संपादने
Marathi

गावातील आणि छोट्या शहरांमधील व्यापाऱ्यांना यशाचा नवा मार्ग दाखविणारा ‘ध्वनि’

3rd Dec 2015
Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share

स्वप्निल अग्रवाल आणि सुनंदन मदन यांनी ‘इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद’ (आयआरएमए)मध्ये सामान्यपणे चालविल्या जाणाऱ्या छोट्या संस्थांच्या विविध संचालन प्रक्रियांना डिजिटाइज करण्याचे काम सुरु केले. आपल्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या दिवसात ते आगा खान ग्रामीण सहायता (एकेआरएसपी) कार्यक्रमाच्या संपर्कात आले आणि इथे ही जोडी दक्षिण गुजरातच्या १५० गावांमध्ये चालविल्या जाणाऱ्या प्रकल्पाचा एक भाग बनण्यात यशस्वी झाली. स्वप्निल सांगतो, “फिल्डवर काम करणाऱ्या अनेकांना डाटा संदर्भातील खूप काम दिले होते. ज्यामुळे त्यांना त्या लोकांशी आणि त्या समाजाशी बोलण्यासाठी, त्यांच्याशी जोडले जाण्यासाठी वेळच मिळत नव्हता ज्यांच्यासाठी ते काम करत होते.” अशावेळी एकेआरएसपीच्या गरजा लक्षात घेऊन या प्रकल्पाशी संबंधित जटील डाटा प्रकियेला सोपे करण्यासाठी सॉफ्टवेअरच्या रुपात उपाय शोधून त्यांनी एक आयसीटी विकसित केली.

image


सामाजिक उद्योजकता आणि विना-नफा चालविल्या जाणाऱ्या संस्थांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर खूप कमी होत असल्याचे जेव्हा स्वप्निलच्या लक्षात आले तेव्हा त्याला ग्रामीण व्यवस्थापनामध्ये आवड निर्माण झाली. “अनेकदा तर त्यांना त्यांच्या कामासाठी लायक प्रतिभावंतच मिळत नाहीत किंवा अनेक बाबतीत तर ते खूप मर्यादित साधनसंपत्ती उपलब्ध असलेल्या ठिकाणी काम करत असतात, मात्र त्यांचे कार्यक्षेत्र खूप विस्तृत असते. शहरांमध्ये गुगल ड्राईव्ह किंवा ड्रॉपबॉक्स यांचा वापर करणाऱ्या संस्थांशी तुलना केल्यास हे लोक आपले जास्त ते काम किंवा जवळपास सर्वच काम कागदांवर पूर्ण करतात.” जेव्हा की याशिवाय अनेक अशी तंत्र आहेत ज्यांचा आविष्कार अशा विना-नफा तत्वावर चालणाऱ्या उद्योगांसाठी करण्यात आला आहे. “आतापर्यंत हे छोटे उद्योग आणि उद्योजक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यशस्वी झालेले नाहीत. आम्ही या दरीला आमच्यासाठी वापरु इच्छित होतो. आमचे लक्ष्य मुख्यतः कागद, डाटा एण्ट्री, डाटा क्लिनिंग इत्यादीसाठी होणाऱ्या खर्चावर नियंत्रण मिळवित स्थानिक आणि सोप्या सॉफ्टवेअरच्या आधारे डाटा एकत्र करणे होते.”

स्वप्निल सांगतो, “आणि हेच सर्व तर आम्ही करतो.” तथापि या छोट्या मोठ्या प्रकल्पांमधून स्वप्निल आणि सुनंदनला एवढा पैसा मिळत नव्हता की ते दोघे यामध्ये तग धरण्यात यशस्वी होऊ शकतील. “त्यावेळी आम्ही हे काम सुरु ठेवण्यासाठी नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि नोकरी करु लागलो.” सुनंदनने एका स्वयंसेवी संस्थेबरोबर काम करायला सुरुवात केली आणि स्वप्निलला दुबईमध्ये एक चांगली नोकरी मिळाली. “जवळपास तीन-चार महिने उलटून गेले तरी आम्ही आमच्या कामाविषयी समाधानी नव्हतो.” त्यानंतर या दोन्ही मित्रांनी ‘ध्वनी रुरल इन्फोर्मेशन सिस्टीम’ला अधिकृतपणे मात्र पर्यायी स्वरुपात सुरु करण्याचे ठरविले. त्यांना वाटत होते की स्वतःच्या समर्थनार्थ अजून त्यांना एका स्थायी स्वरुपातील नोकरीची आवश्यकता आहे. “मात्र हा विचार कुचकामी ठरला. सर्वांनीच आम्हाला सल्ला दिला की आम्ही इतर सर्व गोष्टी विसरुन पूर्ण वेळ ‘ध्वनि’च्या विकासावर खर्च करायला पाहिजे.” येणारे काही महिने दुबईवरुन परतलेला स्वप्निल आणि सुनंदन यांनी विशेष करुन एनजीओ, एनपीओ, सामाजिक परिणाम साधणारे व्यवसाय आणि गुंतवणूकदारांबरोबर मुलाखती करणे आणि त्यांना भारतातील सामाजिक क्षेत्राविषयी समजावण्याच्या कामात घालवले. “आम्ही त्या लोकांपर्यंत हा संदेश पोहचवू इच्छित होतो की आम्ही जे करतो आहे ते अर्थपूर्ण आहे आणि ती आजच्या काळाची गरज आहे.”

image


या कामामध्ये एक वर्ष मेहनत केल्यानंतर ‘ध्वनि’च्या वाट्याला १० ग्राहक आले. स्वप्निल सांगतो, “लेखापद्धति प्रणाली आणि डाटाबेसशी संबंधित काम तर इथे पहिल्यापासूनच होत होते. आम्हाला या क्षेत्रात आधीपासूनच कार्यरत असलेल्या लोकांना बरोबर घेऊन त्यांना या संस्थांसाठी असे ऍप्लीकेशन्स तयार करण्यासाठी प्रेरित करायचे होते जे त्यांच्यासाठी फायद्याचे असतील. आम्ही त्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी खूप वेळ खर्ची घातला. मग ते ओडिके असो वा क्लाऊड टेलीफोनी.” हे काम करताना आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी ते दीर्घकालीन अभियंत्यांची मदतही घेतात. या सर्वांव्यतिरिक्त स्वप्निलला आपल्या कार्यक्षेत्रातील वातावरणाविषयी कुठलाही भ्रम नाही. ‘ध्वनि’ सामाजिक परिणाम साधणाऱ्या संस्थांच्या पैशांची बचत करण्याच्या उद्देशाने कार्य करते. ते सांगतात, “अनेक आयटी कंपन्या याविषयी विचारही करत नाहीत. प्रत्येक जण मोठ्या कामाच्या शोधात आहे. मला माहिती आहे आम्ही जे काही करत आहोत ते मोठे काम नाही. हा एक सेवा उन्मुख दृष्टीकोन आहे.” तरीही त्यांच्यासाठी आशेचा किरण शिल्लक आहे, कारण ‘ध्वनि’ने सामाजिक क्षेत्रातील सामान्य समस्या ओळखण्यात आणि त्यांना प्रकाशझोतात आणण्यास मदत केली आहे. ते म्हणतात, “आम्ही एक असे व्यासपीठ बनविण्याच्या प्रयत्नात आहोत ज्याच्या मदतीने आम्ही डाटा कलेक्शन, डाटा विश्लेषण, बौद्धिक कामे आणि आयवीआर तंत्रासारखे सामान्य प्रश्न सोडवू शकतो.” या प्रकारच्या कामामध्ये समोर येणारी आणखी एक समस्या आधारभूत सर्वेक्षणाच्या आयोजनाबाबत असते. ही अनेक संस्थांची गरज असूनही हे काम करण्यासाठी कागदालाच प्राधान्य दिले जाते. ही परिस्थिती ‘ध्वनि’ला बदलायची आहे.

स्वप्निल सांगतो की सध्या भारतातील सामाजिक क्षेत्रात प्रमाणीकरण न च्या बरोबरीने असणे ही सर्वात मोठी समस्या आहे. जास्तीत जास्त वेळ कार्य प्रदात्यांना रिपोर्ट देण्यासाठी डाटा संदर्भातील कामातच निघून जातो. ना पैसे देणाऱ्यांना, ना स्वयंसेवी संस्थांना प्रत्यक्षात गरजवंतांबरोबर चर्चा करणे शक्य होते. तो सांगतो,“आमचा उद्देश्य आमच्या बरोबर काम करणाऱ्या लोकांना डाटा रिपोर्टिंगच्या कामापासून मुक्त करणे आहे. जेणेकरुन ते प्रत्यक्ष कार्यक्षेत्रामध्ये अधिक उपयोगी कामे करण्यात त्यांची ऊर्जा खर्च करु शकतील.” याशिवाय ‘ध्वनि’द्वारा देण्यात आलेला तांत्रिक उपायही याची खात्री करण्याचा प्रयत्न करत असतो की अंतिम उपयोगकर्तासुद्धा त्याचा सहज वापर करु शकेल. “आमची सिस्टीम अशी असायला पाहिजे की स्थानिक भाषा जाणणाऱ्यालाही ती सहज समजू शकेल. अशा प्रकारे माध्यमिक शिक्षण घेतलेली कोणतीही व्यक्ती आमचे सॉफ्टवेअर सहजरित्या वापरु शकते.”

डाटाचे हे डिजिटायजेशन आणि ऑटोमेशन पारदर्शीपणा आणि जबाबदारीच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. स्वप्निल सांगतो, “आपण माहिती व संपर्क तंत्रज्ञानासाठी साधनसंपत्ती उपलब्ध करुन देण्याबाबत अनुदात्यांना संयुक्त प्रस्ताव लिहिणे आणि पाठविणे इथपर्यंतच मर्यादित असतो. मात्र हे असे एक क्षेत्र आहे ज्यामध्ये आपण नेहमीच संघर्ष करतो.” स्वप्निल सांगतो की मोठे अनुदाता कोणत्याही एनजीओकडून खूप जास्त अपेक्षा ठेवतात. मात्र छोट्यांना विश्वास असतो की त्यांच्या सर्व कामांचा लेखा-जोखा एक्सेल शीटवरच तयार केला जाऊ शकतो. तर दुसरीकडे जेव्हा केव्हा यामध्ये सरकार सहभागी होते तेव्हा सर्वच गडबडते. “सर्वात पहिली येते ती नोकरशाही. त्यानंतर येतो व्यवस्थापनाचा मुद्दा. जेव्हा आम्ही जबाबदारी वाढविणाऱ्या सेवांचा विकास करत असतो तेव्हा कर्मचाऱ्यांना वाटते की आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवत आहोत.” ‘ध्वनि’ला मध्यप्रदेश सरकारच्या मातृ आणि बाल ट्रॅकिंग सिस्टीममध्ये सहाय्य करताना या समस्येचा सामना करावा लागला. “त्यावेळी एका आयपीएस अधिकाऱ्याने यावर जोर दिला. मात्र लवकरच त्यांची जागा कोण्या दुसऱ्या अधिकाऱ्याने घेतली. त्याला या कामाची बहुदा आवडच नव्हती.”

‘ध्वनि’च्या कामात एकमेकांच्या सहाय्याची खूप आवश्यकता असते. “अनेकदा आम्ही त्यांच्या प्रक्रिया आणि ऑपरेशन्सची नव्याने व्याख्या करीत असतो. अशावेळी आम्ही आमचा खूप वेळ आणि ऊर्जा या कामासाठी खर्च करतो आणि आम्हाला त्या तुलनेत त्याचा मोबदला मिळत नाही. तरीही आम्ही आमचे काम सुरुच ठेवतो. जर आम्ही हे काम नाही केले तर हे काम करणारे दुसरे कोणी नाही आहे.”

स्वप्निल शेवटी सांगतो, “आम्ही स्वतःला विकसनशील व्यावसायिक म्हणतो. कारण आम्ही केवळ आयसीटी उपाय उपलब्ध करविणाऱ्यांपेक्षा खूप काही जास्त करतो. सध्या अस्तित्वात असलेल्या आयसीटी उपायांपैकी अनेक उपाय तयार करणारे लोक विकासाचा अर्थ जाणत नाहीत आणि त्यांनी वास्तविक ग्रामीण भागातील आव्हानेही पाहिलेली नाहीत. आम्ही केवळ उपाय पुढे ढकलण्यात विश्वास ठेवत नाही. तर आम्ही लोकांच्या प्रत्यक्षातील गरजा जाणून आणि समजून घेण्यासाठी त्यांच्याबरोबर वेळ घालविण्यावर विश्वास ठेवतो आणि तसे करतो.”

लेखक : निशांत गोएल

अनुवाद : अनुज्ञा निकम

Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags