संपादने
Marathi

आई होऊ पाहणाऱ्या उद्योजिकांमध्ये स्वतःच्या उदाहरणाने आत्मविश्वास जागवणाऱ्या सुमी गंभीर

10th May 2016
Add to
Shares
4
Comments
Share This
Add to
Shares
4
Comments
Share

एका मागोमाग दिवस सरत असतात... आणि आपण विचारांमध्ये गढून जातो. करिअर की कुटुंब?

वय वाढतं तसं बाळ होण्यामध्ये अडचणी येतात. त्यामुळे मुलं होऊ द्यावं की नाही हा प्रश्न करिअरिस्ट स्त्री ला नेहमी भेडसावत असतो. कारण एकीकडे करिअरनेही चांगली भरारी घेतली असते. मध्येच ब्रेक घेतला तर पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल की काय असं वाटतं. त्यामुळे बऱ्याचशा स्त्रिया व्दिधा मनस्थितीत असतात.

उद्योजिका आणि डिगीवेशनच्या सहसंस्थापिका सुमी गंभीर म्हणतात, "लग्नानंतर किंवा गरोदरपणात नोकरी सोडावी लागेल ही भीती मी बऱ्याच महिलांमध्ये पाहिली आहे. महिला उद्योजिका म्हणून पुढे येण्यात ही सर्वात मोठी अडचण आहे". यातूनच प्रेरणा घेत, या प्रश्नांचं उत्तर मिळवण्याकरता सुमींनी या वर्षाच्या सुरूवातीला प्रेगप्रीनरडॉटकॉम (Pregpreneur.com) ची स्थापना केली.

image


सुमी स्वतः गरोदर असताना काम, कुटुंब आणि स्वतःची काळजी या सर्व गोष्टींचा मेळ कसा घातला? समस्यांवर मात कशी केली? घरातून आणि कार्यालयातून मदत आणि साथ कशी दिली या सर्व बाबींचा उहापोह आणि पॉझिटिव्ह अनुभव सुमी इथे इतरांसोबत शेअर करतात.

स्टार्टअपची गाठ

३३ वर्षीय सुमी यांचा जन्म दिल्लीतल्या एका व्यावसायिक कुटुंबात झाला. त्यामुळे लघु आणि मध्यम उद्योजकांना भेडसावणारी आव्हानं, त्यातल्या खाचा खोचा सुमी यांना चांगल्याच माहीत होत्या. आव्हानं असली तरी उद्योजिका बनण्याकडे त्यांचा कायम ओढा होता. कला क्षेत्राची आवड असल्याने त्यांनी नवी दिल्लीतल्या अपीजय इंस्टिट्यूट ऑफ डिझाइनमधून २००४ मध्ये ग्रॅज्यूएशन केलं. त्यानंतर तीन वर्षे त्यांनी इंडिया टुडे आणि हिंदुस्थान टाईम्समध्ये काम केलं. आपल्या कामाचा आवाका वाढवण्याच्या हेतूने त्यांनी मिशिगन स्टेट विद्यापीठातून कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स केलं. अमेरिकेत असताना त्यांनी सिलिकॉन व्हॅलीमधील एका स्टार्टअपसोबत काम केलं. स्टार्टअप्सना डिजीटल सपोर्ट पुरवण्याचं काम ही स्टार्टअप करायची.

अमेरिकेत असताना स्वतःचा उद्योग सुरू करण्याची त्यांची मनिषा अधिक तीव्र झाली. त्या म्हणतात, "अमेरिकेत असताना मी माझ्या व्यवसायाच्या कल्पनेवर काही जणांसोबत चर्चा करायची. जेणेकरून मला काही चांगले सल्ले आणि आणखी काही कल्पना मिळतील. त्याचवेळी माझी आमच्या कंपनीच्या सहसंस्थापकाबरोबर ओळख झाली. समीर वकील यांनाही भारतात परतून स्वतःच काहीतरी सुरू करायचं होतं. आमच्या कल्पना मिळत्याजुळत्या होत्या. आणि मग आम्ही एकत्र काम करायचं ठरवलं".

सुमी आणि समीर यांनी लघु-मध्यम उद्योगांना व्यापारात नेटवर्क साहाय्य करण्याचं ठरवलं. २०१३ मध्ये त्यांनी ग्लोबल लिंकरची स्थापना केली. पण सप्टेंबर २०१४ मध्ये त्यांची कंपनी कार्यान्वित झाली. सुमी सध्या न्यूयॉर्कमध्ये राहतात. पण त्यांचा जास्तीत जास्त वेळ भारतातल्या त्यांच्या उद्योगाच्या कामातच खर्च होतो.

गरोदरपणा आणि उद्योजकत्व

उद्योजिका असल्यामुळे आव्हानं तर पाचवीला पुजलेली असणारचं हे सुमींना चांगलच अवगत होतं. त्यांना येणाऱ्या समस्यांकडे त्या एक संधी म्हणून अथवा, यापेक्षाही खडतर प्रसंग असतात या वेगळ्या दृष्टीने मापू लागल्या. त्यांच्या एसएमइ (स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस, लघु मध्यम उद्योग) कडेही त्या अशाप्रकारे पाहू लागल्या. त्या म्हणतात, असं केल्याने आपल्या समस्यांचा आवाका कमी होतो. 

याचा अर्थ असा नाही की आव्हानं कमी होतात. सुमी म्हणतात, "मला माझ्या उद्योगाला जास्तीत जास्त वेळ देता येत नव्हता. मी फारसा प्रवास करू शकत नव्हते. दवाखान्याच्या सारख्या चक्करा, चाचण्या करणे यामध्ये बराचसा वेळ जायचा. पण मी या सगळ्याकडे पॉझिटिव्हली पाहिलं".

"मी या काळात माझ्या टीमशी आणि सहसंस्थापकाशी जास्त संवाद साधू लागले. माझी दिनचर्या आणि गरजा त्यांना स्पष्टपणे सांगू लागले. 'काहीतरी सुटत चाललयं, मला काही करता येत नाहीये' ही भावना त्यामुळे कमी होऊ लागली. एक आशावाद निर्माण झाला. माझी दिनचर्या मी त्याप्रमाणे आखू लागली. बऱ्याचदा आव्हानं आपल्या डोक्यात निर्माण होतात. पण ती बोलून दाखवल्यावर हलकी होतात. त्यातून मार्ग निघतात. अशाप्रकारे उद्योजिका आणि गरोदरपणा या दोन्ही कसरती मला यशस्वीपणे पार पाडता आल्या". 

ताणाला बुट्टी

पॉझिटिव्ह अॅप्रोचमुळे सुमीत स्वतःत खूप चांगले बदल झाल्याचे जाणवले. गरोदरपणामुळे त्यांचा त्यांच्या टीमसोबतच संवाद वाढला. वाढत्या संवादामुळे तिच्या कामातही सुधारणा आली. उगीचच ताण घेणं बंद झालं. ताणाला वाट मिळाली. एखादी समस्या संबंधित योग्य त्या सहकाऱ्याला सांगितल्यावर त्याचं कारण शोधून मार्ग काढणं सोपं जातं. आणि समस्येचं स्वरुप वाढत नाही. 

तीन पातळ्यांवर बदल

सुमी म्हणतात, "आता परिस्थितीत बदल होत आहे. पण समाजात या विषयावर अधिक सविस्तरपणे चर्चा व्हायला हवी. मी याकडे तीन स्तरावर पाहते. एक म्हणजे, उद्योजिकेच्या घरचं वातावरण, कामकाजाच्या ठिकाणचे नियम आणि परंपरा. कंपनीचे प्रमुखच कंपनीच्या कामाची पद्धत ठरवतात. तसंच उद्योजिकात्वासोबतच कुटुंबही वाढवायचं या विचाराचं नीट अवलोकन करता येतं. मला या तीनही स्तरावर चांगलं प्रोत्साहन मिळालं. हा एक प्रवास आहे, त्यात थांबण नाही. आपले प्रयत्न सतत सुरूच असले पाहिजेत". 

सुमीवर आजूबाजूने प्रश्नांचा भडीमार होत होता, "तुला आता व्यवसाय कसा सांभाळता येईल? तू आता यातून बाहेर पडणार का"? पण तिच्या कुटुंब, सहसंस्थापक आणि टीमचा तिला खूप चांगला पाठिंबा मिळाला. 

सुमी सांगते, "मला सहकारी विशेषतः पुरुष सहकारी, गुंतवणुकदार आणि मित्रमैत्रिणींचे प्रोत्साहन आणि सहकार्याचे खूप एसएमएस आले. आमच्या या छोट्याशा उद्योगात आमच्या तीन महिला सहकाऱ्यांनी गरोदरपणात अक्षरशः शेवटच्या दिवसापर्यंत काम केल्याचं आम्ही पाहिलं.आमची अख्खी टीम त्यांच्या सोबत होती. त्या ऑफिसमध्ये नाहीत ही जाणीव कधीच करुन दिली नाही. आमच्या संस्थेत याकाळात आम्ही सहा महिने भरपगारी रजा देतो. बाळंतपणानंतर'रिटर्न टू वर्क' प्रक्रियाही खूप सहज केली आहे. त्या काही दिवस काही तास येऊन काम करू शकतात. घरुन ऑफिसचं काम करू शकतात. यासगळ्याकरता संस्थेत एकमेकांशी छान संवाद असणं खूप गरजेचं आहे". 

image


उद्योजिकत्व आणि गरोदरपणा या दोन्हींकरता ध्येय आणि काटकपणा अत्यंत आवश्यक आहे. सुमींच्या मते महिलांनी उद्योजिकत्व आणि गरोदरपणा या दोन्हीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणं आवश्यक आहे. 

सुमी सांगतात, "आपल्यातल्या स्त्रीत्वामुळे आपोआपच आपण दुसऱ्यांचा विचार करू लागतो. इतरांचं मत विचारात घेतो. इतरांकरता कधीकधी आपण आपल्या गोष्टींना कमी प्राधान्य देतो. चांगलंच होतंय ना मग असा विचार करून आपण काही गोष्टींचा त्याग करायलाही मागेपुढे पाहत नाही. आता थोडा उलट विचार करण्याची वेळ आली आहे. आपण सर्व जबाबदाऱ्यांचा मेळ साधत तोल कसा साधता येईल हे पाहिलं पाहिजे. असं केल्यावरचं उद्योजिकत्व आणि गरोदरपणं हातात हात घालून व्यवस्थित मार्गक्रमण करता येईल". 

मातृत्वाची ओढ

मातृत्वाचा आनंद लुटताना सुमी आता प्रेगप्रीनरवर उद्योजिकांशी संवाद साधतात. आपल्या स्वतःच्या उदाहरणांनी त्या महिलांना प्रोत्साहन देतात. या काळातील अाव्हानांना कसं सामोर जायचं याकरता त्या मार्गदर्शन करत आहेत. 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

आदर्श माता ते आदर्श उद्योजिका – तारा शर्मा सलुजा यांची कथा

आई झाल्यावर घेतला स्वतःतील उद्योजिकेची शोध, अशिनी यांच्या स्टार्टअपच्या जन्माची कहाणी !

आत्मसंतुष्ट न होता, सतत नव्याचा ध्यास असलेल्या यशस्वी उद्योगिनीची कथा

लेखिका - तन्वी दुबे

अनुवाद - साधना तिप्पनाकजे 

Add to
Shares
4
Comments
Share This
Add to
Shares
4
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags