१७ वर्षीय तुषारच्या पेन्सील विश्वसंग्रहाची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद

१७ वर्षीय तुषारच्या पेन्सील विश्वसंग्रहाची  'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'  मध्ये  नोंद

Sunday November 29, 2015,

4 min Read

जगभरात अनेक लोकांना जुनी नाणी, नोटा, पोस्टाची तिकीट किंवा हस्ताक्षर अशा वेगवेगळ्या वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद असतो. पण हाच छंद जेव्हा वेगळ्या ध्येया मध्ये परिवर्तित होतो तेव्हा एका संग्रहकर्त्याला यशाचे शिखर गाठायला वेळ लागत नाही. छंद जोपासताना केलेल्या पेन्सिलींच्या संग्रहामुळे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. दिल्ली मध्ये राहणारा सतरा वर्षाचा तुषार लखनपाल आज स्वतः जवळच्या २० हजार पेन्सिलच्या संग्रहामुळे जग प्रसिद्ध झाला आहे. या व्यतिरिक्त भारतातल्याच नाही तर जगभरातल्या ६० पेक्षा अधिक देशातल्या पेन्सिलींचा त्याच्याकडे संचय आहे.


image


दिल्लीतल्या वसंतकुंज इथल्या दिल्ली पब्लिक स्कूल (DPS) मध्ये १२ वीत शिकणारा विद्यार्थी तुषार लखनपालने काही दिवसांपूर्वीच उरुग्वे एमिलिओ अरीनास च्या ७२ देशातल्या १६२६० पेन्सिलचे विश्व रेकॉर्ड तोडून १९८२४ आपल्या पेन्सील संग्रहाने स्वतःचे नाव सर्वोच्च स्थानावर कोरले आहे. आश्चर्याची गोष्ट ही आहे की १४ एप्रिल १९९८ मध्ये जन्मलेल्या १७ वर्षाच्या तुषारला संग्रह करून फक्त १४ वर्ष झाली आणि एमिलिओ मध्ये साल १९५६ पासून पेन्सिलींचा संग्रह सुरु आहे. याशिवाय तुषार कडे असलेली प्रत्येक पेन्सील ही वेगळी आहे.

मुलाखती दरम्यान तुषार सांगतो की,"जवळ जवळ वय वर्ष ३ पासून त्याने पेन्सिलीचा संग्रह करण्यास प्रारंभ केला. जेव्हा तो छोटा होता तेव्हा पासून भेट वस्तू म्हणून कधी पेन्सील मिळालीच तर ती न वापरता तो जपून ठेवायचा. कालांतराने हा छंद ध्येयात बदलला आणि मी पेन्सिलीचा संग्रह वाढवून विश्व विक्रमी झालो’’.

तुषार साल २००९ पासून सलग ६ वर्ष भारतात पेन्सीलचा संग्रह करणाऱ्या व्यक्तीच्या रुपात ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड ‘ मध्ये आपले नाव नोंदवित आहे. तुषार सांगतो की, "३० जून २०१४ पासून माझ्याकडे ६० पेक्षा अधिक देशांच्या १४२७९ पेन्सिल उपलब्ध आहे. जी आपल्या देशातली सर्वाधिक संख्या होती. प्रारंभी ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड ‘ने साल २००९ मध्ये माझ्या संग्रहाला मान्यता देऊन त्यांच्या पुस्तकात स्थान दिले. नंतर साल २०१०,२०१२,२०१३,२०१४ आणि या वर्षी २०१५ मध्ये ‘’लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड ‘’ मध्ये स्थान मिळविले . तुषारच्या या संग्रहात एशियाई, आफ्रिकी, कॅरीबियन, युरोपीय, मध्य – पूर्वच्या देशांचा, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या व्यतिरिक्त पॅसिफिक देशांतर्गत निर्मित पेन्सिलींचा यात समावेश आहे.


image


तुषारच्या संग्रहात सामान्य आणि असामान्य प्रकारच्या पेन्सिलींबरोबरच अविश्वसनीय आकार आणि मापाच्या पण पेन्सिली आहे. त्याच्या संग्रहात सगळ्यात छोटी पेन्सील २५ मिलिमीटरची आहे जिचा व्यास फक्त २ मिलिमीटर आहे आणि सगळ्यात मोठ्या पेन्सीलची लांबी ५४८ सेंटीमीटर म्हणजे १८ फुट व्यास तर लांबी २९ सेंटीमीटर आहे. आपल्या संग्रहाबद्दल तुषार अभिमानाने सांगतो की, ‘’त्याच्या कडे भिन्न रंगाच्या आकारांच्या पेन्सिलीं व्यतिरिक्त रत्नजडीत पेन्सील, सुवासिक पेन्सील, जुन्या इमारतीच्या आकाराच्या पेन्सील, प्रसिद्ध व्यक्तींचा आभास होणाऱ्या तसेच वेगवेगळ्या देशातल्या झेंड्याचा आभास होणाऱ्या पेन्सील सामील आहे. तसेच तापमानात होणारे बदल दर्शविणाऱ्या पेन्सील, ऑस्ट्रियाच्या विभिन्न साम्राज्यातल्या मुकुतांच्या आकाराचा पेन्सील, स्पाईडरमैन ,बार्बी, टोम एंड जैरी इ. कार्टून च्या पेन्सिली आहे.

आपल्या वैशिष्ट पूर्ण संग्रह बद्दल तुषार सांगतो,’’ की माझ्याकडे अदभूत वाटणाऱ्या मैाल्यवान गोल्ड प्लेटेड तसेच हिरे-जडित पेन्सील पण आहे. या दोन पेन्सिलींच्या खरेदीसाठी आई वडिलांनी ४०० पौंड खर्च केले. पेपरने बनवलेल्या पेन्सीलचा पण यात समावेश आहे. या व्यतिरिक्त लिखाण काम करण्यास असक्षम असलेल्या मुलांसाठी विशेष पद्धतीने तयार केलेल्या काही पेन्सिली आहे. या संपूर्ण संग्रहातल्या दोन पेन्सिली तुषारच्या अगदी जिवलग आहे. या पेन्सिली कधी काळी ब्रिटेनची महाराणी एलिजाबेथ (दुसरी) आपल्या लिखाणात यांचा वापर करीत असे, म्हणून या दोन पेन्सिली माझ्यासाठी अद्वितीय आहे’’.


image


आपल्या संग्रहातल्या ६७ देशांच्या निर्मित पेन्सिलींच्या खजानाच्या विस्ताराची तुषारची इच्छा आहे. तुषारचे स्वप्न आहे की जगातल्या नकाशातल्या सगळ्या देशातल्या पेन्सील त्याच्या कडे उपलब्ध असतील. हे सगळे त्याच्या परिवार आणि हितचिंतकांमुळे शक्य होईल.

एक कमर्शियल पायलट आशिष लखनपालचा मुलगा तुषार इंटरनेटवर तासनतास पेन्सील शोधण्यात व्यस्त असतो. आपल्या आई वडिलांच्या सहयोगाने त्याच्या संग्रहात वृद्धी होत गेली. मित्र, आप्तेष्ट तसेच वडिलांच्या परदेश दौऱ्याच्या दरम्यान मिळालेल्या भेट वस्तूंमुळे त्याचा संग्रहात नवीन पेन्सीलींचा समावेश होत राहिला.

आपल्या या संग्रहाने तुषारने १४ ऑक्टोबरला उरुग्वे एमिलिओ अरीनासच्या १६२६० पेन्सिलीनच विश्वरेकॉर्ड मोडून गिनीज बुक मध्ये नाव नोंदविले. लंडन मध्ये स्थापित या कार्यालयाने त्याच्या संग्रहाला मान्यता दिली. त्यांनी कडक नियमावलीच्या आधारे माझ्या संपूर्ण संग्रहाची विस्तृत मोजणीची कार्यतत्परता पूर्ण केली. एका पेन्सील बनविणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी, एक सरकारी अधिकारी, एक सार्वजनिक वरिष्ठ नागरिक, यांच्या देखरेखीत विडिओग्राफी आणि फोटोग्राफी केली. या नंतर १४ ऑक्टोबरला त्यांनी आपल्या वेबसाईटवर ‘’पेन्सिलींचा मोठा विश्वसंग्रहा’’ च्या रुपात स्थान दिले.


image


१७ वर्षीय या अवलियाला आपल्या छंदाचा भविष्यात विस्तार करून एका पेन्सील संग्रहालयाची स्थापना करायची आहे. युके मध्ये एकमेव असे पेन्सील संग्रहालय आहे. त्या सारखेच हे दुसरे संग्रहालय असेल जिथे मुले विभिन्नप्रकारच्या पेन्सील बघण्याचा आनंद घेऊ शकतील. 

वेबसाइट: http://tusharlakhanpal.com


लेखक : निशांत गोयल

अनुवाद : किरण ठाकरे

    Share on
    close