संपादने
Marathi

सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून तयार होत आहे प्रशिक्षित जलसेना

Team YS Marathi
4th Jan 2017
2+ Shares
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

झालेल्या कामांमुळे लोक आनंद साजरा करीत आहेत. महाराष्ट्राचा पाणी या विषयावरील इतिहास लिहिला जात असताना पानी फाऊंडेशनचाही इतिहास लिहिला जाईल, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या स्पर्धेसाठी मागील वर्षी 3 तालुके निवडण्यात आले होते. आता 13 जिल्ह्यांमधील 30 तालुके निवडण्यात आले आहेत. पुढील वर्षी या स्पर्धेसाठी 300 तालुके निवडण्यात यावेत जेणेकरुन पाणीदार महाराष्ट्र तयार होण्यास मदत होईल. पानी फाऊंडेशनचे काम व्यापक स्वरुपात सुरु आहे. त्यांनी घेतलेली जबाबदारी ते उत्तम नियोजन करुन पूर्ण करतात. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आमीर खान आणि त्यांच्या टिमचे यावेळी अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी अंबाजोगाई, केज, धारुर, जि. बीड, औसा, निलंगा, जि. लातूर, भूम, परंडा, कळंब, जि. उस्मानाबाद ,फुलंब्री, खुलताबाद, जि.औरंगाबाद, कोरेगाव, माण, खटाव, जि. सातारा, पुरंदर, इंदापूर, जि. पुणे, खानापूर,आटपाडी, जत, जि. सांगली, सांगोला, उत्तर सोलापूर, जि. सोलापूर, बार्शी-टाकळी, पातूर, अकोट, जि. अकोला, कारंजा, जि. वाशिम, राळेगाव, कळंब, उमरखेड, जि. यवतमाळ, आर्वी, जि. वर्धा, वरुड, धारणी, जि. अमरावती या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमास अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकणी, सई ताम्हणकर, सुनील बर्वे, जितेंद्र जोशी , पोपटराव पवार, शांतीलाल मुथा यांच्यासहजलयुक्त शिवार योजनेंतर्गत काम करणारे मान्यवर उपस्थित होते.

सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून पाणी या विषयातील प्रशिक्षितांची जलसेना तयार होत आहे. ही जलसेना महाराष्ट्राला

दुष्काळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृहात चित्रपट अभिनेता आमीर खान संस्थापक असलेल्या पाणी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2017 ची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चित्रपट अभिनेता आमीर खान, श्रीमती किरण राव, सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, रिलायन्स फाऊंडेशनचे जगन्नाथ कुमार, टाटाट्रस्टचे वेंकट, पिरामल उद्योग समूहाचे अजय पिरामल, एच. टी. पारेख फाऊंडेशनच्या श्रीमती झिया लालकाका आदि उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोणत्याही विषयाचे महत्व जोपर्यंत लोकांना कळत नाही, तोपर्यंत लोकांचा सहभाग वाढत नाही.


image


पाणी अडवा, पाणी जिरवा ही गेली 40 वर्षे घोषणाच राहिली. पण आता या घोषणेला लोकचळवळीचे स्वरुप आले आहे. कोणत्याही योजनेमध्ये लोकांचा सहभाग वाढण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. जलयुक्त शिवार योजनेचे स्वरुप लोकचळवळीत होण्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे महत्वपूर्ण योगदान आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जनतेत संघर्षाऐवजी संवाद वाढला असून

पाणी फाऊंडेशनच्या कामात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सहभागी झालेल्या गावांनी आम्हाला आत्मविश्वास दिल्यामुळेच आम्ही हे काम पुढे नेवू शकलो. या कामासाठी आम्हाला राज्य शासनाचे आणि सहभागी झालेल्या तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर आणि विविध संस्थांचे चांगले सहकार्य लाभले. आता आम्ही या स्पर्धेसाठी 30 तालुक्यांची निवड केली आहे. या तालुक्यांमध्ये काम करताना आम्हाला यश आल्यास हे यश दंगल या चित्रपटाच्या यशापेक्षा मोठे असेल, असे उद्गगार अभिनेता आमीर खान यांनी काढून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी आमचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मागील वर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून 3 तालुक्यांमध्ये 1368 कोटी लिटर इतका पाणी साठा करण्याची क्षमता निर्माण झाली असून या पाण्याचे वार्षिक मूल्य 272 कोटी रुपये असल्याचेही आमीर खान यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात पाणी फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक करुन ही संस्था पाणी या जिव्हाळ्याच्या आणि महत्वाच्या विषयावर काम करीत असल्याने आम्हीही मदतीसाठी पुढे आल्याचे सांगितले.


image


एकजुटीने पेटलं रान या अल्बमची निर्मिती सत्यमेव जयते वॉटर कपच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नागरीकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 'एकजुटीने पेटलं रान, तुफान आलंया, काळ्या भूईच्या भेटीला, हे आभाळ आलंया' या म्युझिक व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. याचे संगीतकार अजय-अतुल असून गीतकार गुरु ठाकूर हे आहेत तर दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे तर पार्श्वगायन श्रीमती किरण राव यांनी केले आहे.

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2017 साठी राज्यातील 13 जिल्ह्यातील 30 तालुके निवडण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2017 आहे. स्पर्धेचा कालावधी 8 एप्रिल ते 22 मे 2017 असा आहे. स्पर्धेसाठी पहिले बक्षिस 50 लाख रुपये, दुसरे बक्षिस 30 लाख रुपये तर तिसरे बक्षिस 20 लाख रुपये आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गावाला 10 लाख रुपयांचे रोख बक्षिस दिले जाणार आहे.


image


या स्पर्धेसाठी अंबाजोगाई, केज, धारुर, जि. बीड, औसा, निलंगा, जि. लातूर, भूम, परंडा, कळंब, जि. उस्मानाबाद ,फुलंब्री, खुलताबाद, जि. औरंगाबाद, कोरेगाव, माण, खटाव, जि. सातारा, पुरंदर, इंदापूर, जि. पुणे, खानापूर,आटपाडी, जत, जि. सांगली, सांगोला, उत्तर सोलापूर, जि. सोलापूर, बार्शी-टाकळी, पातूर, अकोट, जि. अकोला, कारंजा, जि. वाशिम, राळेगाव, कळंब, उमरखेड, जि. यवतमाळ, आर्वी, जि. वर्धा, वरुड, धारणी, जि. अमरावती या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. 

या कार्यक्रमास अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकणी, सई ताम्हणकर, सुनील बर्वे, जितेंद्र जोशी , पोपटराव पवार, शांतीलाल मुथा यांच्यासह

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत काम करणारे मान्यवर उपस्थित होते. (सौजन्य : महान्यूज)

2+ Shares
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags