संपादने
Marathi

'वीमेन प्लॅनेट' महिला जागृतीचे व्यासपीठ

19th Oct 2015
Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share

आपला व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भविष्यात यशस्वी करीअरच्या दृष्टीने स्वाती प्रयत्न करत होत्या. अशा महत्त्वाच्या स्थितीत त्यांच्या कुटुंबाने त्यांना एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगितली होती. ती म्हणजे स्वाती यांचे लग्न होई पर्यंतच त्यांनी निवडलेल्या व्यावसायिक क्षेत्रात वाटचाल करण्याची परवानगी त्यांना देता येईल. एकदा का लग्नाच्या बंधनात त्या अडकल्या, की मग त्यांनी काम करावे की करू नये याचा निर्णय त्यांचे पती अथवा सासरच्या मंडळीच्या मर्जीवर अवलंबून असेल असे स्वाती यांच्या कुटुंबियांनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले होते.

आपल्या बहिणीवर लक्ष ठेवत तिचे ‘रक्षण’ करण्याच्या सूचनाही स्वाती यांच्या मोठ्या भावाला दिल्या गेल्या होत्या. त्यासाठी स्वाती यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत विविध नियमांची यादी सुद्धा तयार केली होती. ते नियम अगदी कडक होते आणि म्हणून स्वाती त्या नियमांचे पालन करू शकणार नाही अशातील काही भाग नव्हता. परंतु आपल्यासाठी नियमांची पुस्तिका तयार करण्यात आली आहे आणि त्या नियमांप्रमाणे आपल्याला जगायचे आहे याचा त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला. आपल्या विशेष ज्ञानाचा उपयोग महिलांपर्यंत पोचण्यासाठी आपण करायचा असे त्यांनी मनाशी पक्के ठरवले. ज्या महिला संकटात आहेत, ज्यांना दररोज विनयभंगाचा सामना करावा लागतो, ज्या महिलांना समाजातील भेदभावाचा सामना करावा लागतो अशा महिलांसाठी काम करण्याचे स्वाती यांनी निश्चित केले.

image


स्वाती म्हणतात की त्यांचे पती आणि त्यांची सासू त्यांना भरपूर पाठिंबा देतात. परंतु गुजरातमधील त्यांच्या सर्व मैत्रिणी त्यांच्यासारख्या भाग्यवान नाहीत. गुजरातमधील वडोदरात स्वातींचा जन्म झाला आणि तिथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. स्वाती आज ‘वीमेन प्लॅनेट’ ऑनलाईन व्यासपीठाच्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. वीमेन प्लॅनेट हे महिलांच्या समस्यांकडे लक्ष देऊन तज्ञांच्या माध्यमातून त्यांची सोडवणूक करण्याचे काम करते. स्वाती यांचे वय आज ३० वर्षे आहे. स्वाती सांगतात, “ केवळ आपले पती किंवा सासरच्या मंडळींना आवडत नाही म्हणून मी माझ्या अनेक मैत्रिणींना अतिशय यशस्वी झालेल्या असतानाही आपले करीअर साडून देताना पाहिले आहे. माझ्या दृष्टीने असा सामाजिक व्यवहार मुळीच स्वीकारण्याजोगा नाही.”

शाळेच्या दिवसांमध्ये स्वाती यांना अभ्यासापेक्षा खेळण्या बागडण्यात आणि इतर गोष्टींमध्ये खूप रस होता. परंतु शेवटी आपल्या पुस्तकांवर लक्ष केंद्रीत करण्यात त्या यशस्वी झाल्या आणि त्यांनी एमबीए ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्या टाईम्स ऑफ इंडियामध्ये ऑपरेशन एक्झिक्युटीव्ह या पदावर रूजू झाल्या.

परंतु नोकरी करण्यापेक्षा लवकरच आपले स्वत:चे काहीतरी सुरू करावे अशी त्यांची इच्छा होती. या इच्छेमुळे मग त्या ‘ब्लॅक आयडी सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड’ या आयटी कंपनीचा हिस्सा बनल्या. आपल्या शाळेतील मित्रांच्या सहकार्याने त्यांनी या कंपनीचा पाया घातला. या कंपनीच्या माध्यमातून त्यांना ऑनलाईन मार्केटिंग आणि एसईओची (सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन) ची एक वेगळी सुरूवात करण्याची संधी मिळाली आणि शेवटी त्यांना एसईओ या क्षेत्रात अपेक्षेहून अधिक यश मिळाले. एकूण सात वर्षे स्वाती यांनी या कंपनीचे संचलन केले. त्यानंतर एक नवी भुमिका साकार करण्यासाठी स्वाती यांनी स्वत:ला तयार केले. आपल्या स्वप्नांना साकार करत असताना समाजाला आपण काही देणे लागतो याच उद्देशाने त्यांनी वीमेन प्लॅनेटची स्थापना केली.

संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या दिल्लीच्या निर्भया प्रकरणाने स्वाती यांना आतून हलवून टाकले होते. या नंतर त्यांनी महिलांना मदत करणे आणि आयुष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांना सक्षम बनवणे, असे काम करण्याचा संकल्प केला. स्वाती म्हणतात. “ प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी विशेषता असते. याचा उपयोग समाजासाठी कोणत्या ना कोण त्या स्वरूपातील योगदानासाठी केला गेला पाहिजे. आणि असे करण्यासाठी कोणाला काही वेगळे असे करण्याची आवश्यकताच नाही.”

‘ऑनलाईन मार्केटिंग’ आणि ‘एसईओ’ या स्वाती यांच्या जमेच्या बाजू असल्याने त्या माध्यमातून त्यांना जे शक्य आहे ते त्यांनी केले तर त्याचा मोठा फायदा होईल असे स्वाती यांना वाटले.

‘वीमेन प्लॅनेट’च्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना या व्यासपीठाला जोडणे आणि त्याच वेळी या ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांमध्ये शिक्षण, त्यांचे सशक्तीकरण आणि मनोरंजन करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विविध मुद्द्यांबाबत चर्चा करण्याव्यतिरिक्त महिलांमध्ये जागृती घडवणे, त्यांच्या कल्याणासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम वीमेन प्लॅनेट करते.

स्वाती सांगतात, “ वीमेन प्लॅनेटच्या माध्यमातून पूर्णपणे वेगळे क्षेत्र शोधण्याची मला संधी मिळाली. एकाच वेळी आपल्या आजूबाजूला असलेल्या समाजातील विविध वर्ग आणि वेगवेगळे विचार असलेल्या लोकांना भेटणे आणि आपल्यासारखेच विचार असलेल्या इतर महिलांसोबत काम करणे अतिशय मजेदार आणि समृद्ध असा अनुभव असतो.”

‘वीमेन प्लॅनेट’ने आपला एक ब्लॉग सुरू केला. स्वाती यांनी हा ब्लॉग सर्वांसाठी खुला ठेवला. या ब्लॉगवर कुणीही आपले विचार व्यक्त करू शकतो. हा ब्लॉग लोकांसाठी तयार करण्यात आला असल्याने तो संरचित आणि ओढून ताणून केलेला असण्यापेक्षा त्याने लोकांच्या गरजा आणि उपयोगीतेनुरूप स्वत:च आपला आकार धारण केला पाहिजे असे स्वाती यांना वाटत होते. त्यांचा हा विचार भविष्याच्या दृष्टीने खूपच उपयुक्त सिद्ध झाल्याचे स्वाती सांगतात. हळूहळू हा विचार एक समाज, एक व्यासपीठ, एक प्रिंट आणि डिजिटल पत्रिकेचे( जी वर्षात एकदा निघते) रुप घेण्यात यशस्वी ठरला. ज्या ठिकाणी कुणीही हक्काने आपले विचार मांडू शकतो अशा व्यासपीठाचे रूप आता या ब्लॉगला प्राप्त झाले आहे.

image


आजच्या पितृसत्ताक समाजाची चाकोरी तोडणा-या महिलांच्या प्रेरणादायक कथा स्वाती यांना आश्चर्यचकित करतात. स्वाती म्हणतात, “ समाजात लैंगिक समानतेबाबत जागृती घडवणे हा आमचा विचार आहे आणि आम्ही भारतीय समाजाची मानसिकता बदलण्याचा सतत प्रयत्न करत आहोत. ग्रामीण भागात राहणा-या मुलींना रजोनिवृत्ती आणि स्वच्छतेसारख्या वर्ज्य विषयांबाबत माहिती देणे खूप आवश्यक आहे. आम्ही त्यांना जागृत करण्यासाठी त्यांच्या पर्यंत पोहोचण्याचे शक्य तितके प्रयत्न करत आहोत.”

स्वाती यांनी सुरू केलेल्या या व्यासपीठाबाबत आपले विचार व्यक्त करताना वडोदरा इथे फुटपाथवरील शाळा सुरू करण्याचे पाऊल उचलणा-या जुईन दत्ता सांगतात, “ लोकांपर्यंत पोहोचण्याचा खरोखर हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. एखाद्या मुलीच्या आयुष्यात शिक्षणाचे काय महत्त्व असते याची आपल्याला चांगलीच कल्पना आहे. अशा प्रकारचे पाऊल निश्चितच प्रशंसनीय असे आहे. अशा प्रकारच्या विषयांना या व्यासपीठावर अतिशय गंभीरपणे वाचा फोडली जाते आणि या माध्यमातून मुलींवर समाजात कोणत्या प्रकारचे अन्याय होतात हे जाणून घेण्याची लोकांना संधी मिळते.” बांधकाम क्षेत्रात काम करणा-या श्रमिकांच्या मुलांना सुशिक्षित बनवण्याचे आपले स्वप्न पूर्ण करता यावे म्हणून जुईन यांनी आपली नोकरी सोडून दिली. अधिकाधिक लोकांना फायदा होण्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा अशा उपयुक्त व्यासपीठांनी प्रयत्न करायला हवा असे जुईन यांना वाटते.

महिलांसाठी काही सकारात्मक करावे यासाठी स्वाती यांना एका घटनेद्वारे प्रेरणा मिळाली. भारतातील एका ग्रामीण भागात एका महिलेचा विवाह झाला आणि पुढे एक वर्षभर ती आनंदात राहिली. काही काळानंतर ती गरोदर राहिली. तिच्या गर्भात मुलगी आहे असे जेव्हा तिच्या सासरच्या मंडळींना समजले तेव्हा त्यांनी तिचा गर्भपात करून टाकला. जर पुढल्या वेळी पुन्हा तिच्या गर्भात मुलगीच असेल तर तिला सोडून देण्यात येईल आणि तिच्या नव-याचे दुसरे लग्न लावण्यात येईल अशी सक्त ताकीद तिच्या सासरच्या मंडळींनी तिला दिली.

स्वाती म्हणतात, ही गोष्ट ऐकल्यानंतर मला खूपच दु:ख वाटले आणि हे लक्षात आले की आपण अशा समाजात राहतो, ज्या समाजात महिलाच महिलेची शत्रू आहे. एक महिला दुस-या महिलेसोबत माणसासारखा व्यवहार करत नाहीत अशी परिस्थिती सुद्धा मी अनेकदा पाहिलेली आहे. इतरांनी आपल्यासोबत जसे वागावे असे महिलेला वाटते त्याच प्रकारे त्या जर एकमेकांजवळ सन्मानाने वागल्या तरच महिलांमध्ये समानता आणि साक्षरता येईल असे मला वाटते.

आपली स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी, तसेच दुस-यांचे जीवन घडवण्यासाठी ज्या महिला कठोर परिश्रम करत आहेत अशा महिलांकडून स्वाती प्रेरणा घेत असतात. अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी आणि त्यांच्या प्रमाणेच आपल्या हक्कांसाठी लढणा-या इतर धाडसी महिला या स्वाती यांच्यासाठी रोल मॉडेल आहेत.

Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

Latest Stories

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा