संपादने
Marathi

तानाबाना : कारागिर आणि विणकरांचा आधार

Chandrakant Yadav
9th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

‘फॅब इंडिया’च्या विकासाची आणि यशाची गोष्ट मोठी रंजक आहे. तितकीच ती प्रेरकही आहे. देशभरातील हातमाग कारागिरांना ग्राहकांपर्यंत थेट पोहोचवण्याची संधी ‘फॅब इंडिया’नेच उपलब्ध करून दिलेली आहे. आणि ‘फॅब इंडिया’ला हा माल उपलब्ध करून देण्याचे काम करते ‘तानाबाना...’ ‘तानाबाना’चे संस्थापक विकास पाठक म्हणतात, ‘‘थेट किरकोळ बाजारापर्यंत धडक मारू शकेल, अशा काळाबरहुकूम चालणाऱ्या एका व्यासपीठाची उभारणी आम्ही करतो आहोत. वीणकर आणि कारागिरांना नियमितपणे काम मिळवून द्यायचे असेल तर आमच्यासारखे व्यासपीठ गरजेचेच आहे. मोठ्या संस्थांवर पूर्णपणे अवलंबून राहण्याने फारसे काही साधणार नाही.’’

२००९ मध्ये बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात ‘तानाबाना’ची स्थापना झाली. कारागिर, वीणकर, प्रवर्तक आणि गुंतवणूकदार अशा सगळ्यांच्या सामूहिक मालकीचे हे स्वावलंबी संस्थान. कलेला योग्य मोल मिळवून देणे आणि कारागिरांना अतिरिक्त काम मिळवून देणे यावर ‘तानाबाना’चा भर असतो. किरकोळ स्वरूपात खरेदी करणाऱ्या ग्राहकांपर्यंत म्हणजेच थेट अंतिम ग्राहकांपर्यंत हस्तशिल्प, वस्त्रप्रावरण अशा वस्तू थेट विक्रीसाठी पोहोचवणारे ऑनलाइन व्यासपीठ म्हणून आपल्याला ख्याती प्राप्त करायची आहे, हा उद्देश घेऊनच ‘तानाबाना’ बाजारात उतरले होते.

image


रेशीम आणि हाताने विणलेली विविध उत्पादने उदाहरणार्थ रेशमी साडी, दुपट्टे, कुर्ते तसेच भागलपूर सिल्कची वस्त्रप्रावरणे ‘तानाबाना’च्या माध्यमातून तयार केली जातात आणि फॅबइंडियासह देशभरातील लहानमोठ्या विक्रेत्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जातात. शिवाय अहमदाबादेत आपली. काही उत्पादने ‘सेवा’च्या माध्यमातून विकायला सुरवात केलेली आहे. काही स्टोअर्समधून थेट स्वत:च्या ‘तानाबाना’ या ब्रँडनेमनेही उत्पादने विक्रीला सुरवात केलेली आहे.

किरकोळ विक्री केंद्रांतून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि फेसबुक तसेच वेबसाइट सारख्या माध्यमातून वाढत असलेली मागणी या गोष्टींनी ‘तानाबाना’ला मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन किरकोळ विक्रीची शक्यता तपासण्यासाठी प्रेरणा दिली.

बिहार आणि झारखंडमध्ये ‘तानाबाना’ ही एकमेव संस्था अशी आहे, जी आपल्या ग्राहकांना ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ची सुविधा उपलब्ध करून देते. बहुतांश विक्रीही तशी फेसबुकच्या माध्यमातूनच होते. ग्राहक ईमेलच्या माध्यमातून आपल्या आवडीच्या वस्तूचे कोड पाठवून देतो. मग ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ तत्वावर ‘तानाबाना’ ग्राहकाच्या पत्त्यावर त्याला अपेक्षित वस्तू पाठवून देते.

image


कारागिरांना प्रशिक्षण, कारागिरांचा कौशल्य विकास, क्रेडिट आणि कंपनीत लाभार्थ्याच्या रूपात कारागिरांना सामावून घेणे, कारागिरांचा एक स्वावलंबी समूह निर्माण करणे अशा विविध पातळ्यावर ‘तानाबाना’ कारागिरांच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे. कारागिरांचा सर्वांगिण विकास हे तर ‘तानाबाना’चे ध्येयच आहे. आपली शिवण शाखांचे संचलन करणारी सामान्य सुविधा केंद्रेही कारागिरांच्या सुपूर्द करण्याच्या विचारात ‘तानाबाना’ आहे. अर्थात यानंतरही कारागिरांसाठी विविध कल्याणकारी उपक्रम कंपनीकडून सुरूच राहतील. कारागिरांसह महिलांसाठीही ‘तानाबाना’ काही करण्याच्या विचारात आहे. महिलांनी सदस्य व्हावे म्हणून प्रोत्साहन देण्यात येईल. मोबदला, मूल्य ठरवणे आदी विषयांवर घेण्यात येणाऱ्या सामूहिक निर्णयांतून महिलांचा वाटाही असावाच, त्यासह महिलांचे कुठल्याही प्रकारे शोषण होऊ नये म्हणून ही बाब उपयुक्त सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही.

विकास यांनी ‘तानाबाना’ची स्थापना करून झालेली आहे, पण या उपक्रमाचा भार एकाच व्यक्तीच्या खांद्यावर नको आहे. कंपनी म्हणजे संपूर्णपणे सामूहिक जबाबदारी असे वातावरण अक्षरश: तयार करण्यासाठी नवे सीईओ म्हणून सुजितकुमार झा या उपक्रमात सहभागी झालेले आहेत. विकास सांगतात, ‘‘वेळ जसजशी पुढे सरकत जाईल, तसतसे माझ्यावर या सगळ्यांचे अवलंबून असणे कमी होत जाईल, असे सगळे आमचे चाललेले आहे. तुम्ही ज्या उपक्रमाचा पाया रचला. काडी-काडी एकत्र करून ज्याला तुम्ही मूर्त रूप दिले, तो उपक्रम आता तुमच्यावर अवलंबून नाही, तर स्वत:च स्वत:च्या पायावर उभा आहे, याहून उत्तम चित्र काय असू शकते?’’

‘तानाबाना’ आपली उत्पादने विकण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारांत मार्केटिंगची धोरणे आखत असते. ठोक स्वरूपातील ऑर्डरींसाठी ते फॅबइंडियासारख्या अन्य उत्पादकांवर अवलंबून असतात, तर ऑनलाइन प्रदर्शन आणि सेलव्यतिरिक्त ऑफलाइन किरकोळ विक्रेत्यांसह भागीदारीही करतात. विकास सांगतात, ‘‘ऑनलाइन मार्केटिंग तर सुरू आहेच. त्यासह आगामी काळात थेट उत्पादकांकडून विविध हस्तनिर्मित कलावस्तू विक्रीसाठी गोळा करू शकेल, असे एक व्यासपीठ तयार करण्यावर आमचा मुख्य भर असेल.’’

image


‘इट्‌सहँडमेड’, ‘अपूर्व’, ‘क्राफ्टइन’ (उत्तर पूर्वेतील हस्तकला) आणि अनेक अन्य आव्हाने असलेल्या काळात ‘तानाबाना’ देशभरातील हस्तकला उत्पादकांसाठी एक बाजार उपलब्ध करून देण्याच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. भारतीय हस्तकलेचे प्रातिनिधित्व करणाऱ्या ब्रँडच्या रूपात स्वत:ला प्रस्थापित करण्याचाध ‘तानाबाना’चा मानस आहे. विकास सांगतात, ‘‘घाऊक उत्पादनाच्या दिशेने आमचे लक्ष केवळ रेशीम उत्पादनावरच केंद्रित असेल. वीणकाम तर नेहमीच आमच्या कामाचा केंद्रबिंदू असेल.’’

ईकॉमर्सच्या क्षेत्रात आलेल्या तेजीने उत्पादकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात निश्चितच यश मिळवलेले आहे. आणि विशेषत: ऑफ सिजनच्या काळात ऑनलाइन विक्रीकडे महसुल वृद्धीसाठीचा एक सशक्त पर्याय म्हणून उत्पादक मंडळी पाहू लागलेली आहे. उत्पादनाशी निगडित प्रत्येक घटकाला ईकॉमर्सचे क्षेत्र उपयुक्त ठरते आहे. विशेष म्हणजे वर्षभर उपयुक्त ठरते आहे. पण अर्थातच ठोक विक्रीच्या मुख्य व्यवसायाला पूरक म्हणून तिची उपयुक्तता आहे. पण घाऊक विक्री या मुख्य व्यवसायाला तिचा जो काही हातभार लागतो आहे, त्याने व्यावसायिकाचा आणि एकूणच व्यवसायाचा बराच भार कमी होतो आहे, हे विसरून चालणार नाही.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags