासाठी काम करतो आणि जेव्हा तुम्ही दुस-यांची मदत करतात, तेव्हा नियतीदेखील तुमची मदत करण्यास साथ देते.” ४-५ महिन्यातच सातशे युनिट रक्त गोळा झाले आहे. ‘द सेवियर’च्या गटात ६० पेक्षा अधिक सदस्य सामील आहेत, जे देशातील वेगवेगळ्या भागात या अभियानात सामील आहेत. त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे मोठ्या संख्येने स्वयंसेवक देखील आहेत. जे त्यांची या कामात मदत करतात. कुणाल यांचे म्हणणे आहे की, एखाद्या गरजूला रक्ताची गरज असेल तर, ते त्यांना फेसबुक, संकेतस्थळामार्फत त्यांना संपर्क साधून रक्त मिळवू शकतात.

संकेतस्थळ : www.thesaviours.org

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

रक्तदाते उपलब्ध होणार आता एका कॉलवर 

रक्त, लाळ आणि डीएनए जतन करण्याच्या क्षेत्रात व्यवसायाची संधी निर्माण करणारी ‘ओपनस्पेसीमेन’

डायलिसिसचे देवदूत

लेखिका : गीता बिश्त

अनुवाद : किशोर आपटे


Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags