संपादने
Marathi

वार्का, वार्का : दुष्काळी इथियोपीयातला आशेचा किरण

इथियोपीयातल्या दुष्काळावर कल्पकतेनं मात करणारी कथा

23rd Aug 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

ईशान्य इथियोपीयाचा प्रदेश 2012 साली विकासापासून कोसो दूर होता. विपूल नैसर्गिक संपत्तीचं वरदान लाभलेल्या या उच्च पठारी प्रदेशात वसलेल्या येथील पर्यावरणाला औद्योगिकरणाचा स्पर्शही झालेला नव्हता. या प्रदेशात पाण्याची समस्या गंभीर होती. पाणी, वीज, शौचालयं यासारख्या मुलभूत गोष्टींचा या प्रदेशात अभाव होता. या भागाला एका शाश्वत विकासाची गरज होती. विकासापासून कोसो मैल दूर असलेल्या या भागाला आर्कीटेक्चर आणि व्हिजन (एव्ही) कंपनीचे सहसंस्थापक आंद्रेस व्होल्गर आणि अर्तुरो व्हिटोरी या जोडीनं 2012 मध्ये भेट दिली. यापैकी व्होल्गर स्वित्झर्लंडचे तर व्हिटोरी इटालीयन.

या जोडीनं इथियोपीयामध्ये 2012 साली वार्का वॉटर या प्रायोगिक प्रकल्पाला सुरुवात केली. या प्रयोगात निसर्गातलं पाणी एका लंबगोलाकार संग्राहकामध्ये साठवलं जाणार होतं. प्रकल्प सुरु झाल्यानंतर वर्षभरातच डिसेंबर 2013 मध्ये व्होल्गर यांनी कंपनीला रामराम केला. पण व्हिटोरींच्या नेत्तृत्वाखाली हे काम सुरुच राहीलं.

वार्का वॉटर या प्रकल्पाची सुरुवात मोठ्या विचारपूर्वक पद्धतीने करण्यात आली. हे यंत्र तांत्रिकदृष्ट्या स्वावलंबी असेल, नैसर्गिक सौंदर्यशास्त्राची जपणूक होईल आणि सभोवतालच्या वातावरणात टिकून राहील हे तीन तत्व कंपनीनं हा प्रकल्प सुरु होताना पाळली. इथियोपीयातले पारंपारिक गावं तसंच जमीनीचा आकार लक्षात घेऊन या वॉर्का वॉटरचं स्केच एखाद्या रक्षापात्रासारखं बनवण्यात आलं. पाण्याचा संग्रह योग्य पद्धतीनं व्हावा यासाठी कंपनीनं बायोमेटीक्स पद्धतीचा वापर केला.

नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर

वार्का वॉटरचे प्रतिकात्मक चित्र   (सौजन्य - आर्किटेक्टचर आणि व्हिजन )

वार्का वॉटरचे प्रतिकात्मक चित्र (सौजन्य - आर्किटेक्टचर आणि व्हिजन )


वार्का वॉटरच्या प्रत्येक गोष्टी इथियोपीयन घटकाशी मिळत्याजुळत्या ठेवण्यात आल्या आहेत. वार्का वॉटरचा वरचा भाग इथियोपीयाच्या पारंपारिक बास्केटशी जुळणारा आहे. तसंच सर्व स्थानिक साहित्याचा वापर करुनच वार्का वॉटर प्रकल्प बनवण्यात आलाय. ग्रामीण इथियोपीयन नागरिकांना आपलंसं वाटेल, त्यांना सांभाळता येईल आणि सहजगत्या त्याची निगा राखता येईल असं तंत्रज्ञान तयार करणं हेच एव्ही कंपनीचं ध्येय होते. यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक सर्व स्थानिक संस्कृतीशी जोडणा-या गोष्टींचा वापर हे उपकरण तयार करण्यासाठी केला आहे.

पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी बांबू, ताग आणि जैव प्लास्टिक या साहित्याचा वापर वार्का वॉटरची संरचना तयार करण्यासाठी कंपनीनं केला. वार्का वॉटरचं काम करताना उर्जेचा वापर पूर्णपणे टाळण्यात आला. पाऊस, धुकं तसंच दव यांच्या माध्यमातून पाणी गोळा करण्यात आलं.

निसर्गात आढळणा-या वेगवेगळ्या जैविक वनस्पतींचा प्रभावी वापर या प्रयोगात करण्यात आला. निवडूंग ही यामधली पहिली वनस्पती. कमी पावसाच्या शुष्क प्रदेशातही निवडूंग घट्टपणे तग धरुन उभा असतो. निवडुंगाला अनेक काटेरी कुसळ असतात. ही काटेरी कुसळ धुकं शोषून घेण्यासाठी उपयोगी ठरतात.

नामिबियन बीटल या दुस-या वनस्पतीचा वापरही यामध्ये करण्यात आला. अतिशय लहान आकाराची बीटलची पानं परिसरातलं पाणी सहजगत्या टिपून घेतात. त्यामुळे धुक्यातलं दव शोषून घेण्यासाठी या बीटलचा उपयोग उपकरणात प्रभावीपणे झाला आहे.

कमळाच्या स्वाभाविक गुणधर्माचाही या वार्का वॉटरमध्ये उपयोग करुन घेण्यात आलाय. चिखलामध्ये उगवणारं कमळ परिसरातलं घाण पाणी बाहेर फेकून स्वच्छ पाणी आपल्याकडे ओढून घेते. वार्का वॉटर तयार करताना कमळ वनस्पतीच्या या गुणधर्माचा वापर करण्यात आलाय.

निसर्गात सहजगत्या आढळणा-या अनेक वनस्पती, प्राणी, हवा, आणि पाणी या प्रकल्पाचे प्रभावी वाहक आहेत. वार्का वॉटर तयार करताना याच गोष्टींचा सखोल अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास करताना कोळी या किटकाचा वापर होऊ शकतो हे संशोधकाच्या लक्षात आलं. आपल्या सभोवती धागा विणण्याची कोळ्याची शक्ती वार्का वॉटरमध्ये पाणी गोळा करण्यासाठीही उपयोगी आहे हे संशोधकांना आढळलं. या कोळ्यांचाही वार्का वॉटर तयार करताना वापर करण्यात आलाय. वार्का वॉटरमधली हवा खेळती राहावी यासाठी व्हिटोरी आणि त्यांच्या टीमनं अगदी मुंग्याच्या वारुळांचाही अभ्यास केला होता. अशा पद्धतीनं उपलब्ध अशा सर्व नैसर्गिक साधनांचा वापर करुन वार्का वॉटरमध्ये पाणी साठवण्याची यंत्रणा विकसीत करण्यात आली आहे.

वार्का वॉटर 2 ( सौजन्य - व्हिटोरी प्रयोगशाळा, आर्किटेक्चर आणि व्हिजन )

वार्का वॉटर 2 ( सौजन्य - व्हिटोरी प्रयोगशाळा, आर्किटेक्चर आणि व्हिजन )


इथियोपीयातला पाण्याचं संकट

विकसीत देशातला नागरिक दररोज 300 लिटर पाणी वापरतो. इथियोपीयामध्ये हेच प्रमाण प्रती माणशी 15 लिटर इतकं कमी आहे. ग्रामीण भागातल्या इथियोपीयन नागरिकाला दररोज 100 लिटर पिण्यायोग्य पाणी मिळावं हे ध्येय वार्का वॉटरच्या निर्मात्यानं ठेवलं होतं. कोणत्याही मशिनशिवाय सहजगत्या वापरता येणा-या या उपकरणामध्ये ग्रामीण भागातली सामाजिक, आर्थिक परिस्थिती बदलण्याची शक्ती होती.

इथियोपीयातली 85.3 टक्के जनता ग्रामीण भागात राहते. स्वच्छतेच्या अभावामुळे या भागात रोगराई पसरण्याची शक्यता अगदी सहज आणि मोठी होती. इथियोपीयातल्या केवळ 44 टक्के नागरिकांना पाणी उपलब्ध होतं. ग्रामीण भागात तर हे प्रमाण 34 टक्के इतकं कमी होतं. ही आकडेवारी गोळा करताना स्वच्छ पाणी मिळणाऱ्या नागरिकांचा वेगळा विचार केलाच नव्हता.

नैसर्गिक साधनसंपत्तीचं वरदान लाभलेल्या इथियोपीयाच्या जमिनीत सोनं आढळतं. तसंच वेगवेगळी साधनसंपत्तीही मुबलक प्रमाणात आहे. पण तरीही हवामान बदल, ओसाड जमीन आणि पिकांना आगी लावून देण्याचे सतत घडणारे प्रकार यामुळे इथियोपीयाच्या साधनसंपत्तीवर नेहमीच ताण पडतो. येथील नागरिकांच्या मागसलेपणाचा फायदा घेऊन नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट झाली आहे.

रोज पाण्याच्या शोधात कित्येक मैल पायपीट करणा-या महिला तसंच मुलांच्या भल्यासाठी वार्का वॉटरचा प्रयोग हा वरदान ठरणार होता. यामुळे त्यांची पाण्याच्या शोधासाठी रोजची भ्रमंती तसंच त्यामुळे खर्च होणारी ऊर्जा वाचणार होती. महिलांना दुसरी कामं करण्यासाठी तसंच मुलांना खेळण्यासाठी हा वेळ वापरणं शक्य होणार आहे.

वार्का वॉटरमधील पाणी शोषण करणा-या यंत्राचे आतील छायाचित्र  (सौजन्य, व्हिटोरी प्रयोगशाळा, आर्किटेक्चर आणि व्हिजन)

वार्का वॉटरमधील पाणी शोषण करणा-या यंत्राचे आतील छायाचित्र (सौजन्य, व्हिटोरी प्रयोगशाळा, आर्किटेक्चर आणि व्हिजन)


आव्हान पेलताना...

सभोवतालच्या परिस्थितीमध्ये टिकाव धरु शकेल असं उपकरण तयार करणं हे एव्हीच्या टीमसमोरचं मोठं आव्हान होतं. विशेषत: जमिनीच्या उत्खननापासूनही हे उपकरण वाचवण्याची कसोटी होती. स्थानिक पातळीवर उपलब्ध होणा-या टिकाऊ साहित्याच्या आधारे सोपं तंत्रज्ञान उभारणं ही या आव्हानाची पुढची पायरी. यंत्रांचा कमी वापर इथियोपीयातल्या वेगवेगळ्या भागातल्या जमिनीवर हे यंत्र उभारण्यासाठी महत्वाचा ठरणार होता.

एव्ही कंपनीचा पहिला नमुना ( पहिलं यंत्र ) तयार व्हायला जवळपास चार महिने लागले. तर त्यांचं हे सध्याचं अद्ययावत यंत्र वार्का वॉटर 3.1 तयार होण्यास जवळपास तीन वर्षांचा कालावधी लागला आहे. ( हे अजूनही विकसित अवस्थेमध्येच आहे)

चार दिवसांमध्ये उभं राहणारं तंत्रज्ञान

वार्का वॉटरचे प्रतिकात्मक चित्र ( सौजन्य- आर्किटेक्चर आणि व्हिजन )

वार्का वॉटरचे प्रतिकात्मक चित्र ( सौजन्य- आर्किटेक्चर आणि व्हिजन )


60 किलो वजनाच्या वार्का वॉटर 3.1 ची उंची 10 मीटर आहे. हे यंत्र तयार करण्यास 4 दिवस लागतात. या यंत्राचे पाच वेगवेगळे विभाग असून ते पाच विभाग सहा व्यक्ती चार दिवसात उभे करु शकतात. या यंत्राची कोणत्याही शिडीचा वापर न करता सहजगत्या जोडणी करता येते. सध्या असे 9 वार्का वॉटर 3.1 तयार आहेत. तर दहावे वार्का वॉटर 2015 च्या पहिल्या तिमाहीत उभारणं अपेक्षित आहे. या यंत्राची किंमत कमीत कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या यंत्राचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला तर प्रती टॉवर 100 डॉलर इतकी या यंत्राची किंमत होऊ शकते, जी इथियोपीयातल्या सध्याच्या कोणत्याही पाणी साठवण्याच्या यंत्रापेक्षा कमीच आहे.

पाण्यापेक्षा बरचं काही

केवळ वार्का वॉटर यंत्र उभारणं पुरेसं नाही, हे एव्ही कंपनीनंही ओळखलंय. त्यामुळे कंपनीनं याच्या पुढचे कार्यक्रमही राबवण्यास सुरुवात केलीय. पाण्याचा योग्य वापर करणे, त्याचे योग्य वितरण, तसंच त्याचं संवर्धन करण्याचं प्रशिक्षण इथियोपीयातल्या नागरिकांना कंपनीकडून दिले जात आहे. इथियोपीयातल्या नागरिकांसाठी वार्का वॉटर स्नो बॉलच्या मदतीने शेअर इंटरनेट ही संकल्पना राबवण्याचाही कंपनीचा विचार आहे. त्यामुळे इथियोपीयातल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना हवामानाची ताजी स्थिती तसंच पिकांचे बाजारभाव याची सहजगत्या माहिती होऊ शकेल. इथियोपीयातल्या पिकांनाही त्याचा निश्चितच उपयोग होईल.

प्रत्येक वार्का वॉटर उभं करताना एक झाड लावलं पाहिजे अशी अट एव्ही कंपनीनं ठेवलीय. इथियोपीयातलं पर्यावरण टिकवण्याची कंपनीची धडपड यामधून दिसून येते.

वार्का वॉटर ही केवळ तांत्रिक परिवर्तनाची कथा नाही. तर एका दुर्गम आणि खडतर परिस्थितीमध्ये अडकलेले असताना चोखंदळपणे काम करता येतं आणि होय हे शक्य आहे हे सांगणारी ही एक प्रेरणादायी गोष्ट आहे.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags