संपादने
Marathi

क्षयरोगाबाबत जाणिव-जागृतीसाठी मुंबईचा हा डॉक्टर बस-ट्रेनमध्ये फिरत आहे!

Team YS Marathi
6th Feb 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

श्रीनिवास रामानुजम यांच्यापासून अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत क्षयरोगाचा आजार अनेक जणांना देशभरात झाला आहे. डॉ. लक्ष्मीकांत आनंदे हे शिवडी रुग्णालयातील क्षयरोग विभागाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी याबाबत जाणिव जागृतीसाठी मुबईभर फिरत आहेत. मागील चार वर्षात डॉ आनंदे यांनी स्वत:हून लाखभर लोकांशी यासाठी संपर्क साधला आहे. ते नेहमी रस्त्याने जाताना लोकांशी याबाबत संवाद साधतात. 


Source – Scientific American

Source – Scientific American


ते गर्दीच्या ट्रेनमध्ये आणि इतर जागी केवळ या रोगाची माहिती देण्यासाठी जातात. ते लहानसे सादरीकरण सोबत घेवून जातात, बोलताना क्षयाच्या लक्षणांबाबत, प्रतिबंधात्मक उपायांबाबत माहिती देतात. सार्वजानिक जागेत क्षयाच्या रुग्णाने थुंकू नये यासाठी ते प्रात्यक्षिकेही दाखवतात. गेल्या २७ वर्षांपासून डॉ आनंदे शिवडी रुग्णालयात काम करतात. त्याबाबत बोलताना ते म्हणाले की, “ क्षयाबाबत सारेजण बोलतात, जे लोक प्रत्यक्षात या रोगाचे शिकार होतात, त्यांना औषधाचे साइड इफेक्ट किंवा त्यांचा प्रतिबंध सहन करावा लागतो. मात्र मला त्याबाबत जागृती करावीशी वाटते. मला वाटते की सा-यांनी क्षयाचे जंतू वाहून नेण्याबाबत माहिती घेतल्यास त्याचे प्रमाण कमी होवू शकेल”.

या संकल्पनेवर ते २०१३पासून काम करत आहेत, ज्यावेळी मुंबईत औषधाना न जुमानणा-या क्षयाबाबत माहिती झाली. सरकारने त्यांच्या शोधाला मान्यता देण्यास नकार दिला त्यानंतरही ते थांबले नाहीत. या कामात ते इतके झोकून देवून काम करत होते की, त्यांची कार उभी राहिल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे भानही त्यांना राहात नव्हते. त्यामुळे ते एकटेच एका वाहनापासून दुस-या वाहनाजवळ जावून माहितीचा प्रसार करू लागले.

निवासी संकुलात आनंदे व्याख्याने देतात, शाळा-महाविद्यालयातून जागृती करतात. त्यांनी स्वत:चे लक्षय ठरविले आहे ते म्हणजे १.५ कोटी लोकांपर्यंत जावून माहिती देणे, जे मुंबईत राहतात आणि सारे क्षयमुक्त राहतील. क्षयरोग हा भारतातील सर्वात भयावह आजार आहे, जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार २०१४मध्ये ९.६ दशलक्ष रुग्ण जगभरात होते त्यापैकी २.२ दशलक्ष भारतीय होते.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags