संपादने
Marathi

मुंबईच्या या अतिरिक्त पोलिस आयुक्तांना भेटा; जे कधीकाळी शेतकरी होते!

24th Feb 2017
Add to
Shares
11
Comments
Share This
Add to
Shares
11
Comments
Share

ही कहाणी आहे प्रताप आर दिघावकर यांची, जे सध्या मुंबईत अतिरिक्त पोलिस आयुक्त पदावर आहेत. त्यांच्या स्वत:च्या शब्दात त्यांनी सांगितले की, “ त्यांना सरकारी सेवेचा ध्यास होता, आणि शेती करता करता ते कसे आयपीएस अधिकारी झाले.

यावेळी ते म्हणाले की, “ नाशिक जवळच्या लायटेनिया या छोट्या गावात माझा जन्म झाला. आमच्या गावात केवळ एक प्राथमिक शाळा होती आणि गावातील लोकांना शेती हाच एकमेव व्यवसाय होता. पण लहानपणापासूनच मला सरकारी सेवेत जाण्याचा ध्यास होता. तो खरोखर गमतीदार प्रसंग होता, लहानपणी ज्यावेळी मी आकाशात विमान पाहिले होते. मी माझ्या आईला विचारणा केली की, या विमानाचे मालक कोण आहेत? आणि ती सहजतेने म्हणाली की, ‘सरकार’. आणि त्यावेळेपासून मला सरकारचा भाग व्हावेसे वाटू लागले. मी दिवस रात्र अभ्यास केला आणि प्रथम दहावी शालांत परिक्षेला बसलो. त्यानंतर मी २३ किमी दूर असलेल्या महाविद्यालयात जावू लागलो. पण कधीही खाडा केला नाही, तरीही ८६ टक्के गुण मिळवूनही मला आमच्या गावातील महाविद्यालयात एका गुणासाठी प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यावेळी माझ्या वडीलांनी मला शिक्षण सोडून देवून शेती करण्याचा सल्ला दिला होता.

वयाच्या सोळाव्या वर्षी, मी पूर्णत: शेती करु लागलो. पण वडिलांशी पटले नाही, मी माझ्या मनातील शिकण्याच्या छंदाचा पाठपुरावा करण्याचे ठरविले. मी आईकडून ३५० रुपये घेतले आणि दूरस्थ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्यावेळी मी शेतीमध्ये राबत होतोच, आणि पदवी घेण्यासाठी रात्री जागून अभ्यास देखील करत होतो. वयाच्या १८ व्या वर्षी मी माझे पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यासाठी मला १२५० रुपये खर्च आला. त्यानंतर मी पोलिस सेवा परीक्षा दिली. त्याचवेळी १९८७ मध्ये वयाच्या २२व्या वर्षी संरक्षण विभागाची देखील परीक्षा दिली. मी सहायक आयुक्त पदावर नियुक्त झालो. तो माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस होता.”


Image Source : Times Of India

Image Source : Times Of India


अतिरिक्त आयुक्तांनी हे देखिल सांगितले की, त्यांच्या सहायक आयुक्त पदाच्या नोकरीनंतरही कसे त्यांनी अभ्यास थांबविला नाही. त्यांना १९ ९३चे बॉम्बस्फोट आठवतात, त्यांच्या जीवनातील सर्वात कठीण प्रसंग म्हणून त्या काळात ते आणि त्यांचे सहकारी सतत १८ तास काम करत.

ते म्हणाले की, “ २०००साली मी आयपीएस अधिकारी झालो. शेती करताना १२५० रुपयांपेक्षा जास्त काही खर्च न करता मी आयपीएस झालो. मी गावात शाळा बांधली. दहा हजार पोलिस शिपायांसाठी रहिवासी वसाहत उभारली आणि संयुक्त राष्ट्रात जावून भाषणे दिली कारण ते माझे स्वप्न होते. वनश्री पुरस्कार आणि इंदिरा प्रियदर्शनी पुरस्कार स्विकारताना मला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. युएस मध्ये कमांडो प्रशिक्षण घेतले तो काळ माझ्या जीवनात सर्वाधिक संस्मरणीय ठरला.

अनेकदा लोक पोलिसांबाबत तक्रारी करतात, पण ते हे लक्षात घेत नाहीत की आम्ही आमचे कर्तव्य करत असतो. आम्ही सारा वेळ कुटूंबापासून दूर राहातो आणि सण रस्त्यावर साजरे करतो. आम्ही २४/७ तैनात असतो आणि आमच्या कर्तव्यापेक्षा जास्त काहीच नसते. मला आठवते की माझ्या चुलत भावाचे लग्न होते, आणि मी त्यासाठी निघालो होतो, त्याचवेळी मला कर्तव्यावर जावे लागले. मी तसाच परत गेलो, या सा-या काळात लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली. आणि मी ती करत राहिलो आहे. माझा संदेश केवळ इतकाच असेल की तुमच्या स्वप्नासाठी झटा, त्याखेरीज दुसरा पर्याय असू शकत नाही ज्याने ती प्रत्यक्षात येतील. आणि ती पूर्ण होतीलच, मी याचेच उदाहरण आहे”.

आज सभोवताल अनेक नकारात्मक गोष्टी होत असताना, आणि स्पर्धेच्या या काळात सारे पुढे जाण्याच्या घाईत असताना प्रताप यांची ही अनोखी जीवन कहाणी खरच प्रेरक आणि मार्गदर्शक अशीच म्हणावी लागेल.

Add to
Shares
11
Comments
Share This
Add to
Shares
11
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags