संपादने
Marathi

आता ऑफलाईन ‘ओला कॅब’ बुकिंग करणे शक्य

Team YS Marathi
6th Oct 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

स्मार्टफोन द्वारे कॅब बुकिंग सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ओला ने काही शहरात ‘ओला ऑफलाईन’ सेवा देण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने ही सुविधा त्या खास ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे जे इंटरनेट सुविधेचा वापर करू शकत नाही किवा स्मार्टफोन वापरणे त्यांना शक्य नसते. म्हणजेच आता विना इंटरनेट ओला कॅब बुक करणे शक्य झाले आहे.

विना इंटरनेट ओला कॅब बुक करण्यासाठी एसएमएसच्या माध्यमातून आपण आहोत त्या ठिकाणाची माहिती द्यावी लागते. त्यानंतर तुम्हाला कॅब चालकाची माहिती एसएमएस द्वारे दिली जाते. त्यानंतर चालकाशी चर्चा करून प्रवास करणे शक्य होते. कंपनीचे म्हणणे आहे की, या सेवेची सुरुवात प्रथम चार महानगरांपासून करण्यात आली आहे. लवकरच १०२ शहरामध्ये ही सुविधा उपलब्ध केली जाईल.

image


महिंद्रा आणि महिंद्रा लिमिटेड ने देशातील सर्वात मोठे शेयर्ड ट्रांसपोर्टेशन प्लॅटफॉर्म ओला यांच्याबरोबर महत्वपूर्ण करार केला आहे. या करारानुसार वर्ष २०१८ पर्यंत भारतात ४०,००० चालक पार्टनर्सला सक्षम बनवले जाईल.

या महत्वपूर्ण कराराच्या माध्यमातून कंपनीने २६०० कोटीपेक्षा अधिक वाहनांची विक्री करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. ओलाचे चालक पार्टनर्स आता आकर्षक 'महिंद्रा-ओला' पॅकेजचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये महिंद्राच्या विशेष किमतीच्या कार झिरो डाउन पेमेंट सह आकर्षक फायनान्सिंग आणि सर्वश्रेष्ठ एनबीएफसी व्याजदर, सब्सिडाइज्ड बीमा प्रीमियम यासारख्या सवलती सामील करण्यात आल्या आहे.

महिंद्रा ग्रुपचे के चेअरमन आनंद महिंद्रा यांनी सांगितले की, “ या महत्त्वपूर्ण करारामुळे भारतीय ग्राहकांच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होईल. खासकरून तरुण वर्गाच्या, जे शेयर्ड मोबिलिटीला प्राधान्य देतात. यामुळे ४०,००० वाहनचालकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडेल.”

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags