संपादने
Marathi

दिल्लीतील ‘पुरानी हवेली’ ते 'जयपोर'चा ऑनलाईन यशस्वी प्रवास

sunil tambe
10th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

डिसेंबर, २०११ चा तो काळ होता. दिल्लीत कडाक्याची थंडी होती आणि सकाळचे आठ वाजले होते. पुनीत चावला हे लीला हॉटेलमध्ये आपली भावी सह-संस्थापिका शिल्पा शर्मा यांची वाट पाहत बसले होते. पुढील पाचच मिनिटांमध्ये त्या आल्या. दोघांनी जयपोरची कल्पना साकार करण्याचे ठरवले होते. जयपोर हे एक ई-कॉमर्स पोर्टल होते. भारतात तयार झालेली उत्पादने जगभरात पोहोचवणे हा त्या पोर्टलचा उद्देश होता.

लवकरच पुनीत, शिल्पा आणि काही मित्रांची एक टीम तयार झाली. या टीमने दिल्लीतील शाहपूर जाटमध्ये असलेल्या एका जुन्या हवेलीत आपले पहिले कार्यालय उघडले. थंडीचे ते दिवस एक तर टेरेसवर उन्हात शेकून जात होते, किंवा मग रस्स्त्यांवर शूट करत करत मावळत होते. टेरेसच्या एका कोनाड्यात पडलेली खाट थकलेल्या दिवसात दिलास देत होती. मिटिंग्स आणि मुलाखती तर बाजूलाच असलेल्या कॉफीशॉपमध्ये पार पडत असत. पुनीत ते दिवस आठवतात आणि सांगतात, “ जेव्हा आम्ही आमच्या कार्यालयात मिटिंग रूम तयार केले ते खरे तर एका कोप-यात ठेवलेला मित्राचा एक सोफा सेट होता. आजही तो सोफा आमच्या नव्या कार्यालयात वेटिंग करायच्या ठिकाणी पडलेला आहे.”

कंपनीची सुरूवात खूपच साध्या पद्धतीने झाली होती. तरी देखील पुनीत आणि शिल्पा आपल्या संकल्पनेच्या भविष्यातील यशाबाबत आशावादी होते. पुनीत ई-कॉमर्स व्यवसायात काम करत होते आणि अमेरिकेतील अनिवासी ग्राहकांना ( एनआरआय) भारतीय ‘डिझायनर ड्रेस’ विकत होते.

image


जमिनीवर हवाई किल्ले उभारणे

पुनीत सांगतात, “ भारतात निर्मिती झालेलल्या उत्पादनांना मोठी मागणी होती हे माझ्या लक्षात आले. विशेषता जी भारतीय परंपरांच्या खोल मूळांशी जोडली गेली होती अशा उत्पादनांसाठी ही मागणी होत होती. शिल्पा यांना मी हीच गोष्ट सांगितली. त्यावेळी त्या एक सल्लागाराच्या रूपात काम करत होत्या. त्यानंतर आम्ही दोघांनी ‘जयपोर’ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.

परंतु नव्याने सुरू केलेल्या स्टार्टअप कंपनीची वाटचाल खूपच कठीण असते. स्वप्न पाहणारयासाठी तर दिल्लीतील जुन्या हवेलीतील कार्यालय परिपूर्ण होते. परंतु आता ते त्या स्वप्नाचे रूपातर व्यवसायात करण्याचा प्रयत्न करत होते. सुरूवातीच्या टीमच्या प्रत्येक सदस्याजवळ एक वेगळ्या प्रकारचे खडतर काम होते. पुनीत सांगतात, “ सुरूवातीच्या दिवसांमध्ये मी पहारेकरीही होतो, इलेक्ट्रिशियनही होतो, सीईओही होतो, डेटा एंट्री ऑपरेटरही होतो, फोटोग्राफर आणि डिलिव्हरी बॉय देखील मीच होतो.”

दुसरीकडे त्यांच्यापुढे निधी उभारण्याचेही आव्हान होते. या आव्हानाबरोबरही त्यांना लढायचे होते. काहीही खर्च न करता आपले काम कसे पार पाडता येईल अशा पद्धती ही टीम सतत शोधत होती. जो पर्यंत आपण कोणापर्यंत पोहोचत नाहीत, तो पर्यंत आपल्या अस्तित्वाबाबत कुणीच जाणत नाही हे केवळ ऑनलाईन पर्यंतच मर्यादित असलेल्या व्यवसायासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. इथे सुद्धा मार्केटिंगसाठी पैशांची आवश्यकता होती.

तेव्हा या टीमने सर्वसाधारणपणे स्वीकारला जाणारा मार्ग निवडला आणि सोशल मिडियावर आपल्याला हव्या असलेल्या ग्राहकाच्या शोध घेऊ लागले. त्यासाठी व्यक्तीगत पातळीवर ही टीम आपल्या वेबसाईटला भेट देण्यासाठी लोकांना आमंत्रित करू लागली.

image


स्वप्नांच्या जगात वास्तवाशी सामना करणे

सुरूवातीच्या दिवसांमध्ये ही टीम केवळ अमेरिकेतच आपले उत्पादन विकत होती. जेव्हा एखाद्या आंतरराष्ट्रीय वेबसाईटवरून खरेदी कऱण्याचा मुद्दा असतो तेव्हा विश्वास हा एक मोठा घटक असतो. आपल्या क्रेडिट कार्डच्या तपशीलाची सुरक्षा आणि उत्पादन ओरिजनल आहे किंवा कसे याबाबत ग्राहकांना काळजी वाटत असे. काही सुरूवातीच्या ग्राहकांची भीती दूर करण्यासाठी पुनीत यांना व्यक्तिगत पातळीवर ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी फोन ही करावा लागत होता.

'पॅकेजिंग', साहित्य आणि 'शिपिंग'च्या तपशीलाच्या कामाचा निपटारा करण्यासाठी कोअर टीमला दिल्लीतील 'चावडी बाजार' आणि मुंबईतील 'क्रॉफर्ड मार्केट'मध्ये योग्य विक्रेते आणि साहित्यासाठी भटकावे लागले. पॅकेजिंग योग्य आहे किंवा कसे हे तपासण्यासाठी जगभरात पसरलेल्या त्यांच्या मित्रांकडे प्रयोगासाठी कितीतरी शिपमेंट पाठवण्यात आले.

मालाची वाहतूक आणि महसूल प्राप्त करणे एकदाचे सुरू झाल्यानंतर आता टीमसमोर तंत्रज्ञानाने युक्त पायाभूत सुविधांची चिंता होती. त्यांचा सुरूवातीचा सर्व लोड घेण्यास सक्षम नव्हता, सतत बंद होत होता. बीयर आणि पिझ्झाच्या बदल्यात मित्र आणि सॉफ्टवेअर इंजिनियरशी संबंधित असेल्या पूर्वीच्या सह कर्मचा-यांकडून सर्वरची समस्य़ा दूर केली जात होती.

पुनीत सांगतात, “ आम्ही विकसित झाल्याबरोबर आमची आव्हाने देखील बदलली. जेव्हा आम्ही सुरूवात केली त्यावेळी आमच्या सारखी उत्पादने विकणा-या इतर भरपूर साईट्स होत्या. आता आम्हाला पुढे टिकूनही रहायचे होते आणि आमच्या स्थानाचे संरक्षण देखील करायचे होते. हे खूपच आव्हानात्मक होते. परंतु काहीतरी वेगळे करण्याच्या इच्छाशक्तीने आणि झपाटलेपणामुळे आम्हाला पुढे पुढे चालत राहण्याची शक्ती दिली.”

त्यानी केलेल्या अपेक्षेपेक्षा त्यांचा विकास कितीतरी पटीने अधिक होता. अमेरिकी मार्केटसाठी सप्टेंबर, २०१२ मध्ये ‘बीटा’ लाँच झाले. पुढे त्याला जानेवारी, २०१३ मध्ये जागतिक पातळीवर लाँच केले गेले आणि तेव्हापासून 'जयपोर'च्या महसूलात ५००० टक्क्यांची उभारी आली आहे.


गर्दीचा एक भाग न होता वेगळी केली सुरूवात


जुन्या हवेलीच्या दिवसांपासूनच ‘जयपोर’ तीन गोष्टींमुळे टिकून राहिला – गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि ग्राहकांवर असलेले प्रेम. त्यांनी या तीन गोष्टीसोबत कधीही तडजोड केली नाही. सर्वकाही पारदर्शक होते. ग्राहक, गुंतवणूकदार, कर्मचारी या सर्वांपासून काहीही लपवून ठेवण्यात आलेले नव्हते. जे दाखवले जात होते, तेच दिले जात होते.

पुनीत सांगतात, की लोक मशीनद्वारे बनवलेली उत्पादने घेण्यापेक्षा हातमागावर बनवलेले उत्पादन घेणे अधिक पसंत करतात. याचे कारण ते अधिक स्वस्त असते म्हणून नव्हे, तर हातमागाद्वारे बनवलेले उत्पादन विकत घेण्यामागे आपल्या प्राचीन आणि पारंपारिक कलाकुसरीला प्रोत्साहित करणे हा त्यांचा उद्देश असतो. शिवाय यातून आपल्या जुन्या वारशाला जिवंत ठेवण्याचाही त्यांचा प्रयत्न असतो. यासाठीच टीम त्यांच्याकडे केवळ ग्राहक या नात्याने न पाहता त्यांना एका कुटूंबासारखे वागवते.

व्यवसायाची गोष्ट

‘जयपोर’ आपल्या उत्पादनाची विक्री करताना विक्रीची किंमत आणि खरेदी किंमती दरम्यान मार्जिन राखते. हा एक साधा किरकोळ महसूल आहे. ‘जयपोरला’ एक ग्लोबल उत्पादनाच्या रुपात स्थापित करण्याचा टीमचा प्रयत्न आहे.

देशभरातील विणकर, समूह आणि डिझायनर्सच्या सुंदर उत्पादनांव्यतिरिक्त काही निवडक श्रेणींमध्ये स्वत:चे विशेष उत्पादन विकसित कऱण्याचा टीमचा प्रयत्न आहे. पुनीत शेवटी म्हणतात, “ आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही ऑनलाईन व्यवसायात देखील आमची उपस्थिती निश्चितच नोंदवू.”

या वर्षीच्या अखेरपर्यंत भारतात ई-कॉमर्सचे मार्केट १६ बिलियन डॉलर्सचे होईल. खरे तर, ‘भारत’ हे जगात सर्वात जलद गतीने विकसित होणारे ई-कॉमर्स मार्केट आहे. या व्यतिरिक्त स्थानिक आणि विशेष क्षेत्रांशी संबंधित इ-उत्पादनांचे मार्केट तीव्र गतीने वाढत आहे. या क्षेत्रात गिस्का (Giskaa), तिजोरी (Tjori) आणि काश्मिरी बॉक्स ( Kashmiri Box।) सारखे पूर्वीपासूनच भरपूर प्लेअर्स आहेत.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

Latest Stories

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा