संपादने
Marathi

महाराष्ट्राचा मधमाशी मित्र

Team YS Marathi
4th Mar 2016
1+ Shares
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

हल्ली मधमाशी परिणामाबद्दल सतत बोललं जातं. हे पिवळे सतत गुणगुणणारे छोटे किडे जवळपास ७० टक्के पिकांमधून पराग उत्पादन करतात. पण या सतत व्यस्त असणाऱ्या मधमाशांच्या अत्यंत किचकट आणि दीर्घ अशा नैसर्गिक साखळीत खंड पाडला जातोय. जगभरातल्या मधमाशांच्या संख्येत अचानक झालेली घट ही पर्यावरणाचा समतोल बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकते. याचे परिणामही अतर्क्य असू शकतात.

श्रीकांत गजभिये हे 'बी द चेंज'चे संस्थापक आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकरी आणि जंगलात राहणाऱ्यांना गजभिये मधमाशा पालनाचं मोफत प्रशिक्षण देतात. शेतीची कामं सुरु असतील त्या ठिकाणी जर मधमाशा ठेवल्या तर त्यांचा मधही बाजारात विकून उत्पादनात २० ते २०० टक्क्यांनी वाढ होते असा त्यांचा दावा आहे.

imageमधमाशांच्या कार्यामुळे अप्रत्यक्षरित्या दरवर्षी उत्पादनात २०० दशलक्ष युरो उत्पादन मिळू शकतं आणि त्यांच्या परागीभवनामुळे १ दशलक्ष युरोपर्यंत उत्पादन मिळू शकतं, असं इंग्लंडमधल्या एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. अशाच प्रकारची माहिती अन्य देशांमधूनही समोर आली आहे. अन्नसाखळीत मधमाशांचं कार्य सगळीकडे सारखंच असतं. अमेरिकेत मधमाशांच्या काही प्रजाती झपाट्यानं नाहीशा होत आहेत. या जमाती कदाचित पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका युरोपियन युनियननं व्यक्त केला आहे. तर भारतातही किड्यांच्या संख्येत झपाट्यानं घट होत आहेत. मोबाईल फोन्समधून बाहेर जाणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सी किरणांमुळे आणि टॉवर्स हे यामागील कारण असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. आणि यामुळेच मधमाशांना धोका पोहोचतोय आणि त्यांच्या संख्येत होणारी घट ही आपल्या प्रत्येकासाठी धोक्याची घंटा आहे.

हेच सगळं लक्षात घेऊन मधमाशी पालनाचे परिणामही लक्षात घेतले पाहिजे....त्यामुळेच श्रीकांत यांचा हा उपक्रम फक्त मध उत्पादित करण्यापुरताच मर्यादित नाहीये. तर त्यातून त्याहीपेक्षा जास्त फायदे मिळावेत यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो.

imageदोन वर्षांपूर्वी कोझिकोडच्या आयआयएममधून पदवी घेतल्यानंतर ते पुण्याच्या सरकारी संस्थेतून पाच दिवसांचा मधमाशी पालनाचा अभ्यासक्रम छंद म्हणून शिकले. त्यानंतर ते या मध तयार करणाऱ्यांच्या प्रेमातच पडले. पर्यावरणात परागीभवनातून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या मधमाशांबद्दल काही अत्यंत वेगळ्या गोष्टी त्यांना समजल्या या मधमाशी पालनामध्ये अगदी तळागाळातल्या लोकांचं आयुष्य बदलण्याची क्षमता असल्याचंही त्यांच्या लक्षात आलं.

गेल्या काही महिन्यांमध्ये बी द चेंजनं ५०० पेक्षाही जास्त शेतकरी आणि जंगलात राहणाऱ्या लोकांना मधमाशी पालनाचं प्रशिक्षण दिलं आहे. सध्या त्यांच्याकडे ५० प्रशिक्षणार्थी आहेत. ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना भेटून त्यांना मोफत मधमाशांची खोकी आणि प्रशिक्षण देणं हा त्यांच्या कार्याचा एक भाग आहे. एकदा या शेतकऱ्यांनी मधमाशा पाळायला सुरुवात केली की मग त्यांच्याकडूनच ठरलेल्या किंमतीला मध विकत घेतला जातो. ही संस्था नफा मिळवण्यासाठी काम करत नाही. हा मध त्यांच्या ब्रँड अंतर्गत विकून ते पैसे मिळवतात.

imageमध आणि मेण विकणं हा शेतकऱ्यांसाठी अनेक फायद्यांपैकी एक आहे. मधमाशा ही एक भरपूर परतावा देणारी गुंतवणूक आहे. त्याशिवाय पिकांचं उत्पादन वाढतं आणि उत्पादनं अधिक सकस असतात. मधमाशी पालन आणि रासायनिक खतं एकमेकांच्या विरोधी गोष्टी आहेत. कारण रसायनांच्या वापरामुळे मधमाशा मरतात. त्यामुळे मधमाशा पालन करताना शेतकऱ्यांना रासायनिक खतांपासून दूर राहण्यास सांगितलं जातं. त्यामुळे साहजिकच रासायनिक खतांचा वापरही कमी होतो, असं श्रीकांत सांगतात. बी द चेंजचे २५ प्रशिक्षणार्थी सध्यार नैसर्गिक शेतीसाठीचं प्रमाणपत्रं मिळवण्याच्या दृष्टीनं काम करत आहेत.

शेतकऱ्यांना या आव्हानासाठी तयार करणं हे सोपं नव्हतं. कारण मधमाशी पालनासाठी गुंतवणूक आवश्यक असते. मधमाशांच्या एका खोक्याची किंमत साधारणपणं ५००० रुपये आहे आणि त्यानंतर काही महिन्यांनंतर मधमाशा मधनिर्मिती सुरु करतात. सहसा आम्ही ज्या भागात पूर्वी काम केलेलं नाही अशा ठिकाणी दहापैकी एक शेतकरी वर्षभरासाठी मधमाशा पालनासाठी तयार होतो. पण एकदा या शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ झालेली दिसली की मग इतरही शेतकरी त्याचा मार्ग अवलंबतात. त्याशिवाय मधमाशाच्या एका पोळ्यापासून दोन मधाची पोळी होऊ शकतात. आणि अशा प्रकारे दरवर्षी उत्पन्नात वाढच होते.

imageपण जंगलातील लोकांसोबत मात्र श्रीकांत यांची संस्था थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं काम करते. त्यांना मधाच्या पोळ्यांतून नैसर्गिकरित्या मध मिळवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं.यामध्ये मधाची पोळी नेमकी हेरून मधमाशांना धक्का न लावता त्यातून मध काढण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. यामुळे त्यांचं उत्पन्न तर वाढतंच शिवाय जंगलात नैसर्गिकरित्या मधमाशा पालन होतं.

अशा पद्धतीनं काम करणाऱ्या अगदी थोड्या संस्था आहेत. पण त्यापैकी बहुतेक संस्था या फक्त शेतकऱ्यांसोबत काम करतात. तर बी द चेंज जंगलात राहणाऱ्या लोकांनाही प्रशिक्षण देते, असं श्रीकांत सांगतात. त्याशिवाय या संस्थांची उत्पादनं महाग असतात, आम्ही परवडेल अशाच किंमतींना उत्पादनं विकतो, असं श्रीकांत सांगतात.

मधमाशी पालनासाठी आवश्यक त्या प्रशिक्षणासाठी असुविधा, मधाची पोळी उपलब्ध नसणं, प्रशिक्षणार्थींना मदत देण्यासाठी व्यवस्था नसणं, मधमाशांबाबत असलेले गैरसमज, बआषेचा अडसर आणि निधीची कमतरता या महाराष्ट्रात मधमाशी पालनात येणाऱ्या काही समस्या आहेत. पण आधी स्वत:ला प्रशिक्षित करून आम्ही यावर मात केली, असं श्रीकांत सांगतात.

https://www.youtube.com/watch?t=17&v=SqV46eAioPM

सध्या निसर्गातच मधाच्या पोळ्यांची संख्या खूप कमी आहे. त्य़ामुळेच त्यांना एका जागेहून दुसरीकडे हलवणं महागात पडू शकतं. निसर्गात असलेली मधाची पोळी आमच्या उपक्रमाच्या माध्यमातून जतन करण्याचा, त्यांना वाढवण्याचा, संकरित करण्याचा प्रयत्न करत आहोत. जेणेकरून आर्थिक परिमाणं बदलली आणि त्याचा परिणाम साहजिकच कार्यक्षमतेवरही झाला, असं श्रीकांत सांगतात. त्याशिवाय उत्पन्नाचं आणखी एक साधन म्हणून महिलांना मध आणि मेणापासून सौंदर्यप्रसाधनं तयार करण्याचं प्रशिक्षण देण्याचा बी द चेंजचा विचार आहे. बी द चेंज आणि त्यांचे २० स्वयंसेवक जे काम करत आहेत ते नि:शंकपणे मोठं आहे आणि या स्वयंसेवकांना हे काम करताना खूप आनंदही मिळतो.

पण कोणतेही पुरेसे स्रोत नसताना, पुरेशी साधनं उपलब्ध नसताना बी द चेंज जे काम करत आहे ते नक्कीच क्रांतीकारी आहे.

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

दोन अभियंता मित्रांचा ‘सात्विक’ प्रयत्न, सेंद्रीय अन्न खा निरोगी रहा ! आता शेतातील ‘शुध्द’ फळं भाज्या थेट तुमच्या स्वयंपाकघरात !

चार अशिक्षित आदिवासी महिलांच्या ‘घुमर’ स्वयंसेवी गटाने बनविली कोट्यावधींच्या उलाढालीची कंपनी! जंगलातून सीताफळ आणून विकणा-यांची कामगिरी !

एका संगणक अभियंत्याने स्व:बळावर पर्यटनासाठी विकसित केले 'ईको टूरीझम'

लेखक - फ्रान्सिस्का फरेरो

अनुवाद – सचिन जोशी

1+ Shares
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags