संपादने
Marathi

अमरसिंग, ग्रामिण राजस्थानातील ऑटो चालक ते आवळा मुरब्बाचा लक्षाधीश व्यावसायिक!

Team YS Marathi
5th Apr 2017
Add to
Shares
7
Comments
Share This
Add to
Shares
7
Comments
Share

अमर सिंग हे शाळेतून काढून टाकल्याने रिक्षा चालक झाले, आज ते अमर मेगा फूड प्रा लि. या राजस्थानातील सम्मान येथील कंपनीचे मालक आहेत, ज्यांची उलाढाल २६ लाखांची आहे. १५ जणांना रोजगार देणारे ते यशस्वी उद्योजक बनले आहेत. ज्यापैकी निम्या महिला आहेत.

या बाबतच्या वृत्ता नुसार, अमर यांची कहाणी म्हणजे शक्ती आणि प्रतिकूलतेवर मात करण्याची अनोखी कहाणी आहे. ज्यांनी १२०० रूपये खर्च करून ५० आवळ्याची रोपे लावली होती. 


image


वृत्तपत्रात त्यांच्या वाचनात आवळा आणि त्याचे उपयोग नावाचा लेख येण्यापूर्वी १९९५ पर्यंत अमर यांनी त्याआधी बरीच कामे केली. जसे की फोटो स्टुडिओ चालविणे, किंवा स्थानिक पातळीवर प्रवासी वाहतूक करणे इत्यादी. त्यानंतर मात्र त्यांच्या जीवनात आवळ्याची रोप लावणे वाढविणे आणि आवळे विकणे हा उद्योग सुरू झाला. जरी त्यांना फारसा नफा मिळत नव्हता तरी व्यापा-यांनी त्यांना त्रास देण्यास सुरूवात केला त्यानंतर त्यांनी स्वत:चे अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचे ठरविले. स्थानिक सेवाभावी संस्था लुपिन ह्यूमन वेवर्ल्फेअर रिसर्च ऍण्ड फाऊंडेशन च्या मदतीने त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आवळ्याच्या पाककृती करण्यास सुरूवात केली. आणि अमर स्वयंसहायता गटाची स्थापना केली. ज्याला त्यांनी२०१२मध्ये नंतर अमर मेगा फूड प्रायव्हेट लिमीटेड मध्ये परावर्तित केले.

“ प्रत्येक गोष्ट अगदी लागवड, प्रक्रिया, पॅकिंग, आणि वाहतूक पर्यंत सा-या गोष्टी येथे होतात,” अमर यांनी सांगितले. “ आता मला व्यापा-यांकडे जावे लागत नाही, तेच माझ्या कडे येतात.” 

आवळा, किंवा इंडियन गोसबेरी, मध्ये नैसर्गिक न्यूट्रीएंटची मुलद्रव्य आहेत, शिवाय यात उच्च प्रमाणात क जीवनसत्वे आहेत, कॅल्शियम आयर्न, आणि ऍन्टीऑक्झिएंट आहेत. दुबळेपणा दूर करण्यासाठी आवळा हे गुणकारी फळ आहे, याशिवाय यातून ह्रदयविकाराचा धोका कमी करता येतो. (थिंक चेंज इंडिया)

Add to
Shares
7
Comments
Share This
Add to
Shares
7
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags