संपादने
Marathi

मुलांसाठी शिक्षण आणि मनोरंजन यांचा मेळा - चंद्रिका बहल यांचं क्रॅकरजॅक कार्निव्हल

12th Jan 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

आई होणं म्हणजे तुमच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी मिळणं...आई झाल्यानंतर तुमच्या प्राथमिकता आणि प्रत्येक गोष्टीकडे पहायचा तुमचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून जातो. तुमचं ह्रदय सतत तुमच्या बाळाकडे असतं... एकाच वेळेस अनेक गोष्टी करू शकणाऱ्या एखाद्या जादुई व्यक्तिमत्वात तुमचं रुपांतर होतं. तुम्ही कोणत्याही आव्हानांना सामोरं जायला तयार होता, क्रॅकरजॅक कार्निव्हल या एक्झिबिशन्स इंडिया ग्रुपच्या संचालिका चंद्रिका बहल सांगतात.

भारताच्या विकासात महत्वाची भूमिका बजावण्यासाठी एक्झिबशन्स इंडियाची स्थापना झाली. भारतात आणि भारताबाहेरही प्रदर्शनं आयोजित करून अंतर्गत आणि बाहेरील व्यापाराला चालना देणं आणि नवनवीन बाजारपेठा मिळवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय कंपन्यांचा सहभाग नोंदवणं ही त्याची प्रमुख उद्दीष्टं आहेत.


image


योग्य ते व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आम्ही आमच्या ग्राहकाला मार्गदर्शक करतो आणि मध्यस्थ म्हणून काम करतो. यामुळे त्यांना त्यांचं ध्येय गाठण्यासाठी मदत होते. भारतीय कंपन्यांना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी जसं आम्ही मदत करतो तसंच आंतरराष्ट्रीय ब्रँड्सनाही भारतीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही आमची मदत होते, याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे, असं चंद्रिका सांगतात.

दिल्लीमध्ये जन्मलेल्या चंद्रिका यांनी त्यांचं शिक्षण मॉर्डन स्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी लॉस एंजल्समधील युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅलिफॉर्नियामधून ग्लोबल मॅनेजमेंटचा (अर्थ आणि व्यवस्थापन) अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी दोन वर्षं एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलं. हा अनुभव खूप महत्त्वाचा ठरला, असं चंद्रिका सांगतात.

त्यांना प्रचंड व्यावसायिक अनुभव मिळाला. त्याशिवाय तिथे वेगवेगळ्या देशांमधील सहकारी होते, ज्यांच्यामुळे माझ्यामध्ये व्यावसायिकतेची बीजं पेरली गेली. आव्हानांना सामोरं जाताना किती कार्यक्षम असलं पाहिजे तसंच दिलेली वेळ पाळणं किती महत्त्वाचं आहे, हे मी तिथेच शिकले, असं त्या सांगतात. साहजिकच उद्योजक बनताना ही सगळी मूल्यं त्यांच्यासोबतच होती.

क्रॅकरजॅक कार्निव्हलची सुरुवात करताना त्यांच्या संस्थापकांची चर्चा मेला किंवा जत्रा याच संकल्पनेच्या भोवती घुटमळत होती. पण चंद्रिका सांगतात की ही जत्रा नाही. बाजारपेठेत आणि भेट देणाऱ्या जवळपास प्रत्येकाला क्रॅकरजॅक कार्निव्हलची संकल्पना समजावून देण्यासाठी त्यांच्या टीमला काही वेळ जाऊ द्यावा लागला. पण आश्चर्य म्हणजे ही संकल्पना त्यांच्या ठरलेल्या क्षेत्रामध्ये अगदी लगेचच आणि खूप लवकर उचलली गेली.

अत्यंत सुरक्षित आणि आरामदायी अशा वातावरणात कुटुंबाला वेळ घालवता यावा असे महोत्सव आम्ही आयोजित करतो. ग्राहकांशी थेट संवाद होण्यासाठी आमच्या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या आणि भागीदारांसाठी ही खूप चांगली संधी असते. त्यांना संशोधन करता येतं, त्यांच्या उपलब्ध माहितीवरून नेटवर्क तयार करता येतं, असं चंद्रिका सांगतात.


image


वेगवेगळ्या शहरांमध्ये आणखी महोत्सव आयोजित करून प्रगती करण्याचा कंपनीचा मानस आहे.पण त्यांचा मुख्य भर हा उच्च दर्जावर असल्यानं त्यामध्ये ते कोणतीही तडजोड करून घाई करत नाहीत.

खरंतर क्रॅकरजॅक कार्निव्हल या संकल्पनेचा उदय होण्यामागे आपली समायरा आणि झायन ही दोन्ही मुलं असल्याचं चंद्रिका सांगतात.

एक पालक म्हणून मुलांना फिरायला सतत मॉल्समध्ये नेणं हे त्यांना अजिबात पटत नव्हतं. त्यांची सृजनात्मकता वाढवणारं, त्यांना विचार करायला आणि शिकायला लावणारं वातावरण देण्याची गरज असते, असं त्यांचं म्हणणं आहे.

लहान मुलं आणि त्यांच्या गरजा ओळखणारं एकही व्यासपीठ अगदी गेल्या काही वर्षांपर्यंत भारतात नव्हतंच. पालकांच्या नजरेसमोर सुरक्षित वातावरणात शिकताशिकता आनंद देणाऱ्या वातावरणाची मुलांना गरज होती. दोन लहान मुलांच्या पालक म्हणून चंद्रिका यांनी आपल्या उपलब्ध स्रोतांचा पुरेपूर वापर करायचं ठरवलं आणि त्यांना हवा तसा महोत्सव निर्माण करायचा त्यांनी निर्णय घेतला. आज एक्झिबिशन्स इंडिया हा व्यापारविषय महोत्सव आयोजित करणारा भारतातील अग्रगण्य आयोजक समजला जातो. त्यांचे तज्ज्ञ हे आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसायाशी संबंधित (बी टू बी) संकल्पनांवर काम करणारे आहेत.

मला घरी राहणाऱ्या मातांबद्दल प्रचंड आदर आहे. कारण २४ तास घरी राहणं हा सगळ्यांत महत्त्वाचं आणि तरीही दुय्यम समजलं जाणारं काम आहे. आई होणं ही तर पूर्णवेळची नोकरी आहे, असं चंद्रिका सांगतात. अत्यंत कठीण परिस्थितीतही काम करण्यासाठी प्रोत्साहन देणारं, पाठिंबा देणारं कुटुंब असल्यानं त्या स्वत:ला अत्यंत भाग्यवान समजतात.

हे काम म्हणजे एक प्रकारची कसरतच आहे. तुमच्या हातातील सगळे चेंडू आकाशात आहेत आणि तुम्ही त्यातला एकही चेंडू खाली पडू देऊ शकत नाही, अशा प्रकारची कसरत सतत करावी लागते, चंद्रिका सांगतात. मला असं वाटतं की आई झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात जे पर्याय तुम्ही निवडता, त्याबद्दल तुम्ही वाईट वाटून घेऊ नये. तुम्ही कुटुंबासोबत किंवा तुमच्या मुलांसोबत किती वेळ एकत्र घालवता यापेक्षा जो वेळ एकत्र घालवता तो किती चांगला आहे हे महत्त्वाचं आहे. नोकरी करणाऱ्या आई असल्यानं एकाच वेळेस तुम्हाला अनेक कामं करावी लागतात. कधी कुटुंबात एखादं अत्यंत महत्त्वाचं काम असतं किंवा मुलांच्या शाळेतला एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही हजर राहू शकत नाही, कामाच्या ठिकाणी अनेकदा गोंधळ होऊ शकतो...पण जर तुम्ही थोडंसं सांभाळून घेतलं तर नक्कीच याचा उपयोग होतो. तसंच नोकरी करणारी आई ही अनेकदा तिच्या मुलांसाठी आदर्श असते. स्वावलंबी होण्याचे आणि चांगला उपयुक्त माणूस होण्याचे धडे तिच्याकडूनच मुलांना मिळतात असा त्यांचा विश्वास आहे.

मला विशेषकरून माझी मुलगी समायरा हिच्यापुढे उदाहरण ठेवायचं आहे. प्रत्येक महिलेनं तिचा अनुभव, शिक्षण आणि तिच्या क्षमतांचा तिच्या कुटुंबासाठी आणि समाजाच्या भल्यासाठी उपयोग केला पाहिजे, हे मला तिला दाखवून द्यायचे आहे, असं ही उद्योजक आई सांगते.

आपल्या मुलांवर आणि कुटुंबावर आपल्या कामाचा सकारात्मक परिणाम होतो ही गोष्टच चंद्रिका यांना कामासाठी सगळ्यांत जास्त प्रेरणा देते. क्रॅकरजॅक कार्निव्हलनं लहान मुलांसाठी महोत्सव आयोजित करण्यामध्ये जगात एक उदाहरण, आदर्श निर्माण करावा, हे त्यांचं ध्येय आहे. पालकांनी येऊन त्यांना महोत्सव आवडल्याचं सांगावं हे त्यांचं स्वप्न आहे.

भारतीय ग्राहकांसाठी योग्य काय आहे, त्यांना काय आवडेल याचा आढावा घेण्यासाठी चंद्रिका आणि त्यांची टीम सातत्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महोत्सवांना भेट देतात. अद्ययावत सेवा, उत्पादनं, जागतिक बाजारातले ट्रेंड्स आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या लहान मुलांसाठीच्या कार्यशाळा यांना भेट दिल्यानं त्यातून सर्वोत्तम ते भारतीय ग्राहकांपर्यंत त्यांना पोहोचवता येतं.

लेखक- शाश्वती मुखर्जी

अनुवाद- सचिन जोशी

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags