टाइमपास म्हणून सुरु केलेल्या व्यवसायाची करोडोंची उलाढाल
नीना आणि तिच्या ब्रँड 'बॅगीट' ची यशोगाथा
सुमारे ३१ वर्षांपूर्वी महाविद्यालयात शिकणाऱ्या एका मुलीने केवळ टाइमपास म्हणून बॅग बनवून विकणे सुरु केले आणि सद्य घडीला ती मुलगी आणि तिचा ब्रँड एक 'स्टाइल स्टेटमेंट' बनले आहेत. ती मुलगी आहे 'नीना लेखी' आणि आज प्रसिद्ध असलेला त्यांचा ब्रँड आहे 'बॅगीट'.
मुंबई च्या एका संपन्न कुटुंबात जन्मलेली नीना लहानपणा पासूनच बिनधास्त प्रवृतीची तरीही अभ्यासात नेहमी प्रथम असणारी मुलगी होती. ती कमर्शियल आर्ट मध्ये काम करू इच्छित होती आणि म्हणूनच मुंबईच्या प्रसिद्ध सोफिया पाॅलीटेक्निक महाविद्यालयात दोन अभ्यासक्रमांसाठी तिने प्रवेश घेतला. दोन्ही अभ्यासक्रमांमधून मिळणाऱ्या मोकळ्या वेळेचा उपयोग करण्यासाठी त्यांनी 'श्याम अहुजा' यांच्या डिजाइनर शोरूम मध्ये नोकरी करणे सुरु केले आणि याच काळात त्यांनी बॅग्स बनवून विकण्याचा निर्णय घेतला.
त्या काळच्या स्मृतींना उजाळा देताना नीना सांगतात "मी तर 'शिका आणि कमवा' या मंत्रा सोबत नोकरी सुरु केली होती. याच दरम्यान मी विचार केला की आमच्या टीशर्ट वर ज्या प्रमाणे लिहिलेले असते त्याच प्रमाणे लिहिलेल्या अॅटीट्युड वाल्या बॅग्स बनवाव्यात. मी माइकल जॅक्सन ची खूप मोठी फॅन होते आणि त्याच्या बीट इट पासून प्रेरणा घेऊन मी नाव ठरवले 'बॅगीट' आणि या प्रकारे माझ्या व्यावसायिक आयुष्याची सुरवात झाली."
नीनाने एक लिफ्टमेन आणि जीप दुरुस्त करणारा मेकॅनिक यांच्या मदतीने साध्या कॅनवासच्या बॅग बनवणे चालू केले आणि आपल्या दुकानाच्या मालका कडून त्यांना विकण्याची परवानगी घेतली. याच दरम्यान त्यांची भेट त्यांच्या मैत्रीणचा भाऊ मनोज सोबत झाली जे कपड्यांचे प्रदर्शन आणि सेल लावत असत. त्यांना नीना ने बनवलेल्या बॅग्स खूप आवडल्या आणि आपल्या सामना सोबत ते बॅग्स ही ठेऊन विकू लागले. नीना सांगतात की तेव्हा एक बॅग बनवायला जवळपास २५ रुपये खर्च येत होता आणि त्या त्याला ६० रुपयांना विकत असत.
आता नीना ने बनवलेल्या बॅग्स लोकांना आवडू लागल्या होत्या आणि महिना दर महिना त्याची मागणी वाढतच चालली होती. याच सुमारास त्यांना टेक्सटाइल डिजाइनिंग करिता पुरस्कारही प्राप्त झाला. त्यामुळे त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला. त्या दिवसां बद्दल बोलताना नीना सांगतात " मला काम करताना मजा वाटत होती आणि कामही चांगले चालले होते. तरुणांना आणि फॅशन प्रेमीना माझ्या बॅग्स आवडत होत्या. तीन वर्षातच मी बनवलेल्या बॅग्स ची विक्री १० पटींनी वाढली होती आणि मी दर महिना ३०० पेक्षा जास्त बॅग्स विकत होते."
आता नीनाने आपल्या कामासोबत नवनवे प्रयोग करायला पण सुरवात केली त्यांनी चामड्याच्या बॅग्स बनवण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्गधी मुळे त्यांनी मेलेल्या प्राण्याची कातडी न वापरण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी सिंथेटिक लेदर सोबत प्रयोग करणे युरू केले आणि लवकरच त्यांना या मध्ये खऱ्या चामड्याचा लुक आणण्यात यश मिळाले. निनांचे म्हणणे आहे कि सिंथेटिक लेदरचा फायदा असा की यापासून तयार सामानाला कमी किमतीत सामान्य ग्राहकांना उपलब्ध करून देता येते.
१९८९ पर्यंत 'बॅगीट' पूर्णपणे एका उद्योगात परिवर्तीत झाला होता आणि याच दरम्यान मनोज आणि नीनाने दोन्ही परिवारांच्या सहमतीने लग्न केले. लग्नानंतर नीनाने आपल्या व्यवसायावर अधिक लक्ष देणे सुरु केले आणि लवकरच कॅम्प कॉर्नर येथे एक दुकान खरेदी करून आपले पहिले रिटेल आउटलेट 'आईएनएक्सएस’ सुरु केले जे लवकरच फॅशन प्रेमींमध्ये प्रसिद्ध झाले. या विषयी नीना सांगतात " या दुकानात आम्ही स्वतः बनवलेल्या सामानाची सगळी रेंज ठेवली. आमच्या बॅग्स स्वस्त आणि क्वालिटी मध्ये चांगल्या असण्या सोबतच युजर फ्रेंडली पण होत्या. आणि पुढे पुढे तर आमच्या बॅग्स शाॅपर स्टाॅप आणि पैंटालून च्या सोबत लाइफ स्टाइल मध्ये ही विक्री करता ठेवण्यात येऊ लागल्या. ज्याने आम्हाला बरीच प्रसिद्धी मिळाली. २००६-०७ मध्ये आमचा वार्षिक ताळेबंद सुमारे ७ करोड रुपयांचा होता."
यासोबतच नीना यांनी जाणले की देशात मोबाईल बाजार तेजीत सुरु आहे आणि मोबाईल धारकांची संख्या पण वाढत आहे. तेव्हा त्यांच्या मनात मोबाईल ठेवण्यासाठी डीजायनर पाऊच बनवण्याचा विचार आला. यासोबतच बेल्ट, वाॅलेट सारख्या अन्य एक्सेसरीज पण बनवण्यास सुरवात केली. ज्याची विक्री त्यांच्या आर्थिक उलाढालीत एक मोठा वाट उचलते.
काळानुरूप नीनाने 'बॅगीट' च्या व्यवसायाला अजून पुढे वाढवले आणि आज देशभरातील प्रत्येक मोठ्या शहरात त्यांच्या शाखा आहेत. या व्यतिरिक्त आज 'बॅगीट' कडे सुमारे २०० कर्मचारी आणि ५५० कारागिरांची फौज पण आहे. सध्या 'बॅगीट' दरवर्षी ५ लाखांपेक्षा जास्त वस्तू तयार करतो आणि त्यांची वार्षिक उलाढाल ४० करोड पेक्षा अधिक आहे.
नीना सांगते की तिने कॉलेजच्या दिवसांत केवळ एक आवड म्हणून बॅग्स बनवून विकणे सुरु केले होते आणि आजही त्या आपल्या कामाला पूर्णपणे एन्जॉय करतात. त्या हसत सांगतात " बॅग्स बनवण्यात फारसा नफा नसला तरी हे काम केल्याने मला आनंद मिळतो."