संपादने
Marathi

ऑन डिमांड सेवा पुरवण्यासाठी आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांचा ‘गपून’ प्रयोग

19th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share


छोट्या पण महत्त्वाच्या सेवा स्थानिक पातळीवर मागाल तिथे पुरवण्याऱ्या नवीन उत्साही उद्योजकांमुळे भारतात एक नवीन पायंडा पडत आहे. किराणा माल, छोटी छोटी कामं ते केशकर्तनालयापर्यंत मेट्रो शहरांमध्ये प्रत्येक गोष्ट आता सहज उपलब्ध होतेय.

बाजारपेठेत खूप उद्योजक असले तरी या क्षेत्रातील असंघटितपणाच्या समस्येवर अजूनही परिपूर्ण उपाय योजता आलेला नाही, असं 'गपून' या ग्राहकांना ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या संस्थेला वाटतंय. अनेक प्रकारच्या सेवा, परिपूर्ण आराखडा, वेबसाईट किंवा ऍपवर सेवाशुल्काचा स्पष्ट उल्लेख, पूर्णपणे स्वयंचलित व्यवस्थापन यंत्रणा यामुळे या असंघटित बाजारपेठेतील सर्व अडथळे बाजूला सारुन आम्ही ग्राहक आणि विक्रेत्यांना पुरेपूर सेवा देत असल्याचा दावा गपून या संस्थेने केला आहे.


गपूनची कोअर टीम

गपूनची कोअर टीम


संकल्पनेचा जन्म

बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा याचा समतोल राखत दर्जेदार आणि वक्तशीर सेवा पुरवण्याचा गपूनचा दावा आहे. नैराश्यातून ही संकल्पना जन्माला आल्याचं गपूनचा संस्थापक आणि सीईओ अपूर्व मिश्रा सांगतो. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अपूर्व नोकरीनिमित्त बंगळुरूला गेला तेव्हा त्याला घरातील इलेक्ट्रिक आणि प्लंबिंगची कामं करणारे शोधताना खूप त्रास झाला. त्यानंतर अशा मूलभूत कामांसाठी लोकांना सोपा आणि विश्वसनीय पर्याय द्यावा यासाठी अपूर्वने त्याचा रुममेट अंकीत बिंदल आणि मैत्रिण अंकीता असाई यांच्यासह या असंघटित बाजारपेठेतील समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला. ग्राहकांना आवश्यक असलेल्या या सेवाक्षेत्राची रचना, त्यातील खाचखळगे काय आहेत आणि त्यावरील योग्य उपाय कोणते यावर जवळपास तीन महिने संशोधन केल्याचं अपूर्व सांगतो.

संशोधन आणि जादूई क्षण

संशोधनादरम्यान संशोधकांना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे या बाजारव्यवस्थेतील विस्कळीतपणामुळे ग्राहक तर वैतागलेले आहेत पण यातील विक्रेतेही तेवढेच निराश झाले आहेत. सेवा पुरवणाऱ्या अनेकांचं ऑनलाईन अस्तित्वच नव्हतं, जे ऑनलाईन होते त्यांना चांगला दर्जा मिळत नव्हता.

आपली सेवा ग्राहकाने घ्यावी यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ते ग्राहकाने सांगितलेले काम एकाच सेवा पुरवणाऱ्याकडे त्याच्या कौशल्यानुसार पाठवून देतात. त्यामुळे काही विक्रेत्यांना अशा संधीसाठी किंमत मोजावी लागतेय जे त्यांनी कधीही केलं नसेल आणि करणारही नाही.

कोअर टीमची रचना

गपूनची स्थापना करण्याआधी अपूर्व फ्रॅक्टल अँड इएक्सएल या विमा, किरकोळ बाजार आणि टेलिकॉम क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीत व्यवसाय सल्लागार म्हणून दीड वर्ष कार्यरत होता. तर सहसंस्थापक आणि सीएमओ अंकीता ईशान्य भारतातील एका कंपनीत ऑईल फिल्ड इंजिनिअर होती.

गपूनचा सहसंस्थापक आणि सीटीओ अंकीत हा प्रॉडीन्टेलमध्ये वरीष्ठ सॉफ्टवेअर इंजिनीअर होता. तंत्रज्ञानविषयक माहिती असल्याने तो कंपनीची वेबसाईट, ऍपची निर्मिती आणि तिची देखभाल ही कामं सांभाळतो. हे तिघेही कानपूर आयआयटीचे पदवीधारक आहेत आणि चांगले मित्र आहेत. निखिल गुप्ता हा गपूनचा सीओओ आहे, त्याने २०१३ मध्ये दिल्ली आयआयटी मधून पदवी मिळवली. फ्रॅक्टल ऍनालिटिक्समध्ये व्यवसाय सल्लागार म्हणून त्याने काम केले आहे. सध्या तो गपूनचं रोजचं कामकाज बघतोय.

गपून हे आता असं एक व्यासपीठ झालंय ज्यावर ग्राहकांना ऑनलाईन सेवा पुरवणारे उपलब्ध होतात. तसेच सेवा पुरवणाऱ्यांनाही व्यवसायाच्या संधी मिळतात. त्यामुळे त्यांची जाहिरात होते आणि वेळ तसंच पैसाही वाचतो.

गपूनचं नेमकं काम काय?

घरात वारंवार निघणारी प्लम्बिंग, इलेक्ट्रिकलची कामं, सुतारकाम, रंगकाम, पेस्ट कंट्रोल तसेच घरातील इलेक्ट्रानिक वस्तू तसेच लॅपटॉप दुरूस्ती अशी सर्व काम गपून सर्विसेसच्या कक्षेत येतात. माफक शुल्कासह काम झाल्यानंतरही ग्राहकांशी संवाद ठेवणं ही गपूनची वैशिष्ट्ये. या बाजारपेठेतील असंघटितपणावर उपाय शोधण्याचं गपूनचं ध्येय आहे. “ सेवांची उत्पादन म्हणून गुणवत्ता वाढवली तर एक व्यवहार्य तोडगा निघू शकतो असा आमचा विश्वास आहे,” असं अपूर्व म्हणतो.


ऊर्जा आणि निधी

फेब्रुवारी २०१५ मध्ये स्थापना झाल्यापासून आतापर्यंत गपूननं साडे तीन हजारांपेक्षा जास्त ग्राहकांना सेवा पुरवली आहे. चौकशी करणारे, भेट देणारे आणि ग्राहक यांच्याबाबतीत दर महिन्याला आमची वाढ १०० टक्क्यांना होत असल्याचा दावा गपूननं केला आहे. सध्या बंगळुरू शहरात कंपनी दिलेल्या सर्व सेवांसाठी दिवसाला दीडशे ऑर्डर्सवर काम करतेय.

तीन महिन्यांपूर्वी मुंबई आणि बंगळुरुबाहेर वसलेल्या एंजल इन्व्हेस्टर्स या समुहाकडून गपूननं कर्ज घेतलं. येत्या दोन महिन्यात बंगळुरू शहरात दिवसाला एक हजार ऑर्डर्स मिळवण्याचं गपूनचं लक्ष्य आहे आणि येत्या चार महिन्यात भारतातील काही शहरांमध्ये सेवा सुरू करण्याचं ध्येय आहे.

२०१३ मध्ये जवळपास ११७ अशा छोट्या ऑन डिमांड कंपन्य़ांना निधी दिला गेलाय. गेल्या वर्षात भारतात याची लाट आली आहे आणि यातून चांगले स्टार्ट्अप्स निर्माण झाले आहेत, यात व्यामो, स्टेग्लॅड, गेटलूक, बुलबुल आणि व्हॅनिटी क्युब अशी काही नावं घेता येतील.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक स्टार्ट्पअ कंपन्यांनी यावर्षी गुंतवणूक मिळवली आहे. यू वुई कॅनचा आधार असलेल्या व्यामोनं गेल्याच आठवड्यात जवळपास २ मिलियन डॉलरची गुंतवणूक मिळवली आहे. तर व्हॅनिटी क्युबनंही साडे तीन लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक मिळवली आहे.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags