संपादने
Marathi

‘आरटीआय टी स्टॉल’, येथे आहे प्रत्येक समस्येचे समाधान!

18th Apr 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

ज्या व्यक्तीमुळे अनेक गावांनी सरकारबाबत माहिती घेतली आणि या माहितीच्या आधारावर लोकांनी सरकारकडून मिळणा-या सुविधा आणि आपला हक्क मिळविला, त्याची ओळख एक चहाचे दुकान आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्याच्या चौबेपूर गावात चहाचे दुकान त्यांचे कार्यालय देखील आहे. जेथे बसलेले लोक गरमागरम चहाच्या घोटांसोबत आपल्या समस्येचे निराकरण देखील शोधतात. मागील पाच वर्षापासून २७ वर्षाचे कृष्ण मुरारी यादव चहाच्या दुकानावर बसून हे काम करतात. तीन कच्च्या भिंती आणि छपराखाली असलेल्या या स्टॉलमधून माहितीचा अधिकार म्हणजेच आरटीआयचा वापर करून लोकांचा फायदा करण्यात ते तत्पर आहेत.

image


लोकशाहीची मुळे पसरविण्यात माहितीचा अधिकार कायद्याची (आरटीआय) जितकी प्रशंसा केली जावी, तितकी कमी आहे. यामुळे लाल फितशाही दूर करणे आणि अधिकारी वर्गाच्या टाळाटाळीच्या व्यवहाराला दूर करण्यात मदत नक्की मिळते, मात्र हा केवळ एक पैलू आहे. त्याचा दुसरा पैलू देखील आहे आणि तो असा आहे की, १२ ऑक्टोबर २००५पासून लागू झालेल्या आरटीआयबाबत आज देखील दूरच्या भागात राहणा-या लोकांना जास्त माहिती नाही. त्यांना हे माहित नाही की, आपल्या गावातील रस्ते असो, किंवा रुग्णालय किंवा स्वस्त धान्य दुकानात येणा-या सामानाची माहिती आरटीआयमार्फत कशी प्राप्त करु शकतात. या गोष्टीला जेव्हा जवळपास पाच वर्षापूर्वी कानपूरला राहणारे कृष्ण मुरारी यादव यांना माहित पडले तेव्हा, त्यांनी निर्णय घेतला की लोकांना अशी माहिती देतील. 

image


२७ वर्षाच्या कृष्ण मुरारी यादव यांनी समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ते सांगतात की, ते शिक्षण घेत होते तेव्हा शाळेकडून अनेकदा गरीब मुलांना शिक्षण आणि त्यांना जागरूक करण्याचे काम करत होते. मात्र शिक्षण संपल्यानंतर जवळपास दोन वर्षापर्यंत त्यांनी नोकरी केली, मात्र या कामात त्यांचे मन लागत नव्हते. कृष्ण मुरारी यादव यांच्या मते, “एक दिवशी मी पाहिले की, सरकारी कार्यालयाच्या बाहेर ५-६ लोक मिळून येणा-या लोकांना माहितीचा अधिकार (आरटीआय)ची माहिती देत होते. ते त्या लोकांना सांगत होते की, जर त्यांचे काम कुठल्याही कारणामुळे सरकारी विभागात होऊ शकत नाही, तर त्यांनी आरटीआय फाईल करावे. ज्यानंतर लोकांचे काम पैशांशिवाय होत होते. या गोष्टीमुळे मी खूप प्रभावित झालो.”

तेव्हा कृष्ण मुरारी यांना वाटले की, आरटीआय तर एक शस्त्र आहे, जर लोकांनी याचा वापर केला तर, देशाच्या अर्ध्या लोकसंख्येची समस्या दूर होईल, जो अनेक वर्षांपासून आपल्या समस्यांबाबत सरकारी विभागात फे-या मारत आहेत. तेव्हा त्यांनी आरटीआयबाबत गहन अध्ययन केले, जेणेकरून ते या कायद्याला चांगल्या प्रकारे ओळखू शकतील. ज्यानंतर ते वर्ष २०११मध्ये पूर्णप्रकारे या अभियानात सामील झाले. 

image


कानपूर शहरातच त्यांनी अनेक लोकांसाठी आरटीआय फाईल करुन त्यांची मदत केली. हळूहळू आपल्या कामाबाबत ते शहरात प्रसिद्ध झाले. जेव्हा त्यांच्या कामाची चर्चा वर्तमानपत्रात व्हायला लागली, तेव्हा त्यांच्या कुटुंबातील लोक नाराज झाले, कारण त्यांची इच्छा होती की कृष्ण मुरारी यादव यांनी समाजसेवा सोडून नोकरीवर लक्ष द्यावे. मात्र या गोष्टीचा मुरारी यांच्यावर काहीच प्रभाव पडला नाही आणि एक दिवशी तर कुटुंबापासून लांब चौबेपूर गावात येऊन रहायला लागले. कारण त्यांचे मत आहे की, “देशाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या गावात राहते आणि जेव्हा शहरातच लोकांना आरटीआयबाबत योग्य प्रकारे माहित नाही, तेव्हा गावात निरक्षरता आणि माहितीच्या कमतरतेमुळे लोकांना जास्त माहिती नसेल.”

image


कृष्ण मुरारी यांनी लोकांना आरटीआयची माहिती देण्यापूर्वी २०-२५ गावात सर्वेक्षण करून, ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला की त्यांच्या समस्या काय आहेत? त्यानंतर त्यांनी पदयात्रा काढून आणि पत्रक वाटून तेथील लोकांना जागरूक केले. त्यांनी गावातल्या लोकांना सांगितले की, जर त्यांचे कुठल्याही प्रकारचे सरकारी काम होत नसेल तर, त्यांनी त्यांच्याकडे यावे. ते त्यांचे काम करण्यात मदत करतील. 

त्यानंतर मुरारी यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या. अनेक लोकांनी त्यांना सांगितले की, अनेक प्रयत्न केल्यानंतर देखील त्यांचे रेशनकार्ड बनलेले नाही, काही लोकांनी त्यांना जमिनीची नुकसान भरपाई न मिळाल्याबाबत सांगितले. एका व्यक्तीने त्यांना सांगितले की, २००२ मध्ये अपघातात भावाचा मृत्यू झाला होता, त्याची नुकसान भरपाई देखील मिळाली नाही. ज्यानंतर त्यांनी या सर्व समस्यांना दूर करण्यासाठी जेव्हा आरटीआय फाईल केले, त्यामुळे लोकांचे थांबलेले सर्व काम पूर्ण होऊ लागले. आता कृष्ण मुरारी यांच्यासमोर एक मोठी समस्या होती, अशी जागा जेथे लोकांना भेटून त्यांच्या समस्या ऐकू शकतील आणि त्यांना आरटीआय कशी टाकायची याबाबत माहिती देता येऊ शकेल. या कामात त्यांची मदत केली, तातीयागंज गावातील चहाचे दुकान चालविणारे मुलचंद सांगतात की, “मी आणि माझे मित्र या दुकानावर चहा पीत होतो, सोबतच आम्ही आमच्या कामाबाबत येथेच बसून संवाद साधत होतो. अशातच मुलचंद देखील या कामात आवडीने लक्ष घालू लागले. ज्यानंतर त्यांनी मला सल्ला दिला की, त्यांच्या दुकानात आपले कार्यालय उघडू.” 

image


याप्रकारे कृष्ण मुरारी यांनी वर्ष २०१३ मध्ये ‘आरटीआय टी स्टॉल’ नावाने त्या जागी आपले कार्यालय उघडले. त्यानंतर लोक जवळच्या गावातूनच नव्हे तर, झासी, हमीरपुर, घाटमपूर, बांदा, रसुलाबाद येथून देखील येऊ लागले. ते सांगतात की, “आतापर्यंत जवळपास ५०० लोकांची आरटीआयमार्फत मदत केली आहे. त्या व्यतिरिक्त मी स्वत: २५० – ३००आरटीआय फाईल केल्या आहेत. सोबतच मी अनेक लोकांची आरटीआय फाईल करण्यात मदत केली आहे, हे लोक फोनमार्फत मला संपर्क करतात.” चौबेपूरच्या लोकांना ज्या समस्यांमधून जावे लागते, ते देशाच्या गावातल्या लोकांच्या समस्येचे एक उदाहरण आहे. जमिनींचे विवाद, सरकारी कर्जाच्या योजना, निवृत्तीवेतन, रस्ते निर्माण आणि स्थानिक शाळेसाठी पैसे, याप्रकारच्या समस्या अधिक आहेत.” 

image


आपल्या आर्थिक समस्येबाबत कृष्ण मुरारी यादव यांचे म्हणणे आहे की, ते काही पत्र- पत्रिका आणि पोर्टलमध्ये लेख लिहून थोडे फार पैसे कमवितात. असे असूनही त्यांच्याकडे आरटीआय फाईल करण्यासाठी पैसे नसतात तेव्हा ते मित्रांकडून उधार घेतात. आता त्यांची योजना एक असे मोबाईल व्हँन(फिरते वाहन) बनविण्याची आहे, जी लांबपर्यंतच्या भागात जाऊन लोकांना आरटीआयशी संबंधित सर्व माहिती देऊ शकतील.

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

सरकारद्वारे रस्त्यावर 3 डी झेब्रा क्रॉसिंग बनवून दुर्घटना टाळण्यासाठी मदत करणाऱ्या माय-लेकी

दहा हजार शेतकऱ्यांच्या मासिक उत्पन्नात ७० टक्क्यांनी वाढ करणारं ‘किसान सुविधा’ अॅप

समाजाचा विरोध पत्करुन, अविनाश नकट यांनी पत्नीच्या तेराव्यात पैसे खर्च न करता, गावातील शाळेसाठी दिले दीड लाख रुपये ! 

लेखक : गिता बिश्त

अनुवाद : किशोर आपटे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags