संपादने
Marathi

धडे ‘ब्रॅन्डींगचे’ आणि तेदेखील अवघ्या दहा रुपयांत....

29th Feb 2016
Add to
Shares
8
Comments
Share This
Add to
Shares
8
Comments
Share

रोज दुपारी ठराविक वेळी ऐकू येणारा एक हॉर्न आम्हाला रमेश आल्याची खबर देतो आणि पुढच्या अवघ्या मिनिटभरातच पर्पलमॅँगोची सगळी टीम स्वच्छ धुतलेले, रंगीबेरंगी चुंबक कॉपी मग्ज घेऊन दरवाजाबाहेर येते... आपल्याकडच्या दोन प्लॅस्टीक बास्केटस् मधून रमेश चहा, दूध आणि गरम पाण्याचे मोठे थर्मोस बाहेर काढतो आणि मस्त गरमागरम चहा-कॉफी तयार होते....

image


रमेशने तयार केलेले प्रत्येक पेय हे खरोखरच लक्षणीय असते आणि त्यासाठी कारणीभूत ठरते ती अगदी खास अशी रमेश-स्टाईल.....

- आमच्यापैकी ज्यांनाज्यांना त्याचा चहा थोडासा जास्त कडक वाटतो, त्यांच्यासाठी योग्य त्या प्रमाणात दूध घालून तो चहाचा कडकपणा कमी करतो.

- त्याच्याकडे मिळणाऱ्या लेमन टीमध्ये वापरण्यात आलेली पुदिन्याची पाने ही नेहमीच अगदी ताजी असतात.

- त्याचबरोबर असेही बरेच जण आहेत, ज्यांना रमेशकडे थोडीशी गोड पण अगदी मिट्ट गोडही नाही, अशी त्यांच्या चवीनुसार तयार केलेली कॉफी मिळते.

एखाद्या अनुभवी बार-टेंडरच्या ऐटीत तो आपला थर्मोस अगदी योग्य उंचीवर नेतो, जेणेकरुन प्रत्येक कपावर मस्त असा फेस तयार होतो आणि असा हा मस्त कप तुम्हाला मिळतो अवघ्या दहा रुपयांत... रमेश हा अगदी साधा व्यवसाय चालवितो, पण आपल्या कामातून तो ग्राहकाला सर्वोच्च समाधान मिळवून देतो. अशा या रमेशकडून आम्हालाही बरेच काही शिकायला मिळाले आहे. आम्ही त्याच्याकडून शिकलेले काही धडे म्हणजे -

तुमच्या ग्राहकाला समजून घ्याः प्रत्येकाची विशिष्ट आवड किंवा प्राधान्य रमेश लक्षात ठेवतो. प्रत्येक माणसाला नक्की किती प्रमाणात गोड आवडते ते त्याला पक्के ठाऊक असते आणि प्रत्येकाला जे हवे तेच मिळेल, यासाठी तो विशेष प्रयत्नही करतो.

नातेसंबंधांची जपणूक : कार्यालयात काम करणाऱ्यांबरोबर रमेश अतिशय सलोख्याचे नातेसंबंध ठेवतो आणि गैरहजर सदस्यांची न विसरता चौकशी करतो. त्याचवेळी आसपासच्या इमारतींच्या सुरक्षा रक्षकांबरोबरचे त्याचे नातेही खेळीमेळीचे असते. प्रत्येक नाते हे वेगळे असते आणि ते वेगवेगळ्याप्रकारे हाताळावे लागते हे त्याला चांगलेच समजते.

वेळेचे महत्व : रमेशच्या जगात वेळेचे महत्व अनन्यसाधारण आहे आणि त्यामुळे कुठलाही थांबा हा दहा मिनिटांपेक्षा जास्त काळ नसतो. त्याच्या थर्मोसवरील रंगही सांकेतिक असतात, जेणेकरुन प्रत्येक थर्मोस न उघडतादेखील, त्याच्या आतमध्ये काय आहे ते त्याला चटकन समजते. कामाच्या या अतिशय कार्यक्षम पद्धतीमुळेच तो त्याच्या प्रत्येक थांब्यावरुन २०० रुपयांपर्यंत घसघशीत रक्कम मिळविण्यात यशस्वी ठरतो.

खात्रीलायकता : एक दिवस अगदी जोरात आणि संततधार पाऊस पडत होता. तो दिवसभर आम्हाला एक कप कॉफीची तल्लफ होती. पण एवढ्या प्रचंड पावसात रमेश येऊच शकणार नाही, याचीही आम्हाला खात्री वाटत होती. पण अगदी रोजच्याच वेळेला हजर होत, त्याने मात्र आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्काच दिला.

ब्रॅंडसाठी निष्ठावान ग्राहकांची फळी उभारणे : प्रत्येक दिवशी अगदी आमच्या दारापर्यंत येऊन, आम्हाला सर्वोच्च समाधान मिळवून देण्याच्या त्याच्या क्षमतेमुळेच, आसपासच्या परीसरातील त्याच्या स्पर्धक विक्रेत्यांपेक्षा आम्ही नेहमीच रमेशला प्राधान्य देतो. खरे तर, कितीतरी वेळा तर चहा-कॉफी पिण्याचे काही ठरविले नसतानाही, शेवटी आम्ही त्याच्याकडील चहा-कॉफी पितोच...

जरी तो जे काही करत आहे ते खूपच सोपे आणि फायदेशीर वाटत असले, तरी विचारांती हेदेखील जाणवते की, गरमागरम पेयांचा आपला हा ब्रॅंड रमेशने काही एका रात्रीत उभा केलेला नाही, तर तो दररोज त्यामध्ये काहीतरी नवीन जोडत राहिला आहे. तो आम्हाला देत असलेल्या प्रेरणेबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत आणि हे काही केवळ त्याच्या चहाच्या कपांमुळेच नाही...

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा :

चाय पे चर्चा.... एक ‘वेगळा’ अनुभव....

एक चहा बनविणारा बनला चार्टर्ड अकौंटंट, महाराष्ट्र सरकारच्या 'कमवा आणि शिका' योजनेचा ब्रांड एम्बेसडर !

चहाचा अड्डा बनला १०० कोटींचा उद्योग

लेखक – रेश्मा थॉमस

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन 

Add to
Shares
8
Comments
Share This
Add to
Shares
8
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags